लय भारी! UPI व्यवहारावर ही बँक देत आहे 7,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक | UPI Offers in Marathi | ऑफर बघा व लाभ घ्या;

UPI Offers in Marathi
Spread the love

UPI Transactions : तुम्ही सुद्धा युपीआयच्या माध्यमातून सतत व्यवहार करत असाल तर, आजची बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. हो, अलीकडेच एका खाजगी बँकेने UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी एक भन्नाट अशी कॅशबॅक ऑफर आणलेली आहे. बँक ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी कॅशबॅक जिंकण्याची संधी या ठिकाणी देत आहे (UPI Offers in Marathi). कोणती आहे ही बँक?, तसेच कितीपर्यंत कॅशबॅक ही बँक देत आहे?. चला याविषयी तपशील जाणून घेऊया.

UPI व्यवहारावर कॅशबॅक | UPI Offers in Marathi

खाजगी क्षेत्रांमधील डीसीबी बँकेने ‘हॅप्पी सेविंग अकाउंट’ सुरू केलेले आहे. या बचत खात्याची एक खास गोष्ट सांगायची झाली तर, या खात्याच्या माध्यमातून UPI अंतर्गत व्यवहार करून, तुम्ही प्रत्येक महिन्याला 625 रुपये जिंकू शकता.

डीसीबी बँकेच्या मते, 'हॅप्पी सेविंग अकाउंट' च्या अंतर्गत यूपीआय चा वापर करून डेबिट व्यवहारांवर वर्षभरामध्ये 7500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे (UPI update). यासाठी कमीत कमी पाचशे रुपये यांच्या यूपीआयचा व्यवहार करावा लागतो. हा कॅशबॅक बँक फक्त आणि फक्त डेबिट व्यवहारांवरच दिला जातो.

हा कॅशबॅक तिमाही मध्ये केलेल्या व्यवहारांच्या आधारावर अशा वेळेस दिला जाईल, तसेच तिमाही संपल्यानंतर खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. ‘हॅप्पी सेविंग’ खातेदारांना एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त 625 रुपये यासोबतच, वर्षभरामध्ये जास्तीत जास्त 7500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

UPI व्यवहार वाढवण्यासाठी चालना!

देशभरातील UPI व्यवहार दर महिन्याला नवनवीन विक्रम निर्माण करत असताना दिसतील, लोकांना रोख व्यवहारांच्या ऐवजी ऑनलाइन UPI च्या माध्यमातून व्यवहार करणे अधिक सोयीस्कर आणि योग्य वाटत आहे. NPCI च्या मते, डिसेंबर महिन्यामध्ये UPI च्या माध्यमातून व्यवहार 17.4 ट्रिलियन रुपयाच्या जवळ पोहोचलेला आहे (UPI news).

UPI Offers in Marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

पर्सनल लोन पेक्षा प्रॉपर्टी लोन फायदेशीर? | Best Loan Update Marathi | पहा यामध्ये कोणकोणते लाभ मिळतात? आणि किती असतो व्याजदर?

Next post

कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल; तर या योजनेत आत्ताच गुंतवणूक करा | Post Office Scheme in Marathi

You May Have Missed