फक्त 55 रुपये गुंतवा आणि प्रति महिना मिळवा बंपर पेन्शन! | पीएम किसान मानधन योजना | पहा सरकारची भन्नाट गुंतवणुकीची योजना

PM Kisan Mandhan Yojana in Marathi
Spread the love

PM Kisan Mandhan Yojana : केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांकरिता विविध बचत योजना राबवल्या जातात. यामध्ये पीएम किसान योजना, पीएम किसान मानधन योजना, पीएम श्रम योगी योजना, तसेच पीएम जनधन योजना इत्यादी योजना अगदी तत्परतीने राबवल्या जात आहेत. यामध्ये पीएम किसान मानधन योजनेचा सुद्धा तितकाच समावेश केला गेला आहे. PM Kisan Mandhan Yojana in Marathi.

पीएम किसान मानधन योजना | PM Kisan Mandhan Yojana in Marathi

पीएम किसान मानधन योजना या शासकीय योजनेमध्ये वयाच्या 60 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 रुपयांपासून दोनशे रुपयांचा मासिक हप्ता भरून प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन मिळू शकतात. ही योजना नक्की कशी काम करते आणि कोण कोणते नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील?. 

पीएम किसान मानधन योजनेची वैशिष्ठे

  • सरकार 18 वर्षांपासून चाळीस वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही पेन्शन योजना राबवत आहे.
  • या योजनेमध्ये उमेदवार नागरिकाला प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळते.
  • यामध्ये वयाच्या 60 वर्षानंतर शेतकरी वर्गाला किंवा नागरिकांना तीन हजार रुपये इतकी रक्कम मिळते. म्हणजे प्रत्येक वर्षाला 36 हजार रुपये मिळत आहेत.
  • या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटामधील नागरिक नोंदणी करू शकणार आहेत.
  • वयानुसार शेतकऱ्यांना साठ वर्षांसाठी कमीत कमी 55 रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला जमा करावे लागतील.
  • ज्यावेळी नागरिकांना साठ वर्षे पूर्ण होतील त्यावेळी त्यांचे हप्ते पूर्णपणे बंद होतात आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळतो.

या पेन्शनसाठी कसा अर्ज करायचा?

पीएम किसान मानधन योजना (PMKMY) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना जमीनशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच बँक खाते आधार कार्ड चे झेरॉक्स व इतर महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जावीत.

मिळालेला जो काही पेन्शन योजनेचा नोंदणी क्रमांक आहे, तो तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करावा लागणार आहे.

तिथून पुढे तुम्हाला पेन्शन नंबर तसेच पेन्शन कार्ड देखील मिळेल. या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 1800-3000-3468 या नंबर वर संपर्क करू शकता.

तसेच तुम्हाला या योजनेच्या अधिकृत https://pmkmy.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.

पेन्शन कोणाला मिळते?

पीएम किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत नक्की कोणत्या नागरिकांना लाभ घेता येईल? तर ज्या नागरिकांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन मिळवता येईल.

या पेन्शन योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर आपल्या जवळील पोस्ट ऑफिस च्या शाखेमध्ये जाऊन अधिक माहिती मिळवू शकता आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकता.

pm kisan mandhan yojana in marathi, पीएम किसान मानधन योजना शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

पंतप्रधान किसान मानधन योजना कधी सुरू झाली?

31 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान मानधन योजना 2023 लाँच केली.

पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी कोण पात्र आहे?

18 ते 40 वयोगटातील शेतकरी PM किसान मानधन योजनेचा (PMKMY) लाभ घेऊ शकतात. यामध्ये, तुम्ही तुमच्या वयानुसार दर महिन्याला योगदान दिल्यास, वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला मासिक 3,000 रुपये किंवा वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळेल.


Spread the love
Previous post

गुंतवणुकीच्या या ‘4’ फायदेशीर योजना! करबचतीसह मिळत आहे बंपर परतावा | कर बचत योजना | वाचा सविस्तर

Next post

बँक लॉकर मध्ये मौल्यवान वस्तू ठेवण्या आधी ही माहिती नक्कीच वाचा; | Bank Locker Information in Marathi | तुम्हाला माहित आहेत का हे नियम?

You May Have Missed