शिक्षण कर्ज घेत आहे? मग ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा | शैक्षणिक कर्ज योजना | कर्ज फेडताना अजिबात अडचण येणार नाही

शैक्षणिक कर्ज योजना
Spread the love

Education Loan : उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर, त्यावरील खर्च हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे, शिक्षण घेत असताना पैसे उभे करणे हे प्रत्येक नागरिकांसाठी दिसते इतके सोपे नसते. त्यामुळे, कित्येक नागरिक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध करून घेतात. आजकाल, भारत देशात याचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे. Education Loan Information in Marathi.

परंतु, शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेत असताना, त्यापूर्वीच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कधीही शिक्षण कर्ज पूर्णपणे तपासून घ्यावे; ही सावधगिरी अत्यंत महत्त्वाचे आहे (Education Loan rate).

असे केल्याने, तुम्हाला नंतर कर्जाची परतफेड करत असताना सोपे जाणार आहे आणि तुम्हाला पैसे सुद्धा वाचवण्यास मोठी मदत होईल. आज आपण शैक्षणिक कर्ज घेत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल तपशील तसेच शैक्षणिक कर्ज विषयी माहिती जाणून घेऊया.

शैक्षणिक कर्ज घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये आपण प्रवेश घेण्यास इच्छुक असाल तर, विविध प्रकारचे खर्च अशा वेळेस करावे लागतात. यामधील मुख्य भाग म्हणजे कोर्सची फी, वस्तीगृह किंवा राहण्याचा खर्च, या सोबतच लॅपटॉप, पुस्तके, किंवा जेवण खाणे इत्यादी बाबींवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो (Education Loan tips). म्हणूनच, आता कर्ज घेत असताना सर्व आवश्यक खर्चाचे पूर्णपणे मूल्यांकन करावे आणि तिथून पुढे आपण कर्जासाठी अर्ज सादर करू शकता. कर्जाची जी काही रक्कम आहे, ती अशी असावी की, या अंतर्गत संपूर्ण खर्च आपल्याला भागवता येईल.

देशाच्या अंतर्गत अभ्यासक्रमासाठी कमीत कमी दहा लाखांचे कर्ज तसेच परदेशी शिक्षण घेण्यासाठी कमीत कमी २० लाखांचे खर्च उपलब्ध करून दिले जात आहे.

शैक्षणिक कर्ज योजना व्याजदर

अभ्यासक्रमाच्या कालावधी शिवाय, इतर वित्तीय संस्था कर्जाची परतफेड करण्यासाठी एक वर्षाचा जास्तीच्या अधिस्थगन वेळ सुद्धा दिला जातो. या कालावधीमध्ये ईएमआय अजिबात भरावा लागत नाही. सर्वसाधारणपणे, तुम्ही ज्या वेळेपासून ईएमआय भरण्यास सुरु करता, तिथून पुढे पंधरा वर्षाचा परतफेडीचा कालावधी तुम्हाला मिळतो. ज्या दिवशी कर्ज उपलब्ध करून दिले जाते, त्याच दिवसापासून हे व्याज सुरू होते (Personal Loan). या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि भविष्यात कर्जाची परतफेड करत असताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही.

शैक्षणिक कर्जावरील व्याजदर हा एक महत्त्वाचा भाग असून, कर्ज घेत असताना या गोष्टी नक्कीच लक्षात घ्यावेत. व्याजदर हा अभ्यासक्रम, मागील शिक्षण, क्रेडिट स्कोर, विविध संस्था, अर्जदाराची सुरक्षा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो (Personal Loan news).

तसेच, विविध वित्तीय संस्था अंतर्गत व्याजदरांमध्ये आपल्याला फरक दिसून येईल. अधिस्थगन कालावधी वेळी सर्वसाधारण दराने तसेच तिथून पुढे चक्रवाढ व्याजदराने, जे काही व्याज आहे ते आकारले जाते. त्यामुळे, आता कर्ज घेत असताना त्यापूर्वी सर्व बँकांचे व्याजदर अगदी व्यवस्थितपणे तपासून घ्यावेत.

एज्युकेशन लोन घेत असतानाच, त्यापूर्वी तुम्ही ज्या कोर्स किंवा इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेणार आहात, त्याच्या प्लेसमेंटचा पूर्णपणे इतिहास आपण जाणून घ्यावा.

असे केल्यामुळे, तुम्हाला कोर्सच्या नंतर जॉब मिळेल की नाही याबाबत पूर्णपणे कल्पना येते आणि तुम्हाला अंदाजे किती पगार मिळेल, याची सुद्धा माहिती मिळते (Personal Loan offers). एकदा तुम्हाला प्लेसमेंट तसेच पेमेंटची कल्पना आली की, तुम्ही तुमच्या भावी उत्पन्नाचा तसेच विविध EMI अंदाज लावू शकता आणि अशावेळी कर्जाचा कालावधी सुद्धा निवडू शकता.

शैक्षणिक कर्ज योजना, Education Loan Information in Marathi, एज्युकेशन लोन विषयी माहिती शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

भन्नाट कर्ज सुविधा! कोणत्याही हमी शिवाय सरकार देत आहे 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज | स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Next post

गुंतवणुकीच्या या ‘4’ फायदेशीर योजना! करबचतीसह मिळत आहे बंपर परतावा | कर बचत योजना | वाचा सविस्तर

You May Have Missed