NEFT आता करता येणार 24/7 | NEFT Meaning in Marathi | NEFT म्हणजे काय?

neft meaning in marathi
Spread the love

आज बँकिंग क्षेत्र इतकं प्रगतशील झाले आहे की बँक ग्राहकांना कमी व्याजात कर्ज, क्रेडिट कार्ड, अश्या वेगवेगळ्या सुविधा देत आहे.

त्याच बरोबर बँक आपल्यासोबत ग्राहकांचा ही वेळ वाचवण्यासाठी आणि त्यांची कामे सुलभ आणि सोपी करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा राबवत आहे त्यातीलच एक म्हणजे NEFT.त्याच NEFT विषयी म्हणजेच NEFT  म्हणजे काय?, neft meaning in marathi, NEFT कशी करावी, NEFT चे फायदे इत्यादी सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

NEFT ही अशी एक सुविधा आहे यामुळे एक व्यक्ती एक बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो. याबद्दल अजूनही आपल्याला जास्त माहिती नाही. आज आपल्या घाईगड्बडीच्या आयुष्यात आपल्याला आपली  कामे लवकरात लवकर व्हावी असे वाटते. त्यामुळे आपला विचार करून बँकांनी ऑनलाइन  पेमेंट ची सुविधा निर्माण केली.

तश्या भरपूर सुविधा आहेत त्यापैकीच एक NEFT आहे. आता आपण बँकेत न जाता  आपले पैसे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करू शकतो. NEFT हि  कमी वेळेत आणि जलद गतीने  पैसे पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्याची एक ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत  आहे.

NEFT म्हणजे काय? | NEFT Meaning in Marathi

NEFT म्हणजे अशी एक पध्दत जी आपल्या कोणत्याही वेळेला दोन व्यक्ती किंवा दोन बँक यांच्यामध्ये पैशांचे व्यवहार करण्याची एक सुलभ सुविधा आहे.

NEFT हि २००५ मध्ये सुरु झाली आता ती सर्व बँकेने स्वीकारली आहे .पण त्या मध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची  ती म्हणजे  आपल्याला पैसे पाठवत आहेत त्याची बँक NEFT साठी उपलब्ध असणे जरुरीचे असते.

NEFT चा फुल फॉर्म | NEFT full form in Marathi

NEFT चा फुल फॉर्म हा (National Electronic Funds Transfer) असा आहे . NEFT  ला मराठी मध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण असे म्हणले जाते.  

NEFT कसे काम करते? | How NEFT works?

NEFT व्यवहार करण्यासाठी इंटरनेट बँकिंग & मोबाईल बँकिंग असणे  गरजेचे असते. तसेच  NEFT  ही आपण बँकेतून  सुद्धा करू  शकतो.

याशिवाय आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या व्यक्तीची  संपूर्ण माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. जसे की  नाव, त्यांचा Account No, Branch चे नाव, आयएफएससी कोड (IFSC Code) इत्यादी.

NEFT  करताना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्व प्रथम NEFT हा option निवडावा आपल्याला ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्याची माहिती भरून जसे की  नाव, त्यांचा Account No, Branch चे नाव, आयएफएससी कोड (IFSC Code) रक्कम इत्यादी.

त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर पैसे ट्रान्सफर  होतील. हि सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही तासांचा वेळ लागतो. त्यानंतर आपली रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर होईल. थोडक्यात त्या व्यक्तीला त्याच्या बँक खात्यातून दुसर्या व्यक्तीच्या बँक खात्यात NEFT च्या प्रक्रियेद्वारे Money Transfer करता येते.

NEFT चा मोठा फायदा म्हणजे आपण कोणत्याही बँकेतून  कोणत्याही खात्यातून कोणत्याही ठिकाणी असलेल्या इतर बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो. फक्त एकच अट आहे की पैसे पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या व्यक्तींच्या दोन्ही बँक शाखा NEFT पेमेंट साठी सक्षम असाव्यात. 

तुम्ही RBI च्या वेबसाइटवर NEFT सक्षम बँक शाखांची list देखील पाहू शकता किंवा त्या विषयीच्या माहितीसाठी तुम्ही  तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा सेवेला कॉल करू शकता.

NEFT ची वेळ काय असते? What is NEFT Timings?

NEFT वरून रक्कम  ट्रान्सफर करण्यासाठी  वेळेवर कोणतेही निर्बंध नाहीत. NEFT व्यवहार 24*7 करता येतात (neft timings).

NEFT ट्रान्सफर लिमिट काय आहे? What is NEFT Transfer Limit?

NEFT द्वारे पैसे  ट्रान्सफर करता येणाऱ्या रकमेवर कमाल आणि किमान मर्यादा नाही.

NEFT आणि RTGS विषयी माहिती | Information about NEFT and RTGS

नेट बॅंकिंग किंवा मोबाइल बँकिंग  करताना होणारा गोंधळ टाळण्यासाठी NEFT आणि RTGS यांच्यामध्ये  नेमका काय फरक ते जाणून घेवू .

National Electronic Fund Transfer (NEFT)

(NEFT) ही भारतातील सर्वात प्रमुख पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची एक महत्व पूर्ण प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबर २००५ पासून सुरु करण्यात आली. या पद्धतीने पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत, या प्रक्रियेसाठी  प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे ट्रान्सफर केले जातात.

Real Time Gross Settlement (RTGS)

RTGS ही प्रक्रिया सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे.  जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रक्रियाचा वापर करतात.

RTGS प्रक्रिया द्वारे  पैसे लगेच ट्रान्सफर होतात  या पद्धतीमध्ये OK करताच लगेच पैसे समोरच्या व्यक्तीच्या  खात्यामध्ये ट्रान्सफर  होतात.

NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे? What is Difference between NEFT and RTGS

  • NEFT द्वारे आपण कमीतकमी लहान खाते धारकसुद्धा  पैसे ट्रान्सफर करू शकतात. तर RTGS चा वापर करून  मोठमोठ्या उद्योग आणि कंपन्या पैसे ट्रान्सफर करू शकतात.
  • NEFT द्वारे कमीतकमी १ रुपया इतकी रक्कम ट्रान्सफर करू शकतो परंतु RTGS मधून कमीत कमी २ लाख रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर  करणे  गरजेचे असते.
  • NEFT मधून कधीकधी  रक्कम ट्रान्सफर होण्यासाठी वेळ  लागू शकतो, पण RTGS मधून रक्कम ट्रान्सफर अगदी त्वरित होते.

NEFT कशी करायची? How to do NEFT?

ऑनलाईन  प्रक्रिया | Online Process

  • NEFT द्वारे ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग करत नसाल तर तुम्ही बँकेत जाऊन ही NEFT साठी अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी, प्रथम इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगला लॉग इन करा.
  • यानंतर आपल्याला ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचे खाते Add करावे लागते.  त्यामुळे तुम्हाला ज्यांना पैसे पाठवायचे जसे कि मित्राचे किंवा नातेवाईकाचे खाते Add Payee वर जाऊन जोडावे लागेल.  यानंतर तुमच्या खात्यात नवीन लाभार्थी जोडला जाईल.
  • खाते जोडल्यानंतर, तुम्हाला काही वेळाची वाट पाहावी लागेल. नवीन खाते जोडण्यासाठी, आपल्याला त्या व्यक्तीचे महत्त्वाचे तपशील जसे कि ( बँकेचे नाव, खाते क्रमांक, नाव, IFSC कोड, शाखेचे नाव इ). भरणे आवश्यक आहे.
  • Add new Payee द्वारे नवीन लाभार्थी खाते Add केल्यानंतर तुम्हाला फंड ट्रान्सफर Option वर  जावे लागेल.
  • फंड ट्रान्स्फर वर जाऊन, RTGS, NEFT आणि IMPS ह्यातील, NEFT  Option  निवडावा.
  • त्यानंतर, आपल्याला पाठवायची रक्कम टाकावी आणि Pay हा Option निवडावा. आपले पैसे त्या व्यक्तीला  ट्रान्सफर होतील.

ऑफलाईन प्रक्रिया | Offline Process

  • जर तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग & मोबाईल  बँकिंग सुविधा नसेल तर तुम्ही NEFT ऑफलाइन पद्धतीने  सुद्धा करू शकता. 
  • ऑफलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जावे लागेल.        
  • ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्याची सगळी माहिती जसे कि नाव, बँक शाखेचे नाव, IFSC कोड, खात्याचा प्रकार आणि खाते क्रमांक  तुम्हाला ज्या बँकेला द्यावे लागेल  त्यानंतर आपली रक्कम सांगावी लागेल.
  • त्यानंतर आपण आपल्या खात्यामधून   ती रक्कम डेबिट करून   त्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करण्याचा अधिकार आपल्या  बँकेला देतो.
  • NEFT  चा  फॉर्म सर्व माहिती भरल्यानंतर, बँकेत जमा केल्यानंतर बँक  पुढील प्रक्रिया पूर्ण करते आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतील.

NEFT द्वारे रक्कम पाठवण्यासाठी किती चार्जेस आकारले जातात? | How much is NEFT Charges?

महत्वाचे असे कि ज्यांना आपण पैसे पाठवले त्यांना कोणत्याही प्रकारचे चार्जेस बँक आकारत नाही, पण जे पैसे पाठवतात त्यांना बँक चार्जेस आकारते  ते  खालीलप्रमाणे

व्यवहार रक्कम = NEFT Charges

रु 10,000 पर्यंत रक्कम. =रु 2.50 + GST

रु 10000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम = रु 5 + GST

रु 1 लाखांपेक्षा जास्त आणि 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम = रु 15 + GST

रु 2 लाखांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंतची रक्कम = रु 25 + GST

रु 5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंतची रक्कम. = रु 25 + GST

NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करण्या बाबत काही महत्त्वाचे मुद्दे | Important Points regarding NEFT Transfer

  • RTGS द्वारे किमान 2 लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते. NEFT साठी कोणतीही अगदी १रु.  इतकी हि रक्कम पाठवू शकतो.
  • NEFT द्वारे आपण  कर्जाचे EMI, क्रेडिट कार्डचे बिल  आणि इतर कोणतेही पेमेंट करण्यासाठी वापरू शकतो. म्हणून, NEFT हि प्रक्रिया  केवळ वैयक्तिक पैसे ट्रान्सफर पुरती नाही.

neft Meaning in Marathi, NEFT म्हणजे काय?, NEFT कशी करायची? याबद्दलची माहिती उपयुक्त वाटली असेल तर कंमेंट करून जरूर कळवा. लेख आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास share करायला विसरू नका.

NEFT प्रणालीद्वारे पाठवल्या जाणार्‍या निधी / रकमेवर काही मर्यादा आहे का? (NEFT Charges)

नाही, NEFT प्रणालीद्वारे निधी हस्तांतरणासाठी RBI ने कोणतीही मर्यादा लादलेली नाही.

NEFT चे कामकाजाचे तास काय आहेत?

एनईएफटी प्रणाली संपूर्ण वर्षभर चोवीस तास उपलब्ध असते.


Spread the love

Post Comment

You May Have Missed