अशी करा KYC प्रक्रिया | KYC Full Form in Marathi | KYC म्हणजे काय?

kyc full form in marathi
Spread the love

सध्या बँकांचे आणि इतर व्यवहार सुद्धा डिजिटल केले जात असल्यामुळे के वाय सी चे महत्व वाढले आहे. आपण या लेखामध्ये KYC म्हणजे काय? तसेच what is Kyc in Marathi, kyc full form in Marathi, KYC meaning in marathi, what is kyc documents, Why KYC is important याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

सध्या आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात के वाय सी हा शब्द वारंवार ऐकत असतो. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये तसेच पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढत असताना, डिमॅट खाते , म्युच्युअल फंड मध्ये व्यवहार करत असताना विमा काढत असताना आपल्याला के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

बँकांकडूनही वेळोवेळी आपल्या ग्राहकांना के वाय सी पूर्ण करण्याबाबत सांगितले जाते. विविध प्रकारचे Apps (UPI) सुद्धा ग्राहकांची के वाय सी ची पूर्तता करत असल्याचे आपण बघितले असेल.

के वाय सी म्हणजे काय ? | What is KYC in Marathi? | KYC Meaning in Marathi

के वाय सी म्हणजे थोडक्यात आपल्या ग्राहकाची ओळख. संबंधित बँक किंवा वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांकडून पहिल्यांदा के वाय सी ची मागणी करतात.

म्हणजे त्या आपल्या ग्राहकाची ओळख पटवतात.  त्या आधारे त्या ग्राहकाचे नाव , पत्ता , जन्मतारीख इत्यादी गोष्टींची माहिती त्यांना मिळते. के वाय सी ची पूर्तता केल्यामुळे ग्राहक आपला व्यवहार आपल्या नावाने सुरक्षित पणे करू शकतात.

के वाय सी फुल्ल फॉर्म  | KYC Full Form in Marathi

के वाय सी चा फुल्ल फॉर्म नो युअर कस्टमर (Know Your Customer) असा असून त्याचा अर्थ आपल्या ग्राहकाची ओळख असा होतो. त्यानुसार प्रत्येक ग्राहकाने आपल्या संस्थेकडे आपली ओळख देणे म्हणजेच के वाय सी ची पूर्तता करणे RBI  ने बंधनकारक केले आहे.

के वाय सी ची आवश्यकता  | Why KYC is important?

के वाय सी ची आवश्यकता काय किंवा के वाय सी करण्याची गरज काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर के वाय सी हि आपली ओळख आपल्या बँकेकडे किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थांकडे पटवण्यासाठी आवश्यकता असते.

त्यानुसार आपण आपली ओळख पटवतो आणि आपल्या नावाने सुरक्षित व्यवहार  करू शकतो. एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने एखादा आर्थिक व्यवहार करत असेल तर त्यावरती आळा घालता येऊ शकतो. कोणतेही अनधिकृत व्यवहार के वाय सी पूर्ततेने टाळता येतात .

बँकांना ग्राहकांकडून केले जाणारे अनधिकृत व्यवहार तसेच दहशतवाद्यांना केला जाणारा आर्थिक पुरवठा यावरती आळा घालता येऊ शकतो. त्यानुसार अनधिकृत व्यवहार आणि त्या व्यवहारांमुळे होणारे नुकसान टाळता येते.

अशा प्रकारचा व्यवहार आढळून आला तर त्या ग्राहकापर्यंत सहजपणे पोहोचता येते.  बँक आणि वित्तीय संस्थांना ग्राहकांची  के वाय सी करणे आवश्यक केलेले आहे.

के वाय सी कधी करावी ? | When to do KYC

सगळ्यात सुरवातीला म्हणजेच बँकांमध्ये, पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडताना किंवा डिमॅट खाते, म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये खाते उघडताना के वाय सी ची पूर्तता करावी लागते.(Whatsapp Payment)

बँकांमध्ये के वाय सी ची पूर्तता हि त्या ग्राहकाच्या जोखमी नुसार केली जाते. म्हणजे जर एखादा ग्राहक जास्त जोखमीचा असेल तर त्याची के वाय ची पूर्तता दर दोन वर्षातून करावी लागते.

त्याच प्रमाणे मध्यम जोखमीसाठी दर आठ वर्षातून आणि कमी जोखमीच्या ग्राहकांसाठी दर दहा वर्षातून के वाय सी ची पूर्तता करावी लागते.

के वाय सी साठी लागणारी कागदपत्रे | What is KYC Documents

के वाय सी पूर्तता करण्यासाठी दोन प्रकारची कागदपत्रे लागतात (kyc documents) त्यामध्ये ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा यांचा समावेश होतो.

ओळखीचा पुरावा  (Identity Proof)

  • १. पासपोर्ट  (Passport)
  • २. पॅन कार्ड  (PAN Card)
  • ३. मतदान ओळखपत्र  (Voter ID Card)
  • ४. चालक परवाना  (Driving License)
  • ५. आधार कार्ड  (Aadhar Card)

पत्त्याचा पुरावा  (Address Proof)

  • १. टेलिफोन बिल  (Telephone Bill)
  • २. बँक खात्याचे स्टेटमेंट  (Bank Account Statement)
  • ३. रहिवाशी दाखल  (Residence Certificate)
  • ४. वीज बिल  (Light Bill)

के वाय सी पूर्तता कशी करावी ? | How to do KYC

के वाय सी पूर्तता करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा बँक किंवा वित्तीय संस्था ज्या ठिकाणी आपल्याला के वाय ची करायची आहे तेथील के वाय सी करण्यासाठीचा फॉर्म भरावा लागेल.

त्या फॉर्मसोबत वरील सांगितल्याप्रमाणे कोणतेही दोन कागदपत्रे त्या फॉर्म सोबत जोडून द्यावी लागतील. त्यानंतर ती संस्था आपल्या खात्याला के वाय सी पूर्तता करेल.

के वाय सी चे प्रकार | Types of KYC

आधार आधारित इ के वाय सी | Aadhar based E-KYC

ekyc म्हणजे Electronic-know your customer असा असून हि ekyc प्रक्रिया UIDAI (unique identification Authority of India) कडून चालू केलेली आहे.

यामध्ये आधार कार्ड धारकाला आपल्या अंगठ्याचा ठसा (biometric based verification) द्यावा लागतो किंवा OTP based verification मध्ये आधार कार्ड धारकाच्या मोबाईल वरती otp येतो आणि kyc ची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

हि प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जात असल्याने कोणतेही भौतिक कागदपत्रे सादर करण्याची गरज पडत नाही.

पेपर आधारित के वाय सी | Paper Based KYC

हि के वाय सी ची प्रक्रिया नेहमीप्रमाणे बँकेमध्ये किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये जाऊन स्वतः उपस्थित राहून करावी लागते. यामध्ये के वाय सी ची कागदपत्रे जसे कि ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा के वाय सी चा फॉर्म भरून त्या सोबत जोडून द्यावा लागतो.

सी के वाय सी | CKYC

ckyc म्हणजे central kyc असुन त्याद्वारे आता ग्राहकांना वेगवेगळ्या कामांसाठी जसे कि बँकेत खाते काढणे, विमा पोलिसी घेणे यासाठी वेळोवेळी kyc करण्याची आवश्यकता असणार नाही.

ckyc करण्याची जबाबदारी (cersai) सेंट्रल रेजिस्त्री ऑफ सेक्युरिटायझेशन अँड  अँसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया यांच्यावर देण्यात आलेली आहे.

Video KYC | विडिओ के वाय सी

Video के वाय सी प्रक्रिये मध्ये ग्राहक आणि बँकेचा अधिकारी यांच्यामध्ये विडिओ द्वारे संभाषण होणार असुन त्याद्वारे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

अशा प्रकारच्या kyc प्रक्रिये मध्ये ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. Video के वाय सी ची प्रक्रिया काही बँकांनी चालू केलेली आहे

वर दिलेली के वाय सी बद्दल ची माहिती (KYC म्हणजे काय? तसेच what is Kyc in Marathi, kyc full form in Marathi, KYC meaning in marathi) आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

KYC साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

के वाय सी पूर्तता करण्यासाठी दोन प्रकारची कागदपत्रे लागतात (kyc documents) त्यामध्ये ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा यांचा समावेश होतो.

KYC कुठे मागितली जाते?

बँकांमध्ये, पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडताना किंवा डिमॅट खाते, म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये खाते उघडताना के वाय सी ची पूर्तता करावी लागते.


Spread the love

Post Comment

You May Have Missed