होम लोन विषयी माहिती | Home Loan Information in Marathi | होम लोन म्हणजे काय?

home loan information in marathi
Spread the love

आजच्या या महागाईच्या युगात घर घ्यायचे किंवा बांधायचा विचार जरी केला, तरी पहिला प्रश्न असतो तो म्हणजे घराची किमंत आणि पैश्याचे काय करायचे? आता वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत चालेल्या घरच्या किमंती त्या आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांना घर घेणे जरा अवगडच झाले आहे. पण ह्यावर आता बँकानी पर्याय दिला आहे तो म्हणजे घर बांधण्यासाठी कर्ज. त्याद्वारे आपण आपले घर बनवू शकतो. Home Loan information in Marathi.

गृहकर्जाचे विविध प्रकार आहेत आणि त्यांच्या अटी देखील वेगवेगळ्या आहेत. गृहकर्जाचे व्याजदरही गृहकर्ज योजनांच्या आधारे वेगवेगळे असतात.

या लेखात, होम लोन म्हणजे काय? होम लोन कमी व्याजदरात कर्ज कसे मिळवायचे? (कमी व्याजदरावर गृह कर्ज) त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे आणि बँका एखाद्याचा गृहकर्ज अर्ज कधी मंजूर करतात आणि कधी नाकारतात, होम लोन विषयी माहिती घेवू.

त्याच होम लोन विषयीची सविस्तर माहिती आपण ह्या लेखात जाणून घेवू.

होम लोन म्हणजे काय? | What is Home Loan information in Marathi?

होम लोन म्हणजे अशी एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये बँक आपल्याला ठराविक रक्कम कर्ज स्वरूपात आपल्याला घराच्या बांधकामासाठी  तसेच वेगवेगळ्या घराच्या कामांसाठी देत असते. आपल्याला कर्ज रूपांत मिळालेली रक्कम आपण EMI स्वरूपात बँकेला महिन्याला परत द्यायचे असते. home loan in marathi.

गृहकर्ज हर सुद्धा एक  सुरक्षित कर्जे मानले जाते. जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था गृहकर्ज किंवा होम लोन देते तेव्हा ती कर्जदाराची कोणतीही मालमत्ता सुरक्षा म्हणून घेते.

म्हणजेच, जेव्हाही आपण गृहकर्जासाठी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे जातो, तेव्हा आपल्याला कर्जाच्या बदल्यात आपली मालमत्ता त्यांच्याकडे गहाण ठेवावी लागते.

काही कारणास्तव आपण कर्ज परत करू शकत नसलो, तर  बँक आपल्या  वस्तू विकून दिलेल्या कर्जाची भरपाई करू शकते.

होम लोनचे प्रकार | Types of Home Loans

आपल्या कर्ज घेण्यासाठी बँका/कर्ज देणाऱ्या संस्था वेगवेगळ्या कारणांसाठी गृहकर्ज देतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कशासाठी कर्ज हवे आहे ते माहित असणे गरजेचे असते. त्यातील काही प्रकारचा  आपण अभ्यास करू.

गृहखरेदी कर्ज

रेडी-टू-मूव्ह-इन मालमत्ता (पूर्ण तयार झालेली मालमत्ता)

बांधकामाधीन मालमत्ता आणि पूर्व-मालकीची घरे/पुनर्विक्री मालमत्ता खरेदी करण्यासाठी हे सर्वात सामान्य गृहकर्ज आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक/कर्ज देणाऱ्या संस्था मालमत्ता मूल्याच्या 75-90% पर्यंत गृहकर्ज देऊ शकतात.

संयुक्त कर्ज:

ज्यांना गुंतवणुकीसाठी किंवा घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदी करायचा असेल, त्यांच्यासाठी हे योग्य उपाय आहे. या प्रकारच्या गृहकर्जामध्ये, कर्जाच्या रकमेचा पहिला हप्ता जागा खरेदी करण्यासाठी दिला दिला जातो. मग जसजसे घर तयार होते, तसतसे आपल्याला कर्जाची रक्कम मिळत जाते.

गृह बांधकाम कर्ज/घर बांधण्यासाठी कर्ज

या प्रकारचे कर्ज हे अशा लोकांसाठी असते ज्यांना घर बांधण्यासाठी फक्त पैशांची आवश्यकता आहे. त्याच्याकडे आधीच जमीन असेल आणि त्यावर घर बांधायचे असेल तरच हे कर्ज दिले जाते. ह्या कर्जामध्ये सुद्धा गृहकर्जाची रक्कम घराच्या बांधकामाच्या टप्प्यांनुसार हस्तांतरित किंवा दिली जाते.

गृह नूतनीकरण/सुधारणा कर्ज:

हे कर्ज आपल्या सध्याच्या राहत्या घराचे  नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठीचा खर्च भागवण्यासाठी हे कर्ज मिळू शकते. या कर्जाचा व्याजदर नियमित गृहकर्जाप्रमाणेच असतो. पण त्याची कर्जाची मुदत नियमित गृहकर्जापेक्षा कमी असू शकते.

गृह विस्तार कर्ज:

ज्या लोकांना घरात अतिरिक्त जागा जोडण्यासाठी रक्कमेची आवश्यकता असते. त्यांच्यासाठी हे गृह विस्तार कर्ज असते. या प्रकारच्या कर्जामध्ये बँका/कर्ज देणाऱ्या संस्था सामान्यतः 75-90% रक्कम कर्ज देतात ज्यामुळे घराचे बांधकाम पूर्ण केले जावू शकते.


होम लोन साठीची पात्रता | Eligibility for Home Loan

बँक/कर्ज संस्था आणि कर्ज योजनांनुसार गृहकर्ज पात्रतामध्ये बदल करतात. तथापि, खालील काही सामान्य गृहकर्ज पात्रता निकष आहेत:

  • राष्ट्रीयत्व: अर्जदार भारतीय रहिवासी, अनिवासी भारतीय (NRI) आणि भारतीय वंशाची व्यक्ती (PIO) असणे आवश्यक असते.
  • क्रेडिट स्कोअर: 750 किंवा त्यापेक्षा जास्त चांगला सिबिल स्कोर असावा.
  • वयोमर्यादा: अर्जदाराचे वय हे 18-70 वर्षे पर्यत असावे.
  • कामाचा अनुभव: होम लोनसाठी अर्जदारची नोकरी किमान 2 वर्षे झालेली असावी.
  • व्यवसाय किती जुना आहे: जे नोकरी करत नाहीत त्याच्यासाठी किमान 3 वर्षे बिझनेस करावा लागतो.
  • किमान पगार: किमान रु 25,000 दरमहा (ते बँक ते बँक/कर्ज संस्था बदलते).
  • कर्जाची रक्कम: मालमत्ता मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. (बँक ते बँक/कर्ज संस्था बदलते).

या व्यतिरिक्त, गृहकर्ज पात्रता निकष देखील आपल्या कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी करत आहात आणि ती कुठे खरेदी करत आहात यावर अवलंबून असते.

गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for Home Loan

  • ओळखीचा पुरावा : पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स (कोणत्याही एकाची फोटोकॉपी)
  • वयाचा पुरावा:  आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, दहावीचे मार्कशीट, बँक पासबुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स.
  • राहण्याचा पुरावा: बँक पासबुक, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिल (टेलिफोन बिल, वीज बिल, पाणी बिल, गॅस बिल) आणि एलआयसी पॉलिसीची पावती (कोणत्याही एकाची प्रत).
  • उत्पन्नाचा पुरावा (नोकरीसाठी): फॉर्म 16 ची प्रत, अलीकडील पगार स्लिप, मागील 3 वर्षांचे आयटी रिटर्न (ITR) आणि गुंतवणुकीचा पुरावा (असल्यास)
  • उत्पन्नाचा पुरावा (नोकरी नसलेल्यांसाठी): मागील 3 वर्षांचे आयकर परतावे, ताळेबंद आणि कंपनी/फर्मचे नफा-तोटा खाते विवरण, व्यवसाय परवाना माहिती आणि व्यवसाय पत्त्याचा पुरावा.
  • मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे -सोसायटी/बिल्डरकडून एनओसी, घराच्या बांधकामाच्या खर्चाचा तपशीलवार अंदाज, नोंदणीकृत विक्री कराराची प्रत, वाटप पत्र आणि इमारत आराखड्याची मंजुरी

वरील यादीमध्ये केवळ महत्वाचे मुद्दे दिले आहेत. बँक/कर्ज देणारी संस्था अतिरिक्त कागदपत्रे देखील मागू शकते.

गृहकर्जाचा अर्ज नाकारण्याची कारणे | Reasons for rejection of home loan application

गृहकर्जाचा अर्ज नाकारण्याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतो.

  • आपल्या क्रेडिट अहवालावर चुकीची माहिती असेल तर नाकरले जावू शकतो.
  • इतर बँकांकडून कर्जाचे अर्ज सतत नाकारले गेले असले तरी आपला अर्ज बँक नाकरू शकते.
  • आपले उत्पन्न अस्थिर किंवा कमी असेल तरीही नाकारू शकते.

होम लोन विषयी माहिती जसे कि होम लोन म्हणजे काय?, Home Loan information in Marathi, Home Loan in Marathi, गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, गृहकर्ज माहिती, होम लोन विषयी माहिती शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

गृहकर्ज काय आहे?

गृहकर्ज म्हणजे एखादी व्यक्ती नवीन किंवा पुनर्विक्रीचे घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी किंवा सध्याचे घर वाढवण्यासाठी कर्ज घेते.


Spread the love

Post Comment

You May Have Missed