क्रेडिट कार्ड वापरत आहे? तर या 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या | Credit Card Use in Marathi | होईल जास्तीत जास्त फायदा;

credit card use in marathi
Spread the love

Credit Card: आजच्या काळामध्ये क्रेडिट कार्ड ही लोकांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे, याचे कारण असे आहे की हे कार्ड नागरिकांसाठी अतिशय सोयीस्कर ठरत आहे. जर तुमच्या खिशामध्ये पैसे नसतील तरी तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकता आणि आपल्या गरजा पूर्ण करू शकता, तसेच ग्रेस पिरियडमध्ये जी काही रक्कम आहे ती विना व्याज परत करू शकता. credit card use in marathi.

क्रेडिट कार्ड वापरत आहे? तर या 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या | Credit Card Use in Marathi

तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर अजिबात भरू शकला नाही तर तुमच्यासाठी विविध अडचणी येऊ शकतात. अशावेळी, तुम्हाला तुमच्या रकमेवर जास्तीचे व्याज भरावे लागते. कित्येकदा या चक्रामध्ये लोक कर्जाच्या जाळ्यात अडकतात. बिल न भरल्यामुळे क्रेडिट स्कोर खराब होतो.

तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. क्रेडिट कार्डचा शहाणपणाने वापर केला तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यामध्ये अजिबात अडकवू शकणार नाही आणि तुमचा क्रेडिट स्कोर सुद्धा खराब होणार नाही.

ऑफर्स किंवा डिस्काऊंटसाठी क्रेडिट कार्ड घेऊ नका

क्रेडिट कार्डची किती गरज आहे हे सर्वात प्रथम समजावून घेणे आवश्यक आहे (credit card update). मगच क्रेडिट कार्ड घ्यावे, फक्त इतरांचे म्हणणे ऐकून किंवा ऑफर्स, सवलतींकडे बघून घेऊ नये. क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून खर्च केलेला असतो ते एक प्रकारचे कर्जच आहे हे लक्षात ठेवावे. तुम्ही जर कर्जाची फेड वेळोवेळी केली नाही तर स्वतःसाठी समस्या निर्माण होऊ शकते.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेणे टाळा

तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तसेच ते काम करत असेल तर दुसरे क्रेडिट कार्ड घेऊ नका, नाहीतर तुम्ही स्वतःसाठी प्रॉब्लेम वाढवत आहात आणि क्रेडिट कार्ड मुळे कधी कधी फालतूचा खर्च सुद्धा वाढतो.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर अनेक वेळा खर्च केलेली जी काही रक्कम आहे ती फेडणे अवघड होऊन जाते (credit card information in marathi). अशा परिस्थितीमध्ये कर्जामध्ये अडकण्याची जास्तीत जास्त शक्यता असते याशिवाय, इतर खर्च क्रेडिट कार्डशी निगडित असल्यामुळे त्या इतर खर्चांवर याचा परिणाम होतो.

क्रेडिट कार्डमार्फत 30% पेक्षा जास्त खर्च करू नका

प्रत्येक क्रेडिट कार्डला एक विशिष्ट मर्यादा असते ही मर्यादा हजारोंपासून लाखों पर्यंत असू शकते. कधी सुद्धा मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू नये. क्रेडिट कार्ड मर्यादेच्या फक्त 30 टक्केच खर्च केलेला फायद्याचा ठरतो असे बहुतांश तज्ञांचे मत आहे. credit card use in marathi.

तुम्ही जर यापेक्षा अधिक खर्च करत असाल तर तुमच्या क्रेडिट कार्ड युटीलायझेशन रेशो मध्ये याचा फरक पडतो (live marathi). आपण जितके जास्त क्रेडिट कार्ड वापरत आहात तितकेच आपले सी यु आर जास्तीत जास्त असते हे दर्शवते की आपले क्रेडिट कार्ड आहे ते अवलंबित्व असे खूप जास्त आहे. त्यावेळी तुमच्या क्रेडिट स्कोर वर याचा परिणाम दिसून येतो. चांगल्या क्रेडिट स्कोर साठी क्रेडिट युटीलायझेशन रेशो अशावेळी, तीस टक्के पेक्षा जास्त न ठेवण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो.

अचानक कार्ड बंद करू नका

कित्येकदा नागरिकांकडे दोन कार्ड असतात आणि अचानकपणे एक कार्ड बंद करतात यामुळे क्रेडिट युटीलायझेशन रेशो या ठिकाणी वाढू शकतो कारण तुमचे क्रेडिट कार्ड युटीलायझेशन रेशो आधी दोन कार्डमध्ये विभागलेले असतात.

परंतु एक कार्ड बंद केल्यामुळे ते सर्व एका कार्डमध्ये येते (marathi news). उच्च क्रेडिट युटीलायझेशन रेशो तुमच्या क्रेडिट स्कोर पूर्णपणे बिघडवतो यामुळे तुम्ही कार्ड वापरत नसाल तर काही प्रॉब्लेम नाही ते ऍक्टिव्ह ठेवा.

क्रेडिट कार्डवर कॅश काढण्याची चूक कधीही करू नका

कठीण काळामध्ये तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुध्दा कॅश काढू शकता. आपण किती रोख रक्कम काढू शकतो हे पूर्णपणे आपल्या कार्डच्या मर्यादेप्रमाणे निश्चित केले जाते. परंतु, क्रेडिट कार्ड अंतर्गत पैसे काढायचे असतील तर ते पूर्णपणे टाळावे कारण की तुम्हाला चांगले शुल्क त्या ठिकाणी भरावे लागतील. तसेच, कॅश एडव्हान्सवर व्याजमुक्त क्रेडिट पिरियड चा कोणताही लाभ या ठिकाणी मिळत नाही.

credit card use in marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

ऑनलाइन पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाल्यास काय करावे? | Wrong Money Transfer | हे महत्त्वाचे नियम नक्की वाचा

Next post

घरामध्ये तुम्ही किती कॅश ठेवू शकता? | Income Tax Rules in Marathi | काय आहे आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम? वाचा सविस्तर माहिती

You May Have Missed