गोल्ड लोन: नियम, पात्रता, कागदपत्रे | Gold Loan Information in Marathi | सोने तारण कर्ज माहिती

gold loan information in marathi
Spread the love

सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला सोन्याची आवड हि असतेच. विशेषतः महिलांना सोन्याचे दागिने सर्वाधिक आवडतात. सोन्याचे दागिने जिथे स्त्रियांच्या सौदर्यात भर घालतात तसेच वाईट काळातही पैशाची गरज भागवून आर्थिक आधारही देतात. Gold Loan Information in Marathi.

अलीकडच्या बहुतेक लोक सोन्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करतात. कारण सोन्यात केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित असते. त्यांचा महत्वाचा फायदा म्हणजे आर्थिक अडचणीच्यावेळी पुरेसे पैसे नसतील, तर आपल्या घरातील असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर उपलब्ध असलेल्या सुवर्ण कर्जामुळे आपल्याला पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकते. त्याच सोने तारण कर्ज ह्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सोने तारण कर्ज माहिती मराठी | Gold Loan Information in Marathi

आपल्याला कोणतीही बँक किंवा इतर वित्तीय संस्था कोणत्याही व्यक्तीचे सोने तारण म्हणून ठेवून त्या आपल्याला कर्ज देते म्हणजेच गोल्ड लोन. सुवर्ण कर्ज सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत असे मानले जाते.

कर्जदार कर्जाची परतफेड करेपर्यंत सोने बँका किंवा वित्तीय संस्थांच्या देखरेखीखाली सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते.

बँका किंवा वित्तीय संस्थांद्वारे आपले सोने पूर्णपणे सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते.

सोने ही एक अशी गोष्ट आहे जी आवश्यकतेनुसार कमीत कमी वेळेत रोखीत रूपांतरित केली जाऊ शकते. आपल्या गरजेनुसार आपत्कालीन परिस्थितीत गोल्ड लोन घेणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

आपल्याला सोन्याची शुद्धता आणि किंमत यावर अवलंबून 75% ते 90%पर्यंत सोन्यावरील कर्ज दिले जाते. गोल्ड लोन इतर कर्जाच्या तुलनेत कमी व्याजदराने दिले जाते.

सोने तारण कर्ज कसे मिळवायचे? | How to Get Gold Loan

जर आपल्याला सोन्यावर कर्ज घ्याचे असेल तर आपल्याला त्यासाठी बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) शी संपर्क साधावा लागतो. बँक किंवा NBFC आपल्या सोन्याच्या शुद्धतेच्या आधारे कर्ज देते.

  • जर आपल्या सोन्याची शुद्धता 18 कॅरेट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँक आपल्याला आपल्या सोन्याच्या बदल्यात कर्ज देते.
  • आपण ज्या दिवशी सोन्याच्या कर्जासाठी अर्ज करतो. त्या दिवशी सोन्याच्या बाजारभावानुसार कर्जाची रक्कम बँक ठरवते.
  • सोने तारण कर्ज घेताना सोन्याचे मूल्यांकन केल्यानंतरच कर्जाची रक्कम दिली जाते.सोन्यात वापरल्या जाणार्‍या इतर धातूंचे मूल्यांकन केले जात नाही.
  • जर आपल्याकडे 24 कॅरेट सोन्याचे नाणे असेल आणि आपल्याला तारण ठेवायचे असेल तर हे सोन्याचे नाणे बँकेने जारी करणे ते आवश्यक असते.
  • सोन्याचे कर्ज घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या बँकांच्या किंवा NBFC च्या शाखेत जाऊन सोन्यावर उपलब्ध असलेल्या कर्जांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे कधीही योग्यच.
  • गोल्ड लोन इंटरेस्ट रेट हा प्रत्येक बंकेनुसार वेगवेगळा असतो जसे कि ७% पासून २९% पर्यंत.

सोने तारण कर्ज मिळविण्यासाठी बँकांची यादी

सोने तारण कर्ज आपण खालील बँकांमधून घेऊ शकता –

  • मणप्पुरम गोल्ड लोन
  • आईआईएफएल गोल्ड लोन
  • एसबीआई गोल्ड लोन
  • एचडीएफसी गोल्ड लोन

सोने तारण कर्ज पात्रता | Gold Loan Eligibility

  • आपले वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • सोने तारण कर्ज घेणासाठीचा कर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सोने तारण कर्ज  घेण्यासाठी नोकरदार किंवा पगार नसलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकतात.
  • आपल्याला गोल्ड लोनसाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी आपल्या सोन्याची शुद्धता 18 कॅरेट किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक असते.

सुवर्ण कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required for Gold Loan

  • कर्जासाठीचा अर्ज
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • वीज बिल

गोल्ड लोन अर्ज प्रक्रिया | Gold Loan Application Process

ऑफलाइन अर्ज कसा करावा?

आपण आपल्या कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकतो.

आपल्याला सोने तारण कर्ज घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, एखाद्या जवळच्या बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या शाखेत भेट देवून कर्जाचा फॉर्म भरून देवून बँकेच्या सर्व ओपचारीकता पूर्ण करावी.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम, आपण ज्या बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर सुवर्ण कर्ज घ्यायचे आहे त्याला भेट द्यावी.

जर आपल्याला SBI कडून सोने कर्ज घ्यायचे असेल तर आपल्याला त्याच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

त्यानंतर त्या वेबसाईटच्या होम पेजवर गोल्ड लोनचा पर्याय निवडावा.

गोल्ड लोन पेज उघडल्यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक भरल्याची खात्री करावी.

माहिती भरल्यानंतर संबंधित कागदपत्राची प्रत स्कॅन करून अपलोड करावी .

अर्ज स्वीकारल्यानंतर आपले सोने पुढील प्रक्रियेसाठी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे जमा करावे लागेल.

आपल्या सोन्याच्या किमतीनुसार बँक किंवा वित्तीय संस्था कर्जदिले जाईल..

गोल्ड लोनची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

गोल्ड लोनची परतफेड कशी करता येते? | How can the gold loan be repaid?

  • गोल्ड लोनची परतफेड करण्यासाठी अनेक आहेत. जसे की आपण सोने तारण कर्जाचे व्याज मासिक, द्वि-मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक भरणे निवडू शकतो.
  • आपण आपल्या सोयीनुसार मुदतीअखेर कर्जाची मुळ रक्कम पूर्ण भरू शकतो.
  • इतर कर्जाप्रमाणेच आपण व्याज आणि मुद्दल दोन्हींचा समावेश करून नियमित EMI मध्ये देखील कर्जाची परतफेड करू शकतो.

सुवर्ण तारण कर्जाचा परतफेडीचा कालावधी किती असतो?| What is the repayment period of gold mortgage loan?

सोने तारण कर्जाचा कालावधी हा आपल्याला कर्ज देणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेवर अवलंबून असतो. कमीतकमी ३ महीने ते १२ महीने इतका कालावधी आपण निवडू शकतो.

जर १२ महिन्यांहून अधिक कालावधी लागणार असेल तर आपण आपले कर्ज पुनः नूतनीकरण करावे लागते. इतर कर्जाच्या तुलनेत सोने तारण कर्जाचा कालावधी हा खूप कमी असतो.

सोने तारण कर्ज घेण्याचे फायदे | Advantages of taking Gold Loan

  • इतर कर्जाच्या तुलनेत आपल्याला गोल्ड लोन लगेच आणि सहज मिळते.
  • आपल्या पर्सनल लोन च्या तुलनेत सोने तारण कर्जावर खूप कमी व्याज द्यावे लागते.
  • यासाठी आपल्या जास्त कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही.
  • जरी आपला CIBIL स्कोअर खूपच खराब असला तरीही आपण सहज सोन्यावरील कर्ज सहज मिळवू शकतो.
  • सोने तारण कर्जावरील प्रक्रिया शुल्क इतर कर्जाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
  • जर आपण सोने कर्जाची मुदत संपण्यापूर्वी कर्जाची रक्कम परत केली तर आपल्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.पण अधिक व्याज भरावे लागेल.

Gold Loan Information in Marathi, सोने तारण कर्ज माहिती मराठी, मणप्पुरम गोल्ड लोन शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


सोन्यावर कर्ज का घ्यावे?

असुरक्षित कर्जाच्या विपरीत, सुवर्ण कर्जासाठी तुमच्याकडे उत्कृष्ट क्रेडिट इतिहास किंवा उत्कृष्ट CIBIL स्कोर असणे आवश्यक नाही. तुमचे सोन्याचे दागिने कर्जासाठी सुरक्षितता म्हणून काम करतात, ज्यामुळे कर्जदार क्रेडिट इतिहास किंवा कमी क्रेडिट स्कोअर नसतानाही क्रेडिट वाढवण्यास अधिक इच्छुक बनतात.

सोने कर्ज सुरक्षित आहे की नाही?

आणीबाणीच्या परिस्थितीत गोल्ड लोन चांगले आहेत पण एक मोठा तोटा आहे. जर तुम्ही वेळेवर परतफेड करू शकत नसाल तर तुमच्या सोन्याचा लिलाव केला जाईल आणि सामान्यत: या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या सोन्यासाठी प्रतिकूल दर मिळेल.

सोने कर्ज व्याजमुक्त आहे का?

सोने तारण ठेवून घेतलेल्या सुवर्ण कर्जावरील व्याजदर, इतर प्रकारच्या कर्जांपेक्षा तुलनेने कमी आहेत. भारतातील बँका आणि इतर वित्तीय संस्था सुवर्ण कर्ज देतात, ज्यासाठी कर्जाची रक्कम रु. 1500 ते रु. 1.5 कोटी आहे.


Spread the love

Post Comment

You May Have Missed