ऑनलाइन पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाल्यास काय करावे? | Wrong Money Transfer | हे महत्त्वाचे नियम नक्की वाचा

wrong money transfer
Spread the love

अलीकडे ऑनलाईन पद्धतीने पैशांचा वापर अगदी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मागील कित्येक वर्षांपासून रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण सुद्धा तितकेच कमी झाले आहे. त्यामानाने ऑनलाईन ट्रांजेक्शन चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. wrong money transfer.

यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम असे विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरतात आणि यामधून आपला ऑनलाईन व्यवहार पूर्ण करतात. एखादी छोटी-मोठी वस्तू द्यायची असेल तरी ऑनलाईन पद्धतीने पैशाची देवाण-घेवाण होते. परंतु ऑनलाईन पेमेंट करत असताना ज्या व्यक्तीस पैसे ट्रान्सफर करायचे होते, त्या व्यक्तीस पैसे न पाठवता दुसऱ्या व्यक्तीस पैसे पाठवले तर आपल्याला आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या त्रास सहन करावा लागतो.

किती जणांना अशावेळी असे प्रश्न निर्माण होतात की, हे पैसे आता मिळतील की नाही? हे पैसे मिळवायचे तर नक्की काय करावे? तर यासाठी विविध मार्ग असतात. परंतु पुरेशी माहिती नसते त्यामुळे अनेक जणांना हे पैसे विसरून जावे लागतात (bank update). या अनुषंगाने हे पैसे कसे मिळवायचे व बँकेचे नियम काय याविषयी जाणून घेऊया.

चुकीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावे? | Wrong Money Transfer

समजा तुम्ही चुकून ज्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे होते, त्या ऐवजी दुसऱ्याच खात्यामध्ये पैसे पाठवले तर सर्वात प्रथम तुमची ज्या बँकेमध्ये खाते आहे (live marathi), त्या बँकेमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याला या व्यवहाराच्या तपशील द्यावा. इतकेच नाही तर झालेल्या व्यवहाराचे संपूर्ण पुरावे द्यावेत. wrong money transfer.

यामुळे बँकेकडून यावर पटकन कारवाई होते. तुमच्याकडून ज्या खात्यामध्ये चुकीने पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत, ते खाते जर तुमची जी बँक आहे त्या बँकचेच असेल तर या प्रकरणांमध्ये बँक मध्यस्थी म्हणून काम करत असते ज्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत (online payment); त्या व्यक्तीसोबत बँक संपर्क साधते व संवाद करते किंवा ई-मेल करते आणि पूर्णपणे परवानगी घेऊन तुमच्या खात्यामध्ये सात दिवसाच्या आत पैसे पाठवले जातात.

ही माहिती देखील तुम्हाला असणे गरजेचे.

समजा तुम्ही ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये चुकून पैसे ट्रान्सफर केले असतील तर त्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर अशावेळी खातेदाराच्या नावावर एफ आय आर दाखल करू शकता, म्हणजे तुम्हाला अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत घ्यावी लागते.

अशा कायदेशीर प्रक्रिये अंतर्गत तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता; परंतु ज्या खातेदाराच्या खात्यामध्ये चुकून पैसे गेलेले आहेत (latest marathi news), तो तुमच्यासोबत संवाद साधत असेल तर अशावेळी तुमच्या संपर्कामध्ये असेल तसेच तुमचे पैसे परत करण्यासाठी तो सहमत असेल तर अशा प्रसंगांमध्ये बँक तुम्हाला काही कागदपत्रांच्या परती सबमिट करण्यासाठी सांगू शकते.

अशा पद्धतीने अगदी सरळ सोप्या पद्धतीचा अवलंब करून चुकीच्या खात्यामध्ये पैसे गेलेले तुम्ही परत मिळवू शकतात.

wrong money transfer संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

‘या’ क्रेडिट कार्डधारकांना अगदी मोफत ताज हॉटेलमध्ये राहता येईल! | Credit Card Benefits in Marathi | तुम्ही काढले आहे का हे क्रेडिट कार्ड?

Next post

क्रेडिट कार्ड वापरत आहे? तर या 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या | Credit Card Use in Marathi | होईल जास्तीत जास्त फायदा;

You May Have Missed