प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना | PMSBY in Marathi | 20 रुपयामध्ये दोन लाखाचा विमा

pmsby in marathi
Spread the love

२० रुपयामध्ये दोन लाखाचा विमा म्हंटले कि थोडे आश्चर्य वाटेल  पण हे खरे आहे. फक्त वार्षिक २० रुपये भरल्यानंतर आपल्याला दोन लाख रुपयाचा विमा मिळू शकतो.

सामान्यपणे २० रुपयाचा विमा म्हणून हा विमा ओळखला जातो. आपण जर अशा विम्याच्या शोधात असाल तर आपल्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजना ही फायदेशीर ठरू शकेल. तर जाणून घेऊया प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजने (pmsby in marathi) बद्दल …

काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजना? | What is PMSBY in Marathi?

Pradhanmantri Suraksha Bima Yojana (PMSBY full form in marathi) केंद्र सरकारने ९ मे २०१५ रोजी  चालू केली असून हा एक अपघात विमा (Accident Insurance) आहे.

अपघात झाल्यानंतर या विम्याचा लाभ आपल्याला घेता येतो. अपघाता मध्ये मृत्यू झाला तर किंवा पूर्णतः अपंगत्व आल्यास २ लाख रुपये आणि अशंतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपये विम्याचे कवच मिळू शकते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजने साठीची पात्रता | Eligibility for Pradhanmantri Suraksha Bima Yojana

  • ज्या व्यक्तीला पि. एम. एस. बी. वाय. चा लाभ घ्यायचा असेल त्यांचे कोणत्याही एका बँकेत खाते असावे लागते .
  • विमाधारकाचे वय १८ वर्षे ते ७० वर्षापर्यंत असावे .

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजने साठी अर्ज कसा करावा | How to apply/Enroll for PMSBY

 ज्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजने चा लाभ घ्यायचा असेल त्यांनी PMSBY अर्ज भरून त्यांचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. सदर विम्याचा अर्ज (PMSBY Form) पुढे क्लिक https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspxकरून डाऊनलोड करून घेता येईल. काही बंकांच्या इंटरनेट बँकिंग किंवा  Mobile Banking वरून सुद्धा ह्या सेवेचा आपण ऑनलाईन  अर्ज करून लाभ घेऊ शकतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजनेचा हफ्ता | Premium for Pradhanmantri Suraksha Bima Yojana

सदर योजनेसाठी वार्षिक हफ्ता हा २० रुपये असून अर्ज केल्यानंतर तो आपल्या खात्यातून वजा केला जातो. हा हफ्ता हा दरवर्षी मे महिन्यामध्ये आपोआप (Auto Debit) आपल्या खात्यातून वजा केला जातो त्यामुळे मे महिन्यामध्ये आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये उपलब्ध शिल्लक ठेवावी लागेल. जर मे महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये उपलब्ध शिल्लक नसेल तर आपला विमा आपोआप बंद होतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजनेचे नुतनीकरण | Modification of Pradhanmantri Suraksha Bima Yojana

आपल्या खात्यामधून मे महिन्यामध्ये २० रुपये वजा झाले असतील तर आपल्या विम्याचे आपोआप नुतनीकरण केले जाईल. जर आपल्या खात्यामध्ये उपलब्ध शिल्लक (Minimum Balance For PMSBY नसेल तर आपला विमा बंद होतो.

त्यानंतर जर आपल्याला विमा संरक्षण हवे असेल तर त्यासाठी पुन्हा नवीन फोर्म भरून द्यावा लागेल. आणि हे जर टाळायचे असल्यास आपल्या खात्यामध्ये उपलब्ध शिल्लक ठेवावी लागेल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजनेचे लाभ | What is the Risk Coverage of PMSBY?

  • सदर विमा हा अपघात विमा असून अपघातामध्ये मृत्यू झाल्यास २ लाख रुपये लाभ मिळतो.
  • संपूर्ण अपंगत्व आल्यानंतर २ लाख रुपये विम्याचे कवच मिळते.
  • अंशतः अपंगत्व आल्यास रुपये १ लाख विमा कवच मिळते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजनेचाकालावधी | Term of Pradhanmantri Suraksha Bima Yojana

ह्या विम्याचा कालावधी हा एक वर्षाचा म्हणजेच १ जून ते ३१ मे असा असून दरवर्षी हा विमा आपोआप नुतनीकरण केला जातो. आपोआप नुतनीकरण होण्यासाठी आपल्या खात्यामध्ये उपलब्ध शिल्लक ठेवावी लागेल. दुसऱ्या वर्षी आपल्या खात्यातून २० रुपये आपोआप वजा केल्यानंतर हा विमा पुढील एका वर्षासाठी वाढवला जातो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजनेची कवर समाप्ती | Termination of Cover

सदर विम्याचे कवर खालील कारणामुळे समाप्त होऊ शकते.

  • विमाधारकाचे वय ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर.
  • बँकेतील खाते बंद केल्यानंतर.
  • मे महिन्यामध्ये खात्यामध्ये  उपलब्ध शिल्लक नसेल तर.
  • जर एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असल्यास आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी सदर विम्याचा अर्ज केला असल्यास विम्याचे कवच फक्त एकाच खात्याला मिळू शकेल.

प्रधानमंत्री सुरक्षा विम्याचा दावा कसा करता येईल? | How to Claim for PMSBY

आपल्याला जर विम्याचा दावा करायचा असेल तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा दावा फोर्म (PMSBY Claim Form) भरून बँकेमध्ये द्यावा लागेल. त्यासाठीसाठीचा फोर्म खालील लिंक वर क्लिक करून https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx डाऊनलोड करता येईल.

अधिक माहितीसाठी www.jansuraksha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती घेता येईल किंवा National Toll Free Number 1800-180-1111/ 1800-110-001 या नंबर वरती संपर्क साधता येईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी, PMSBY in Marathi, PMSBY full form in marathi जर हि माहिती आपल्याला महत्वपूर्ण वाटली असेल तर कम्मेंट करून जरूर कळवा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजने विषयी संपूर्ण माहिती आपल्याला या ब्लॉग मधून मिळेल.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना फॉर्म PDF

प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजनेचा PDF फॉर्म मिळण्यासाठी येथे क्लिक करा


Spread the love

Post Comment

You May Have Missed