436 रुपयामध्ये २ लाखाचा विमा | PMJJBY Information in Marathi | प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना

pmjjby information in marathi
Spread the love

भारतात केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना हि गरीब आणि आर्थिक उत्पन्न कमी असण्यार्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली जीवन विमा योजना आहे. (pmjjby information in marathi).

कोरोनासारख्या रोगराईच्या जीवघेण्या काळात आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. मोदी सरकारने सुरू केलेली सगळ्यात स्वस्त योजना म्हणजेच  प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना (PMJJBY) आपल्यासाठी उत्तम आहे. ह्या योजनेची आपण सविस्तर माहिती घेवू. pmjjby policy in marathi.

काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना? | PMJJBY Information in Marathi

प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना (pmjjby full form in marathi
) हि २०१५ मध्ये सुरु करण्यात आली. ही एक मुदत विमा योजना आहे. ह्या योजनेमध्ये 2 लाख रुपये लाईफ कव्हर मिळतो. 

त्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी हप्त्याची रक्कम भरावी लागते. आपल्या बँक खात्यात पुरेशी रक्कम असल्यास आपल्या खात्यातून विम्याची रक्कम ऑटो डेबिट (स्वयं-डेबिट) केली जाते. ज्यावेळी विमाधारकाचा मृत्यू होईल त्यावेळी विमाधारकाच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. या योजनेला पोस्ट ऑफिस 399 विमा योजना मराठी असेही म्हणतात

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना साठीची पात्रता | Eligibility for Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana

पी.एम.जे.जे.बी.वाय (PMJJBY) ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र असतील ते पाहू.

  • ज्याचे वय १८ ते ५० पर्यंत आहे. ते लोक ह्या योजनेसाठी पात्र आहेत.
  • योजनेसाठी बँकेत आपले सेविंग खाते असणे आणि त्या खात्याला आधार लिंक असणे गरजेचे असते.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना साठी अर्ज कसा केला जातो? | How to Apply for PMJJBY

ज्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येतो.
पण जर आपण इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकत नसाल तर आपण आपल्या बँकेत जाऊन अर्ज करू शकतो (bank arj marathi). तसेच ह्या योजनेचा अर्ज (PMJJBY PDF Form) ह्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतो.

जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे | Documents Required for PMJJBY

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  •  मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट साईज फोटो

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा कालावधी | Term of Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana

ह्या विम्याचा कालावधी १ जून ते ३१ मे पर्यत एक वर्षाचा असतो. परंतु दरवर्षी ह्या विम्याचे आपोआप नुतनीकरण होत असते. त्यासाठी आपल्या खात्यामध्ये विम्याच्या हप्त्यापुरती शिल्लक रक्कम ठेवावी लागते.

त्यानंतर दरवर्षी आपल्या खात्यातून हप्त्याची रक्कम आपोआप वजा होईल म्हणजेच ऑटो डेबिट होऊन आपला विमा पुढील एका वर्षासाठी वाढवला जातो.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा हफ्ता | Premium of PMJJBY

या योजनेचा वार्षिक हफ्ता हा ४३६ रुपये असून अर्ज केल्यानंतर तो आपल्या खात्यातून वजा केला जातो. हि सेवा १८ ते ५० वर्षामधील लोकांसाठी असते.  

४३६ हि हफ्ताची  रक्कम दरवर्षी मे महिन्यामध्ये आपोआप (Auto Debit) म्हणजे आपल्या खात्यातून कमी केली जाते. त्यामुळे मे महिन्यामध्ये आपल्याला आपल्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम शिल्लक ठेवावी लागते.

जर मे महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम शिल्लक नसेल तर आपला विमा आपोआप बंद होईल.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचे नुतनीकरण | Renewal of PMJJBY

आपल्या खात्यामधून मे महिन्यामध्ये आपल्या हप्त्याची रक्कम ४३६ रुपये डेबिट किंवा कमी झाले असतील तर आपल्या विम्याचे आपोआप नुतनीकरण (Renew) केले जाते.

जर आपल्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम ४३६ रुपये शिल्लक नसेल तर आपला विमा बंद होतो.

त्यानंतर जर आपल्याला विमा चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी पुन्हा नवीन फोर्म भरून द्यावा लागेल. आणि हे जर टाळायचे असल्यास आपल्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम शिल्लक ठेवावी लागेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचे फायदे | Benefits of PMJJBY

  • विमाधारकाचा कोणत्याही प्रकारे (नैसगिक किंवा अपघाती) मृत्यू झाल्यास वारसदाराला किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.
  • योजनेत सहभागी झालेल्या त्या व्यक्तीचे वय 18 ते 55  असेल (त्यापेक्षा जास्त नाही)  आणि कोणत्याही कारणाने मृत्यू झाला असेल तरच त्या व्यक्तीच्या वारसास 2,00,000  रुपये रक्कम मिळेल. म्हणजेच हि योजना वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत विमा कव्हर देते.
  • हि योजना मुदत विमा योजना असल्यामुळे मॅच्युरिटी बेनिफिट, सरेंडर व्हॅल्यू अश्या गोष्टीचा लाभ ह्यामध्ये होत नाही.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने कवर समाप्ती | Termination of Cover of PMJJBY

सदर विम्याचे कवर कोणत्या कारणामुळे समाप्त होते ते पाहू .

  • विमाधारकाचे वय ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विम्याचे कवर समाप्त होते.
  • योजनेला लिंक असलेले बँकेतील खाते बंद झालेच किंवा बंद केले गेले असेल विम्याचे कवर समाप्त होते.
  • मे महिन्यामध्ये खात्यामध्ये  हप्त्याची रक्कम शिल्लक नसेल तर विम्याचे कवर समाप्त होते.
  • जर एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असल्यास आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी सदर विम्याचा अर्ज केला तरीही आपणास विम्याचे कवच फक्त एकाच खात्याला मिळते .

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा दावा (क्लेम) कसा करावा | How to Claim for PMJJBY

PMJJBY ची क्लेम प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही दावा कसा करू शकता हे आपण पाहू.

  • विमाधारकाच्या निधनानंतर लाभार्थ्याने ज्या बँकेचे बचत खाते योजनेशी जोडलेले आहे त्या बँकेला भेट द्यावी. येथे वारसदाराने वेबसाइटवरून डाउनलोड केलेल्या PMJJBY क्लेम फॉर्मसह विमाधारकाचे मृत्यूप्रमाणपत्र (मृत्यूचा दाखला) देणे आवश्यक असते.
  • तसेच हा क्लेम फॉर्म लाभार्थी बँकेकडून किंवा विमा कंपनीकडून सुद्धा घेवू शकतो.
  • विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील, डिस्चार्ज पावती, कॅन्सल चेक आणि नॉमिनीचे बँक तपशील यासारख्या आवश्यक कागदपत्रांसह आपला फॉर्म बँकेत किंवा विमा कंपनीत सबमिट करावा. 
  • त्यानंतर बँकेने आपली आवश्यक ती कागदपत्रे आणि दावा (क्लेम) फॉर्मची पडताळणी केल्यानंतर, विम्याची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसंबंधी आधिक माहिती कुठे मिळेल? | Imformation about PMJJBY

 

pmjjby premium 436 plan details/pmjjby in marathi बद्दल आपल्याला कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना टोल फ्री हेल्पलाइन नंबर दिले आहे. त्यावर आपल्याला  अधिक माहितीसाठी www.jansuraksha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती घेता येईल किंवा National Toll Free Number 1800-180-1111/ 1800-110-001 या नंबर वरती संपर्क साधता येईल.

pmjjby information in marathi, pmjjby full form in marathi, pmjjby policy in marathi बद्दलची हि माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर कंमेंट करून कळवा. लेख आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास share करायला विसरू नका.


Spread the love

Post Comment

You May Have Missed