मुदत ठेवीचे फायदे जाणून थक्क व्हाल | Fixed Deposit Meaning in Marathi | मुदत ठेव म्हणजे काय?

fixed deposit meaning in marathi
Spread the love

पैसा हे मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे साधन आहे. त्याचसाठी आपल्याला भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैशाची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपण  पैसे वाचवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतो. यापैकी एक पर्याय म्हणजे एफडी. एफडीला मराठीत मुदत ठेव खाते असेही म्हणतात. Fixed Deposit Meaning in Marathi.

मुदत ठेव हा एक बचतीचा सुरक्षित आणि सोयीचे पर्याय मानला जातो. एफडी खात्यात आपले पैसे सुरक्षित असतात. तसेच त्यांचा परतावा निश्चित रूपांत मिळतो.

ज्याद्वारे आपल्याला सेव्हिंग खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळतो. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे योजना बाजाराशी जोडलेली नसते.

त्यामुळे बाजारात होणारया चढ-उताराचा आपल्या एफडीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. अश्या Fixed deposit विषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात घेणार आहोत.

मुदत ठेव म्हणजे काय? | Fixed Deposit Meaning in Marathi

Fixed deposit म्हणजे असे एक खाते ज्यामध्ये आपण मुदतीपर्यंत पैसे जमा करतो आणि त्यावर (गुंतवणूकदारांना) निश्चित व्याज मिळते. आपल्या मुदत ठेव खात्यात जमा केलेले पैसे हे आपण ठरवलेल्या निर्धारित वेळेपूर्वी काढता येत नाहीत, तरीही आपल्याला  कोणत्याही कारणास्तव त्यातील पैसे काढायचे असल्यास आपल्याला बँकेला आधी माहिती द्यावी लागते, त्यानंतर काही दंड वजा करून बँक पैसे परत करते.

मुदत ठेवीचे प्रकार | Types of Fixed Deposits

स्टैण्डर्ड टर्म डिपॉजिट्स(Standard Term Deposit)-

स्टँडर्ड टर्म डिपॉझिट्स ह्या योजनेमध्ये पैसे निश्चित वेळेसाठी पूर्व नियोजित व्याज दराने गुंतवले जातात. ह्या योजनेचा कालावधी 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत असू शकतो.

यामध्ये आपल्या गुंतवणुकीचा कालावधीवर आणि आपली गुंतवणूक ह्यावर आपला व्याजदर ज्या त्या वित्तीय संस्था किंवा बँकावर अवलंबून असतात.

रेकरिंग डिपॉजिट (Recurring Fixed Deposit)

रेकरिंग डिपॉजिट ला आवर्ती मुदत ठेव असे म्हटले जाते.आवर्ती ठेव हा देखील एक प्रकारचा मुदत ठेव आहे,

ज्यामध्ये आपली रक्कम हि मासिक किंवा त्रैमासिक सारख्या निश्चित कालावधीत जमा केली जाते.

यामध्ये व्याजदर हा ठरलेला असतो. आपली FD चा कालावधी पूर्ण झाल्यावर आपल्या रकमेसह व्याज मिळते.

सीनियर सिटीजन फिक्स्ड डिपॉजिट्स (Senior Citizens Fixed Deposit)

सीनियर सिटीजन फिक्स्ड डिपॉजिट्सला मराठीत ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव असे म्हटले जाते.

बँका आणि NBFC सामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अश्या लोकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर जास्त व्याजदर दिले जाते.

त्याचप्रमाणे बँक किंवा वित्तीय संस्था ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.

कॉरपोरेट फिक्स्ड डिपॉजिट (Corporate Fixed Deposit)

काही कॉर्पोरेट संस्थासुद्धा FD ठेवी देखील ठेवतात. काही कॉर्पोरेट संस्था आणि NBFC पेक्षा जास्त व्याजदर देतात, परंतु कॉर्पोरेट FD पेक्षा जास्त जोखीम असते.

त्यामध्ये आपले पैसे सुरक्षित असेलच असे नाही. जर एखादी कंपनी दिवाळखोर निघाली तर आपली जमा केलेली रक्कम वसूल केली जाईल याची शाश्वती नसते.

NRI मुदत ठेव (NRI Fixed Deposit)

आपल्या देशातील लोक परदेशी चलनात कमाई करणाऱ्या NRI FD हा एक चांगला पर्याय आहे. चलनात चढउतार आहेत.

परंतु NRI FD चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे व्याजासह संपूर्ण रक्कम करमुक्त आहे.

फिक्स डिपॉजिट व्याजदर किती असतो? | What is the fixed deposit interest rate

आपल्या मुदत ठेवींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असतो तो म्हणजे आपल्याला मिळणारा व्याजदर. हा व्याजदर म्हणजे आपण गुंतवलेल्या रकमेवरचा आपला फायदा असतो.

याबाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी वेगवेगळे नियम जारी करते. त्यानुसार, वित्तीय संस्था किंवा बँका व्याजदर देतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे व्याज दर देतात, त्यामुळे त्यांचा परिणाम मुदत ठेवींवरील प्राप्त रकमेवर होतो.

एफडी खाते कसे उघडावे? | How to open FD account

  • जर आपल्याला एफडी खाते उघडायचे असेल तर त्याची प्रक्रिया सोपी आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा लागेल.
  • आपल्या बँकेकडून मुदत ठेवीबद्दल माहिती घ्या. मुदत ठेवींवरील व्याजाची माहिती घेणे आवश्यक असते.
  • सर्व माहिती मिळाल्यानंतर, फिक्स्ड डिपॉझिटचा बँकेचा फॉर्म भरावा लागेल आणि मुदत ठेवीमध्ये जमा करावयाची रक्कम जमा करावी लागेल.
  • त्यानंतर आपले बँकेत मुदत ठेव खाते उघडले जाईल.
  • एफडी खाते उघडायची प्रक्रिया ऑनलाइनही करता येते. आपल्याला हवे असल्यास, आपण आपल्याला बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केलेली रक्कम इंटरनेट बँकिंग द्वारे किंबा मोबाईल बँकिंग द्वारे घरबसल्या मुदत ठेव खात्यात जमा करू शकतो.

मुदत ठेवीसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for fixed deposit

आपल्याला मुदत ठेवीचे खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

ओळखीचा पुरावा

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा

  • चेकसह बँक स्टेटमेंट
  • पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र/ ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • टेलिफोन बिल
  • वीज बिल

फिक्स डिपॉजिट आणि रीकरिंग डिपॉजिट मधील फरक | Difference between fixed deposit and recurring deposit

  • फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटमध्ये व्याजदर बऱ्यापेकी समानच असतो. फक्त दोन्हीमध्ये पैसे जमा करण्याची पद्धत वेगळी आहे.
  • फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, आपण रक्कम एकाच वेळी जमा केली जाते.
  • रिकरिंग डिपॉझिटमध्ये, रक्कम निर्दिष्ट वेळी म्हणजे महिन्याच्या महिन्याला किंवा हप्त्यांमध्ये भरावी लागते.
  • फिक्स डिपॉझिटच्या मॅच्युरिटी कालावधीनंतरच रक्कम काढता येते, परंतु वेळेपूर्वी पैसे काढल्यास आपल्याला दंड भरावा लागतो.
  • जर एखाद्याला रिकरिंग डिपॉझिटमध्ये, सोडायची असेल तर बँकेला व्याजावर कोणताही प्रकारचा दंड भरावा लागत नाही.

फिक्स डिपॉझिट मध्येच बंद केल्यामुळे काय नुकसान होवू शकते | What can be done by locking in a fixed deposit

फिक्स डिपॉझिटमध्ये मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आपण ठेव काढल्यास आपले नुकसान होते.

उदा. जर आपण ५ वर्षासाठी मुदत ठेव केली असेल आणि ४ वर्षात मुदत ठेव बंद केली तर आपल्याला व्याज हि कमी मिळते आणि बँकचा दंडही भरावा लागतो.

FD वर कर्ज कसे मिळते? | How to get loan on FD

आपल्याला अनेक बँका गरज पडल्यास आपल्या मुदत ठेवींवर कर्जसुद्धा देतात. आपल्याला FD रकमेच्या जास्तीत 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. आपल्या कर्जाचा कालावधी आणि मुदत ठेवीच्या कालावधीच्या बरोबरीचा किंवा कमी जास्त असू शकतो.

कर्जावरील व्याजदर मुदत ठेवीवरील व्याजदरापेक्षा 1% किंवा 2% जास्त आहे.किंवा ज्या त्या बँकावर अवलंबून असतो.

आपला सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्थिक अडचणीच्या वेळी कधीही त्याचा उपयोग होऊ शकतो. आपण कर्ज घेतल्यानंतरही आपल्याला मुदत ठेवीवर व्याजहि मिळते.

मुदत ठेवीचे फायदे | Advantages of fixed deposits

  • मुदत ठेव हा बचत करण्याचा एक सुरक्षित मार्ग असतो,ज्यामध्ये  बाजारातील चढ-उताराचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही.
  • आपल्याला कमी मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर तीन ते चार वर्षांच्या ठेवींपेक्षा जास्त आहेत.
  • महत्वाचा फायदा म्हणजे एफडीवरील व्याजदर सामान्य बचत खात्यांपेक्षा कधीही जास्त असतो.
  • काही बँका आपल्याला एफडीवर कर्जाची सुविधाही दिली जाते.
  • जास्त मुदतीच्या ठेवींपेक्षा एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवी अधिक फायदेशीर असतात.

Fixed Deposit Meaning in Marathi, ठेवीचे प्रकार, मुदत ठेव म्हणजे काय? शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

FD साठी कालमर्यादा किती आहे?

FD चा गुंतवणुकीचा कालावधी सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंत असतो आणि तो सर्व बँकांमध्ये बदलतो. गुंतवणुकीवरील परतावा कालांतराने चक्रवाढ होत असतो. मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक असू शकते.

FD साठी पात्रता काय आहे?

खाली नियमित मुदत ठेवीसाठी पात्र व्यक्ती आणि गट आहेत: रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे, एकमेव मालकी संस्था.

मी FD वर कर टाळू शकतो का?

एखाद्या आर्थिक वर्षात जमा केलेल्या रकमेवर जमा झालेले व्याज रु. ४०,००० पेक्षा जास्त असल्यास FD व्याजाच्या कमाईवर कर लागू होतो. दुसऱ्या शब्दांत, तुमची कमाई या नमूद केलेल्या वरच्या मर्यादेत आल्यास तुम्ही FD रिटर्नवरील कर टाळू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी, कमावलेल्या व्याजाची ही मर्यादा रु. ५०,००० आहे.


Spread the love

Post Comment

You May Have Missed