क्रेडीट कार्ड चे विविध 13 प्रकार | Types of Credit Card in Marathi | जाणून घ्या तुमच्यासाठी कोणते असेल फायदेशीर

types of credit card in marathi
Spread the love

बँका आणि वित्तीय संस्था आपल्या गरजेनुसार योग्य क्रेडिट कार्ड निवडण्याचा पर्याय आणि मदत पण करतात जेणेकरून आपला खर्च होवू नये आणि योग्य क्रेडीट कार्ड मिळावे. त्याचसाठी आपण क्रेडीट कार्डचे प्रकार (types of credit card in marathi) आणि त्याची माहिती, कोणते कार्ड कोणासाठी असते ह्या सगळ्याची माहिती ह्या लेखात घेणार आहोत.

आपण जेव्हा पैसे खर्च करत असतो त्यावेळी आपल्याकडे अधिक पर्याय असतील जसे कि डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड इत्यादी., तर आपल्या अधिक सोयीचे असते. क्रेडिट कार्डने आपले जीवन सोपे केले आहे, त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे क्रेडीट कार्ड गरजेचे आहे हे निवडणे महत्वाचे आहे. 

आपणाला आमच्या ह्या लेखात क्रेडीट कार्ड म्हणजे काय? त्याचे फायदे आणि क्रेडिट कार्ड कुणाला मिळेल ह्यांची सर्व माहिती मिळेल.

आपल्याला कार्ड पासून मिळणारे फायदे आणि त्यांचा खर्च ह्यांचा समतोल साधता येणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला कोणते क्रेडीट कार्ड घेणे गरजेचे आहे समजणे आवश्यक आहे.

क्रेडीट कार्डचे प्रकार | Types of Credit Card in Marathi

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रवासापासून ते अगदी खरेदी करण्यापर्यंत सर्वच गोष्टीसाठी वेगवेगळी क्रेडीट कार्ड आहेत.

Silver Credit Cards | सिल्व्हर क्रेडिट कार्ड  

सिल्व्हर क्रेडिट हे अगदी कमी पगार असणार्यांना आणि कमीतकमी ४ ते ७ वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मिळू शकतात.

जर आपला CIBIL Score चांगला असेल तर नोकरी करणार्यांना आणि पगारदारांना या प्रकारचे क्रेडिट कार्ड मिळणे अगदी सोपे आहे. ह्या कार्ड चे चार्जेस कमी असतात. रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी सुरुवातीचे 6 ते 9 महिन्यांसाठी कोणतेही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.

आपण क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्र आहात का? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करून Free Cibil Score चेक करा.

क्रेडिट कार्ड कसे काढावे? हे माहित नसेल आणि आपल्याला क्रेडिट कार्ड हवे असेल तर पुढील लिंक वरती क्लिक करून आपण क्रेडिट कार्ड अप्लाई ऑनलाइन करू शकता.  SBI Credit Card, IDFC First Bank Credit Card, Axis Bank Credit Card, AU Small Finance Credit Card, Indusind Credit Card, HDFC Bank Credit Card etc.

Gold Credit Card | गोल्ड क्रेडिट कार्ड

गोल्ड क्रेडिट कार्ड हे ज्याचे उत्पन्न खूप जास्त आहे अश्या व्यक्तीला मिळते. हे कोणत्याही बँकेकडून मिळते. ह्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे अत्यंत महत्वाचे असते. हे कार्ड श्रीमंत लोकांसाठी असते असे मानले जाते.

गोल्ड क्रेडिट कार्डचे हे प्रमुख फायदे आहेत.

  • जास्तीत जास्त रक्कम काढू शकतो.
  • जास्त क्रेडीट हि मिळते.
  • गोल्ड क्रेडीट मध्ये जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी अॅड-ऑन कार्ड सुविधा दिली जाते.
  • जोडीदार, पालक किंवा मुले यासारख्या कुटुंबातील सदस्यांसाठी अॅड-ऑन कार्ड सुविधा देतात.
  • प्रवास, विमा, कॅशबॅक ऑफर अश्या बरयाच ऑफर असतात.

Platinum Credit Cards | प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

प्लॅटिनम कार्ड हे सर्वात जास्त लोकप्रिय क्रेडिट कार्डांपैकी एक मानले जाते. बर्यापैकी ह्याचा वापर सर्वात जास्त केला जातो. कारण प्रत्येक प्लॅटिनम क्रेडिट कार्ड स्वागत पॅकेज, किरकोळ ब्रँड्सचे गिफ्ट व्हाउचर, रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक ऑफर, प्रीमियम एअरपोर्ट Priority Pass membership with lounge access, Global lifestyle आणि Golfing privileges, Easy cash सह येते.

पैसे काढणे, इंधन, कुटुंबासाठी अॅड-ऑन कार्ड, Emergency card replacement service, इ. ऑफर देखील मिळतात. प्रत्येक कार्डावर किती ऑफर उपलब्ध असतात हे ज्या त्या बँकेवर अवलंबून आहे. ह्यामध्ये सुद्धा  गोल्ड क्रेडीट कार्ड सारखेच फायदे आणि खूप अधिकार असतात.

क्रेडीट कार्ड नूतनीकरण शुल्क इतर प्रकारच्या क्रेडिट कार्डांच्या तुलनेत थोडे जास्तच  असते. ह्याचा वापर हे श्रीमंत लोक जास्त करतात.

Business credit cards | बिझनेस क्रेडिट कार्ड

बिझनेस क्रेडिट कार्ड ह्या कार्डला कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड असे देखील म्हणतात.  हे व्यावसायिक प्रतिष्ठान, कॉर्पोरेट्स आणि इतर वित्तीय संस्थांना ऑफर केले जातात.

अश्या ठिकाणी जेथे संस्था किंवा कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना क्रेडिट कार्ड देऊ शकतात आणि कार्डवरील आर्थिक व्यवहार देखील सोयीस्करपणे करू शकतात अश्या व्यावसायिकना हे क्रेडीट कार्ड मिळते.

ही कार्डे कर्मचार्‍यांना वैयक्तिक व्यवहारांसाठी वापरता येत नाहीत आणि ती केवळ आपल्या कंपनीत नोकरीच्या कालावधी पर्यंत वैध असतात.

बिझनेस क्रेडिट कार्ड व्यवसाय आणि वैयक्तिक व्यवहार वेगळे आहेत याची खात्री करण्यात मदत करतात. आपले व्यवसाय क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आपला  क्रेडिट स्कोअर उच्च असणे आवश्यक असते. बिझनेस कार्ड द्वारे व्यवसायाशी निगडीत चांगल्या प्रकारची सुविधा दिल्या जातात.

Basic Credit Card | बेसिक क्रेडिट कार्ड

हे क्रेडिट कार्ड ज्यांनी अजून क्रेडीट कार्ड वापरलेच नाही अश्या नवीन लोकांच्यासाठी असते. जर आपण नवीन असाल आणि फक्त क्रेडिट कार्ड कसे वापरायचे ह्यांचा अनुभव घ्याचा असेल तर ह्या कार्डचा आपल्या उपयोग होतो.

त्यासाठी बेसिक क्रेडिट कार्ड घेऊ शकतो. आपल्या महिन्याच्या पगारावर अवलंबून कमी मर्यादेसाठी हे कार्ड मिळते. हे कार्ड वापरताना काळजीपूर्वक वापरावे कारण नवीन असल्यामुळे खर्चाचा अंदाज लागत नसल्यामुळे क्रेडीट वाढू शकते आणि क्रेडीट स्कोर खराब होवू शकतो.

क्रेडीट स्कोर कसा वाढवायचा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Travel Credit Card | ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड प्रवाशांसाठी लोकप्रिय आणि फायदेशीर आहेत. ते ऑफर करत असलेल्या अमर्यादित प्रवास फायद्यांमुळे त्यांचा उपयोग प्रवाशांसाठी खूप होत असतो. ह्या कार्डचा वापर हा केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रवासासाठी होत असतो.

आपण एअरलाइन बुकिंग, हॉटेल बुकिंग इत्यादींसाठी पेमेंट करण्यासाठी ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड वापर करतो तेव्हा आपल्याला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. प्रवासासाठी नवीन बुकिंग करण्यासाठी या पॉइंट्सच्या वापर करता येतो.

ट्रॅव्हल कार्ड हे हॉटेल आणि हॉलिडे ऑफर, गोल्फ ऑफर, डायनिंग ऑफर, ट्रॅव्हल इन्शुरन्स इ.ऑफर देखील देत असतात.

Fuel credit card | फ्यूएल क्रेडिट कार्ड 

Fuel credit card ही क्रेडिट कार्डे वाहतूकदारांसाठी जास्त फायदेशीर असतात. आपला रोजचा वाहतूक खर्च कमी करून आपल्या इंधनावरील खर्चात बचत केली जाते.

आपल्याला ह्यामध्ये जास्तीत जास्त रिवॉर्ड पॉइंट देखील मिळवू शकता. त्यामुळे  वर्षभर आपल्या इंधनाच्या खर्चात जास्त बचत करण्यासाठी त्यांचा वापर करता येतो.

त्याचसोबत Activation bonus, मनोरंजन फायदे, जेवण,  हॉटेल आणि वेलनेस ऑफर इ. ह्याही फायदाचा लाभ होतो.

ऑटो क्रेडिट कार्ड्सवर आकारले जाणारे वार्षिक शुल्क आणि कार्ड घेण्याचे शुल्क खूप कमी आहे. नेहमी प्रवास करणाऱ्या  प्रवाश्यांसाठी या कार्डांचा लाभ घेणे खूप फायद्याचे ठरते.

Cashback Credit Cards | कॅशबॅक क्रेडिट कार्ड

कॅशबॅक क्रेडिट कार्डे म्हणजे जे क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर विशिष्ट प्रमाणात कॅशबॅक दिला जातो. तो आपल्या खर्चाच्या प्रमाणात आपलयाला मिळतो.

ह्यामध्ये बिल पेमेंट, मूव्ही तिकीट बुकिंग, किरकोळ खरेदी,  जेवणाची बिले, किराणा खरेदी इत्यादींवर कॅशबॅक मिळू शकतो.

कॅशबॅक कार्डचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे इंधन अधिभार माफी, वार्षिक शुल्क बदलणे, जेवणाचे आणि Shopping Privileges, Global Acceptance, Rewards Program, Balance Transfer इ.फायदे आहेत. पण कॅशबॅकसाठी पात्र असलेल्या व्यवहारांच्या प्रकारावर काही अटी असू शकतात.

Credit cards for Women | महिलांसाठी क्रेडिट कार्ड

महिलांसाठी क्रेडिट कार्ड हे फक्त  महिला ग्राहकांना बनवले गेले आहे. महिलांना ह्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळावेत यासाठी थोड्याच बँकांनी हि  क्रेडिट कार्डे तयार केली आहेत.

ह्या महिला क्रेडिट कार्डेमध्ये शॉपिंग रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक ऑफर ह्या गोष्टीचा जास्त समावेश असतो.

महिलांना खरेदी करण्याची जास्त आवड असते त्यामुळे त्या ह्या क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करून रिवॉर्ड पॉइंट देखील मिळवू शकतात.

Co-branded credit card | को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे हे कार्ड बँक काही विशिष्ट ब्रँडसोबत टाय-अप करून ते आपल्याला ऑफर करते. ज्या ब्रँडसोबत बँकेचे टाय-अप असते त्या ब्रँड खरेदीवर आपल्याला जास्त सवलत देते.

ह्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांसोबत टाय-अप करून बँका त्यांचा व्यापारी ग्राहक आणि आधार असा दुहेरी फायदा करतात.

को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्समध्ये रिटेल पार्टनर सोबत टाय-अप करून ब्रँडकडून सूट, सवलत आणि ऑफर, स्पोर्ट्स लीगमधील स्पोर्टिंग फायदे, प्रवासातील सुट्टी आणि हॉटेलमध्ये राहण्याचे विशेषाधिकार असे फायदे असू शकतात.

Shopping credit card | शॉपिंग क्रेडिट कार्ड

शॉपिंग क्रेडिट कार्डच्या साहाय्याने आपण  विविध स्टोअर्स किंवा ऑनलाईन खरेदी करू शकतो.

आपल्याला कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स इत्यादी स्वरूपात सवलत देतात.

हे कार्ड वापरून, आपण  विविध कॅशबॅक, सवलतीचे व्हाउचर इ. मिळवू शकतो आणि त्यांचा  वापर करून आपण भविष्यातील खरेदीसाठी त्यांचा फायदा करून घेवू शकतो.

Prepaid credit card | प्रीपेड क्रेडिट कार्ड

प्रीपेड क्रेडिट कार्डे म्हणजे ह्या क्रेडीट कार्डचा वापर करण्याआधी आपल्याला रक्कम भरावी लागते मग आपण खरेदी करू शकतो. त्यासाठी आपल्याला वापरण्यापूर्वी आपल्या क्रेडिट कार्डवर प्रीपेड शिल्लक असणे आवश्यक आहे.

त्यानंतर आपण केलेल्या व्यवहारांची किंवा खरेदीची  रक्कम आपल्या क्रेडिट कार्डच्या शिल्लक रकमेतून वजा केली जाईल.

जरी ही कार्डे क्रेडिट कर्ज प्राप्त करून देत नसले तरी आपण इतर प्रकारच्या क्रेडिट कार्डद्सारख्या असलेल्या बहुतेक फायद्याचा आनंद घेऊ शकतो.

Premium credit card | प्रीमियम क्रेडिट कार्ड

प्रीमियम क्रेडिट कार्ड फक्त थोड्याच लोकांसाठी असतात. ही कार्डे काही Golf Club, Hotel Lounge, Concierge Service आणि विमा इत्यादींमध्ये ह्यांचा वापर केला जातो.

आपण ह्या कार्डचा वापर योग्यरीतीने  केल्यावर ही कार्डे मोफत प्रवास आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी कूपन अश्या ऑफर हि देतात.

हे कार्ड वापरण्यासाठी आपल्याला बँकेने दिलेल्या नियम आणि पात्रता जास्त कठोर असल्यामुळे हे कार्ड कमी लोकांना उपलब्ध होते.

थोडक्यात

आपण क्रेडीट कार्डचे प्रकार यांचा अभ्यास केला (types of credit card in marathi). ह्या प्रकारामध्ये आपल्या बँक किंवा संस्थाच्या नियमानुसार काही क्रेडीट कार्ड कमी किंवा जास्त असू शकतात आणि त्याचे फायदे आणि तोटे कमी जास्त असू शकतात. जसे ATM Fraud होतात तसे क्रेडीट कार्ड Fraud होण्याची शक्यता असते, त्यामुळे क्रेडीट कार्ड वापरत असताना थोडी सावधगिरी घेणे आवश्यक असते.

आपल्या बँकेकडे किंवा संस्थेकडे असलेल्या आणि आपल्यासाठी योग्य असेलेले कार्ड निवडून त्यांचा वापर करू शकतो. पण त्याच सोबत आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हि गरजेचे आहे. 

types of credit card in marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

क्रेडिट कार्डवरील व्याज दर किती आहे?

क्रेडिट कार्डवरील व्याज दर सामान्यतः 2.5% ते 3.5% पर्यंत दरमहा असतात. तथापि, हे प्रत्येक बँकेच्या नियमानुसार कमी जास्त असू शकतात. नेहमी कमी व्याजदर असलेल्या क्रेडिट कार्डची निवड करणे उचित असते.

क्रेडिट फ्री कालावधी म्हणजे काय?

क्रेडिट कार्डचा व्याजमुक्त कालावधी म्हणजे transaction date and the payment due date यामधील वेळ. क्रेडिट कार्ड व्यवहाराच्या तारखेवर आधारित, ते 18 ते 55 दिवसांपर्यंत कुठेही असू शकते.


Spread the love

Post Comment

You May Have Missed