कुणाला मिळेल क्रेडिट कार्ड | Credit Card information in Marathi | क्रेडिट कार्ड चे फायदे व नुकसान

credit card information in marathi
Spread the love

आज आपण  तंत्रज्ञानाच्या  दुष्टीने खूप प्रगतशील झालो  आहोत. स्मार्टफोन यूजर्स Phone Pe, Google Pay इत्यादी यूपीआय अ‍ॅप्सद्वारे सहज पेमेंट करू शकतात. बँकांनी आणि वित्तीय  सेवा कंपन्यांनी  गार्हकाच्या दुष्टीने सोयीचे  होण्यासाठी क्रेडिट कार्डची निर्मिती केली  आहे. आज आपण  क्रेडिट कार्ड म्हणजे काय (Credit Card Information in Marathi) आणि फायदे तोटे ह्याविषयी माहिती घेणार आहोत.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय | Credit Card Information in Marathi

  • क्रेडिट कार्ड हे डेबिट कार्ड (Debit Card) प्रमाणेच दिसायला असते. क्रेडिट कार्ड हे प्लास्टिक किंवा धातूंच्या पातळ तुकड्यांपासून बनते. कार्डधारकांना हे उधारीखात्याप्रमाणे वापरता येते.
  • आपण खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो असलो किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना कितीही चांगल्या प्रकारची नोकरी असली, आर्थिक उत्पन्न चांगले असले तरी काही वेळा आपल्या खात्यात किंवा आपल्याजवळ पॆसे   नसतात . अश्यावेळी आपल्याला ह्या क्रेडिट कार्डचा  वापर करून  कर्ज म्हणून पैसे घेऊन त्या वस्तू खरेदी करू शकतो
  • पण ह्यासाठी क्रेडिट कार्डला मर्यादा देखील असते. पैसे परत करण्यासाठी २५ ते ४५ दिवसांचा वाढीव कालावधी असतो,  तुम्ही या वेळेत पैसे जमा केले  तर, कोणतेही व्याज भरावे लागणार नाही. पण नंतर त्यांना बँकांच्या नियमानुसार व्याजासह क्रेडिट कार्ड बिलाच्या रूपात बँकेत पैसे परत करावे लागतात.

डेबिट कार्ड  आणि क्रेडिट कार्ड यांच्यातील फरक | Difference between Debit Card and Credit Card in Marathi

क्रेडिट कार्ड म्हणजे काय? हे समजावून घेतल्यानंतर आपण क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड यांच्यातील फरक जाणून घेऊ .

डेबिट कार्ड | Debit Card

डेबिट कार्ड चा वापर करत असताना  आपल्या खात्यातून थेठ पैसे काढले जातात म्हणजे थोडक्यात काय आपल्या  खात्यात पैसे असतील तरच आपण खरेदी करू शकतो किंवा ATM मधून पैसे काढता येतात.

क्रेडिट कार्ड | Credit Card

आपल्या खात्यात  पैसे नसतील तरीही  उधारी  खात्याप्रमाणे ठराविक लिमिट पर्यत  आपण खरेदी करू शकतो आणि  ठराविक कालावधीपर्यंत आपण बिल स्वरूपात परत करू शकतो .

कुणाला मिळेल क्रेडिट कार्ड? | Who can get Credit Card

  • क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी वयाची मर्यादा १८ वर्षे पूर्ण असावी लागतात.
  • आपल्याला ज्या बँकेतून किंवा वित्तीय संस्थेतून कार्ड  घ्यायचे आहे त्या बँकेत आपली मुदत ठेव, महिन्याचा पगार किंवा वार्षिक उत्त्पन्न ह्या गोष्टीच्या आधारे आपणास त्या  बँकेच्या नियमानुसार क्रेडिट कार्ड दिले जाते.
  • क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी नोकरदार किंवा व्यावसायीक असण्याची  आवश्यकता आहे.
  • थोडक्यात काय तर बँक नियमांच्या नुसार आपले उत्त्पन्न असणे गरजेचे  आहे त्या आधारे आपल्या बँक क्रेडिट कार्ड देते.
  • तुम्ही तुमच्या बँकेतून अर्ज करू शकता किंवा बँकेच्या Website वरून सुद्धा अर्ज करू शकता आणि क्रेडिट कार्ड मिळवू शकता.
  • क्रेडिट कार्ड कसे काढावे? हे माहित नसेल आणि आपल्याला क्रेडिट कार्ड हवे असेल तर पुढील लिंक वरती क्लिक करून आपण क्रेडिट कार्ड अप्लाई ऑनलाइन करू शकता. SBI Credit Card, IDFC First Bank Credit Card, Axis Bank Credit Card, AU Small Finance Credit Card, Indusind Credit Card, HDFC Bank Credit Card etc.
  • आपण क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्र आहात का? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करून Free Cibil Score चेक करा.

क्रेडिट कार्ड चे फायदे | Benefits of Credit Card in Marathi

  • क्रेडिट कार्डद्वारे आपण  आपल्या खात्यात असणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रकमेची खरेदी online आणि offline करू शकतो त्यासाठी आपल्या खात्यात  असणाऱ्या रकमेशी काहीही संबंध  नसतो.
  • क्रेडिट कार्डच्या साहाय्याने आर्थिक अडचणीच्या वेळी ठराविक  कालावधीसाठी कोणत्याही प्रकारच्या व्याजाशिवाय रक्क्म वापरता येते ज्यावेळी आपण कार्डदवारे खरेदी किंवा कोणतेही ऑनलाइन  PAYMENT, ऑफलाईन PAYMENT करतो त्यावेळी बँक आपणास ती रक्कम परत करण्यासाठी २५ ते ४५ दिवसाचा कालावधी दिला जातो. त्यावेळेत जर  आपण क्रेडिट बिल भरले तर  त्या रक्कमेला कोणतेही व्याज बँक आकारत नाही.
  • तुम्ही  जर घेतलेली कार्डची रक्कम ही वेळेत बिलरूपात भरली तर  तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score) चांगल्या प्रकारे तयार होतो. त्यामुळे तुम्हाला बँकेकडून कर्ज  मिळण्यास चांगली मदत होते.
  • प्रत्येक वेळी आपल्यासोबत कॅश असण्याची गरज असेलच असं नाही कारण कार्ड द्वारे आपण खरेदी शकतो तसेच कोणत्याही प्रकारची बिल भरू शकतो त्यामुळे आधुनिक (कॅशलेस) व्यवहार  करण्यास खूप मदत होते .
  • क्रेडिट कार्डच्या मदतीने, तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करताना हप्त्यांवर म्हणजेच ईएमआयवर घेऊ शकता. तुमच्या क्रेडिट कार्डमधून ईएमआयची रक्कम बँकांकडून आपल्या खात्यातून कमी केली जाईल.
  • क्रेडिट कार्ड असल्याने व्यहाराच्यावेळी  cashback आणि rewards, offers  बँकाकडून मिळण्यास चांगली मदत होते.
  • क्रेडिड कार्ड वापरताना  ATM मधून कॅश काढता येते पण त्यासाठी बँकेच्या नियमांनुसार  बिलात त्यांचे जास्त शुल्क आकारले जाते व्याज आकारले जाऊ शकते.
  • थोडक्यात  आपण कार्डद्वारे खरेदी करू शकतो असे नाही तर आपल्याला रक्कमही मिळू शकते.
  • UPI चा वापर करून आपण क्रेडिट कार्ड द्वारे आपण लाईट बिल, फोन बिल तसेच कोणत्याही प्रकारची online payment  करण्यास खूप मदत होते.
  • क्रेडिट कार्ड च्या मदतीने  आपले व्यवहार हे सुरक्षित आणि सोयीचे होतात.

क्रेडिट कार्डचे तोटे | Disadvantages of Credit Card

प्रत्येक गोष्टीत फायद्यासोबत तोटेही असतात क्रेडिट कार्डच्या  तोट्याची माहिती  घेवू  

  • क्रेडिट कार्डमध्ये शुल्क आणि गोपनीय चार्जेस असतात त्याविषयी आपणास माहिती असेलच असे नाही  ते आपल्या  बिलात  चार्जेस समाविष्ट असतात.
  • क्रेडिट कार्ड वापरताना बँकांकडून  एखादी  ठराविक मर्यादा (Limit Of Credit Card) दिली जाते त्यामर्यादेपेक्षा जास्त आपण खरेदी करू शकत नाही.
  • जर आपण क्रेडिट बिल दिलेल्या ठराविक कालावधीत भरले नाही तर अतिरिक्त चार्जेस आणि ते बिल जोपर्यंत भरले जात नाही तोपर्यंत बँक नियमानुसार रक्कमेचे व्याज आकारले जाईल.
  • थोडक्यात क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याकडे रक्कम असेलच असं नाही त्यामुळे खरेदी करताना आपले बजेटवर नियंत्रण राहीलच असे नाही त्यामुळे अवाढव्य खर्च होण्याची खूप शक्यता असते.
  • क्रेडिट कार्ड चे बिल आपण वेळेत भरले नाहीतर आपला क्रेडिट स्कोरवर (free cibil score check) खराब परिणाम होतो. (Credit Card Information in Marathi)

क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची काळजी | Care to be taken While Using Credit Card

  • क्रेडिट कार्ड हे नेहमी सुरक्षित आणि खात्रीशीर ठिकाणी  आहे ह्यांची काळजी घ्या.
  • क्रेडिट कार्ड ची माहिती फोनवरून कुणाला हि देऊ नका , कुणाला आपला पिन सांगू नका कोणत्याही गैरप्रकारांना बळी पडू नका.
  • क्रेडिट कार्ड द्वारे ATM मधून रक्कम काढण्याचे शक्यतो टाळा. कारण बँक त्यासाठी जास्तीचे शुल्क आकारते आणि व्याज हि भरपूर घेतले जाते  त्यामुळे  रक्कम वापरू नका.
  • क्रेडिट कार्ड वापरताना निष्काळजीपणा झाला जसे कि  आपण आपला पिन कुणाशी शेअर केला तर त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
  • क्रेडिट कार्ड आपल्या कडून हरवले गेलेच तर आपल्या बँकेला त्वरित त्याविषयी  माहिती द्या किंवा Customer care ला  कळवा म्हणजे त्यांचा कोणताही गैरवापर होणार नाही ह्याची काळजी घ्या.
  • आपण  आपल्या खरेदीवर आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
  • क्रेडिट कार्ड चे बँक अकाउंट स्टेटमेंट वरचे वर चेक करणे गरजेचे आहे त्यामुळे कोणता आर्थिक व्यवहार झाला आहे ते समजेल.

अश्याप्रकारे आपल्याला क्रेडिट कार्ड म्हणजे काय? याबद्दलची माहिती मिळाली असेलच. आपण क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घेतली तर आपले कुठलेही आर्थिक  नुकसान होणार नाही आपले व्यवहार सुरक्षित होतील.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?, क्रेडिट कार्ड कसे काढावे? (Credit Card Information in Marathi) शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

क्रेडिट कार्ड चा वापर करून कोणत्या गोष्टी करू शकतो?

क्रेडिट कार्ड द्वारे आपण खरेदी शकतो तसेच कोणत्याही प्रकारची बिल भरू शकतो

क्रेडिट कार्ड कसे काढावे?

तुम्ही तुमच्या बँकेतून अर्ज करू शकता किंवा बँकेच्या Website वरून सुद्धा अर्ज करू शकता आणि क्रेडिट कार्ड मिळवू शकता.


Spread the love

Post Comment

You May Have Missed