इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? | Net Banking Information in Marathi | इंटरनेट बँकिंगचा वापर कसा करायचा, फायदे इत्यादी.

internet banking information in marathi
Spread the love

आताच्या काळात सगळ्यासोबत आपणास चालायचे असेल तर टेक्नोलॉजीचा वापर करता येणे अत्यंत गरजेचे झाले आहे. इंटरनेटने जगात प्रवेश केल्यापासून बँकिंग उद्योगात अनेक बदल झाले.(net banking information in marathi).

इंटरनेटची माहिती लोकांना नव्हती तेव्हा बँकिंग व्यवहार करण्यासाठी, आपल्याला  बँकेत जावून आपल्या नंबर ची वाट पाहावी लागायची. मग जरी आपल्याला फक्त आपल्या खात्यातील शिल्लक जाणून घ्यायची असेल, रोख रक्कम काढायची असेल किंवा रक्कम हस्तांतरित करायची असेल तरीही थेट बँकेत जावे लागायचे.

पण आता बँका आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग ची सुविधा पुरवत आहेत. इंटरनेट बँकिंगवरून आपण घरबसल्या व्यवहार करू शकतो. त्या इंटरनेट बँकिंगविषयी आपण आज जाणून घेणार आहोत जसे कि इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? (net banking information in marathi) त्याचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे, तोटे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती ह्या लेखात आपण घेणार आहोत.

इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? | Net Banking Information in Marathi

इंटरनेट बँकिंगला Net banking, Online banking, virtual Banking  असेही म्हणतात (net banking information in marathi) . ही एक अशी पद्धत आहे ज्यात बँका आपल्याला म्हणजेच ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पद्धतीने सोयीसुविधा देते. आपल्याला अंगदी काही  मिनिटांत आर्थिक आणि गैर-वित्तीय बँकिंग व्यवहार करता येतात. त्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची काही गरज नाही.

बँके खाते असलेला कोणताही ग्राहक इंटरनेट बँकिंग किंवा नेटबँकिंग वापरू शकतो. त्यासाठी आपले बँकेत खाते असणे अत्यंत गरजेचे आहे. हि सुविधा बऱ्यापेकी सगळ्याच बँकांकडे उपलब्ध आहे.

इंटरनेट बँकिंगचा वापर कसा करावा? | how to use internet banking

इंटरनेट बँकिंग आपण दोन पद्धतीने चालू करू शकतो.

ऑनलाइन इंटरनेट बँकिंग | Online Internet Banking

ऑफलाइन  इंटरनेट बँकिंग | Offline Internet Banking

ऑनलाइन इंटरनेट बँकिंग कसे सुरु करावे? | How to start Online Internet Banking?

नेट बँकिंग ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल याचा आपण अभ्यास करू.

  • नेटबँकिंग सुरु करण्यासाठी आपले ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या official  वेबसाईट Open करावी. (ती वेबसाईट https ने सुरवात झालेली असावी.) जसे कि hdfc bank netbanking, net banking icici.
  • त्यानंतर login किंवा New register ह्या option वर क्लिक करावे.
  • आपल्याला आपला मोबाईल नंबर नोंदणी करावा लागेल.
  • त्यानंतर आपल्याला आपली सगळी माहिती जसे खाते क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, CIF क्रमांक, डेबिट कार्ड माहिती आणि इतर माहिती भरून फार्म sumbit करावा लागेल.
  • आपण दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल तो त्यात भरवा लागेल.
  • त्यानंतर आपल्याला बँकेने दिलेला User ID आणि Password टाकावा लागेल. त्यानंतर आपण इंटरनेट बँकिंग चा वापर करू शकतो.

ऑफलाइन इंटरनेट बँकिंग कसे सुरु करावे? | How to start Offline Internet Banking?

नेट बँकिंग ऑफलाइन सुविधेचा वापर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील ह्याचाही आपण अभ्यास करू.

  • आपल्याला आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर Net banking चालू करण्यासाठीचा फॉर्म भरून द्यावा लागेल.
  • त्यासोबत आपल्याला आवश्यक ती कागदपत्रे जसे की बँक पासबुक, आधार कार्ड इ. आणि ज्या त्या बँकेच्या नियमानुसार आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतील.
  • इंटरनेट बँकिंग अर्ज आणि संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर, पडताळणी झाल्यानंतर बँकेकडून User ID आणि Password पोस्टाने पाठवला जाईल.

त्यांचा वापर करून इंटरनेट बँकिंग आपण चालू करू शकतो.

IDFC First Bank Credit Card online apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

नेटबँकिंगचे फायदे | Benefits of Internet Banking in Marathi

  • आपण नेट बँकिंग चा वापर 24*7 करू शकतो. म्हणजेच आठवड्याचे ७ दिवस आणि दिवसाचे २४ तास ऑनलाइन बँकिंगचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.
  • नेट बँकिंग चा वापर केल्यामुळे आपला बहुमुल्य वेळ वाचवता येतो.
  • त्याशिवाय आपण नेट बँकिंगद्वारे Money transfer जसे कि RTGS, NEFT, एफडी आणि आरडी तयार करणे, कर्जाचे हप्ते भरणे अश्या गोष्टी करू शकतो.
  •  आपल्या व्यवहारांवर लक्ष ठेवू शकतो. म्हणजेच बँकचे statment चेक करू शकतो.
  • नेट बँकिंग म्हणजे कॅशलेस व्यवहार असल्यामुळे तो अगदी सुरक्षित असतो.
  • User ID आणि Password मुळे नेट बँकिंग सुरक्षित आणि सोयीचे आहे.
  • तसेच चेकबुक ऑर्डर करणे, खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, पासबुक मिळवणे इत्यादी आवश्यक गोष्टी सहज करू शकतो.
  • जर आपले डेबिट/क्रेडिट कार्ड हरवले किंवा काही आर्थिक प्रोब्लेम झाला तर आपण नेट बँकिंग वापरून डेबिट/क्रेडिट कार्ड सहजपणे ब्लॉक करू शकतो.
  • नेट बँकिंग चा वापर करून  आपण आपला संपर्क पत्ता किंवा पर्यायी पत्ता बदलणे सोयीचे होते.
  • नेट बँकिंगचा वापर करून आपण बँक आणि तिच्या सेवांबद्दल अधिक माहिती घेऊ शकतो.
  • तसेच आपण नेट बँकिंग वापर केल्यामुळे ऑनलाईन app चा वापर करून कॅशबक मिळवू शकतो. (Google pay, Phone pay, Amazon)

नेटबँकिंगचे तोटे | Disadvantages of Internet Banking

प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे आहेत तसे तोटे असणारच त्यांचा हि अभ्यास आपण करू.

  • नेट बँकिंग चा वापर करण्यासाठी आपल्याला कॉम्पुटर किंवा laptop असणे गरजेचे असते.
  • त्यासाठी महत्वाचे म्हणजे इंटरनेट असावेच लागते. त्याशिवाय कोणतेही काम होवू शकत नाही.
  • नेट बँकिंग हे ऑनलाईन पद्धतीने काम करत असल्यामुळे माहिती चोरी होण्याचा धोका असू शकतो.
  • काही वेळा बँकेच्या website चा प्रोब्लेम असेल किंवा सर्वर down असेल तर व्यवहार करण्यसाठी प्रोब्लेम होवू शकतो.
  • तसेच इंटरनेट बँकिंग चा वापर करताना ते कुठेही login करणे धोक्याचे असते.

इंटरनेट बँकिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? | What are the things to be careful while doing internet banking?

  • आपल्या बँक खात्यात ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षित व्यवहार करण्यासाठी सर्व योग्य माहिती योग्य भरल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
  • आपले बँक स्टेटमेंट वारंवार चेक करा आणि आणि काही चुकीचे जाणवल्यास आपल्या बँकेकडे तक्रार करावी.
  • कोणत्याही नेट कॅफे सारख्या सार्वजनिक ठिकाणी कधीही नेट बँकिंगचा वापर करू नका, त्यामुळे आपली माहिती लीक होण्याची शक्यता आहे.
  • आपला पासवर्ड वेळोवेळी बदलत राह्ल्यामुळे आपले खाते हॅक होण्याची भीती राहणार नाही.
  • महत्वाची गोष्ट लक्षात असणे गरजेचे आहे ते म्हणजे आपण कॉम्पुटर आणि laptop ह्यावरून  नेट बँकिंग करत असाल त्या डिव्हाइसमध्ये एक चांगला अँटी-व्हायरस मारणे गरजचे आहे.
  • नेट बँकिंग करताना आपल्याला काही अडचण आल्यास किंवा आपल्याला  काही शंका असल्यास ताबडतोब आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा.
  • जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा फोन आला आणि आपल्या खात्याशी संबंधित माहिती विचारली गेली, तर ही माहिती फोनवर कोणालाही देऊ नये ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.
  • आपला वैयक्तिक तपशील किंवा पासवर्ड विचारणाऱ्या कोणत्याही बँकेच्या असल्याचा दावा करणाऱ्या ईमेलला उत्तर देऊ नका.

Internet Banking (Net Banking information in marathi) बद्दलची हि माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर कंमेंट करून कळवा. लेख आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास share करायला विसरू नका.

आपण बँकेत न जाता नेट बँकिंग सुरू करू शकतो का?

आपण आपले डेबिट कार्ड तपशील टाकून बँकेच्या शाखेत न जाता आपले नेट बँकिंग खाते चालू करू शकता. परंतु ज्या वापरकर्त्यांकडे डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड तपशील नाहीत, त्यांना इंटरनेट बँकिंग नोंदणीसाठी बँक शाखेत जावे लागेल.

नेट बँकिंगसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

बँक पासबुकची एक प्रत, आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह आपण आपल्या शाखेमध्ये इंटरनेट बँकिंग अर्ज सादर करू शकता.
बँक सर्व माहितीची पडताळणी करेल आणि नंतर इंटरनेट बँकिंगसाठी ग्राहक आयडी आणि पासवर्ड जारी करेल.


Spread the love

Post Comment

You May Have Missed