‘या’ क्रेडिट कार्डधारकांना अगदी मोफत ताज हॉटेलमध्ये राहता येईल! | Credit Card Benefits in Marathi | तुम्ही काढले आहे का हे क्रेडिट कार्ड?

credit card benefits in marathi
Spread the love

Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी आम्ही आज खुशखबर घेऊन आलो आहोत. तसे पाहता, देशभरातील कित्येक बँकांच्या अंतर्गत ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच इतरांना नॉन-बँकिंग ऑर्गनायझेशन ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत असतात. credit card benefits in marathi.

क्रेडिट कार्डचे फायदे | Credit Card Benefits in Marathi

क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या आपल्या सर्व ग्राहकांना विविध ऑफर्स प्रदान करतात. या ऑफर्सचा उपयोग करूनच कमी किमतीमध्ये आपल्याला शॉपिंग करता येते.

अनेकदा आपण बघितले असेल की मूवी तिकीटवर सुद्धा ऑफर मिळते.

क्रेडिट कार्डचा उपयोग करून थेट मूवी तिकीट खरेदी केले तर नक्कीच आपल्याला डिस्काउंट मिळतो. इतकेच नाही, तर मेझॉन, फ्लिपकार्ट, अशा विविध ई-कॉमर्स साइटवर शॉपिंग करत असताना आपल्याला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कॅशबॅक देखील मिळतो.

क्रेडिट कार्डने शॉपिंग केली असेल तर स्वस्तात इलेक्ट्रिक तसेच इतर वस्तू आपल्याला खरेदी करता येतात (Credit Card Update). यामध्ये कॅमेरा, लॅपटॉप, स्मार्टफोन, इत्यादी वस्तू खरेदी केल्या आणि काही ऑफर असेल तर आपल्याला बंपर डिस्कॉउंट भेटतो. याशिवाय, मित्रांनो काही विशेष क्रेडिट कार्डच्या कंपनी आहेत ज्या आपल्या ग्राहकांना लक्झरी हॉटेलमध्ये अगदी फ्री मध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून देत असतात. आज आपण अशाच काही क्रेडिट कार्ड विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआय ऑरम क्रेडिट कार्ड | SBI Aurum Credit Card

स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक असून पब्लिक सेक्टर मधील बँकेचे विविध क्रेडिट कार्ड बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये ऑरम क्रेडिट कार्ड अशाच विविध क्रेडिट कार्ड पैकी एक असून, यामध्ये विविध प्रकारच्या सुविधा ग्राहकांना पुरवल्या जातात.

या कार्डमध्ये लेन्स कार्ट गोल्ड सोबतच डिस्कवरी प्लस, मेझॉन प्राईम चे सबस्क्रिप्शन सुद्धा दिले जात आहे. याशिवाय चाळीस हजार रिवॉर्ड पॉईंटचा म्हणजेच दहा हजार रुपये यामध्ये सामील होण्याचा महत्त्वाचा लाभ सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. इतकेच नव्हे, तर या क्रेडिट कार्डचा उपयोग करून तुम्ही एका वर्षामध्ये तब्बल दहा लाख रुपये खर्च केले तर अशावेळी दहा हजार रुपयांचे व्हाउचर तुम्हाला मिळेल.

HSBC प्रीमियर मेटल क्रेडिट कार्ड | HSBC Premier Metal Credit Card

HSBC प्रीमियर मेटल क्रेडिट कार्ड हे एक अत्यंत लोकप्रिय क्रेडिट कार्ड आहे. यावरती ग्राहकांना इतर क्रेडिट कार्ड प्रमाणेच विविध फायदे मिळत आहेत. या क्रेडिट कार्ड वापर करताना वेलकम ऑफर च्या माध्यमातून ताज हॉटेलची ए पी क्यू आर मेंबरशिप दिली जात असून, बारा हजार रुपयांचे ताज एक्सपिरीयन्स गिफ्ट कार्ड सुद्धा दिले जाते. हे कार्ड वापरून तुम्ही बुक माय शो च्या माध्यमातून जर तिकीट बुक केले तर तुम्हाला बाय वन गेट वन फ्री म्हणजे एका सोबत दुसरे तिकीट देखील मिळते.

या कार्डवर आपल्याला अनलिमिटेड एअरपोर्ट लाउन्स प्रवेश सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. या कार्डची जॉइनिंग फी आपण बघितली तर वीस हजार रुपये इतकी आहे. अशी माहिती मिळाली निश्चितच तुमचा जास्तीचा विमान प्रवास होत असेल तसेच ताज हॉटेलमध्ये तुमचा मुक्काम होत असेल तर तुमच्यासाठी हे कार्ड नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

सिटी प्रेस्टिज क्रेडिट कार्ड | City Prestige Credit Card

Citi Prestige क्रेडिट कार्ड हे देखील एक लोकप्रिय कार्ड असून, कित्येक नागरिक या कार्डचा वापर करत आहेत. या कार्डची सर्वात मोठी खासियत म्हणजे ताज ग्रुप तसेच आयटीसी हॉटेलमध्ये राहण्यासाठी याच्या ग्राहकांना तब्बल दहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे.

म्हणजे हाती आलेल्या माहितीनुसार या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी सलग चार दिवस हॉटेल बुकिंग केले तर एक दिवस मोफत राहण्याची सुविधा नागरिकांना मिळत आहे. तसेच या कार्डमध्ये अनलिमिटेड लाउंज ऍक्सेस चा सुद्धा समावेश केला आहे. हे कार्ड जे नेहमी प्रवास करत असतात व ज्यांना नेहमीच हॉटेलमध्ये राहावे लागते अशा नागरिकांसाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते.

credit card benefits in marathi, क्रेडिट कार्डचे फायदे संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

RBI जारी करणार 500 रुपयांची नवीन नोट! 500 रुपयांच्या नोटवर असेल प्रभू श्रीरामांचा फोटो? | 500 Note News Marathi | पहा RBI ची बातमी

Next post

ऑनलाइन पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाल्यास काय करावे? | Wrong Money Transfer | हे महत्त्वाचे नियम नक्की वाचा

You May Have Missed