असा वाढवा सिबिल स्कोअर | CIBIL Score Meaning in Marathi | बँक कर्जासाठी करेल फोन

cibil score meaning in marathi
Spread the love

आजच्या ह्या महागाईच्या काळात आपली  स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची  गरज  असते. घर बांधताना किंवा मालमत्ता खरेदी करताना  आपणास खूप पैश्याची गरज असते आणि त्याची तडजोड करणे अवघड होते.

त्यापरिस्थितीत बँक ,वित्तीय संस्था किंवा ऑनलाईन अँपद्वारे आपणास कर्ज घ्यावे लागते ते कर्ज आपल्याला देण्यासाठी बँक आपला थोडक्यात कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit  Score) चेक करते  त्यातून आपला  कर्ज इतिहास समजतो.

क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोर (cibil Score Meaning in Marathi) म्हणले जाते. Credit Score मधून आपल्या  आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जातो त्यावरून आपणास कर्ज मिळते. 

त्याच सिबिल स्कोअर विषयी, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, तो कसा चेक करायचा किंवा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी ट्रिकस अश्या बराच गोष्टीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

क्रेडिट स्कोअर (Credit Score) म्हणजे काय? | CIBIL Score Meaning in Marathi

क्रेडिट स्कोर म्हणजे (my cibil score) असा स्कोर कि ज्यावरून बँकांना किंवा वितीय संस्थाना  समजते कि कर्ज घेणारी व्यक्ती कर्ज परतफेड करण्याची किती शक्यता आहे  यांचा अंदाज लावला जातो आणि तो अंदाज लावण्यासाठी  क्रेडिट अहवालातील माहिती वापरली जाते.

क्रेडिट स्कोअर तयार करणाऱ्या कंपन्यांची यादी | Credit Information Companies

CIBIL

Credit Information Bureau Limited (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड)(cibil full form) किंवा CIBIL ची सन 2000 मध्ये स्थापना झाली.  भारतातील पहिली क्रेडिट माहिती कंपनी मानले जाते.

CIBIL व्यावसायिक आणि ग्राहक कर्जासंबंधीत माहिती गोळा करते आणि क्रेडिट अहवाल तयार करते. CIBIL मध्ये सरकारी आणि खाजगी बँका, वित्तीय संस्था आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या  ह्यांचा  समावेश आहे. कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी जसे कि IndusInd Credit cardIDFC First Bank credit card इत्यादी. CIBIL स्कोअर ची खूप महत्त्वाची भूमिका असते.

Equifax

Equifax ची १८९९ मध्ये अटलांटामध्ये स्थापना झाली. ही सगळ्यात जुनी कंपनी म्हणून ओळखली जाते ह्या कंपनीला भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१० मध्ये भारतात नोंदणीचे प्रमाणपत्र दिले.

मायक्रोफायनान्स संस्थांच्या वाढत्या कर्जाविषयी गरजा  पूर्ण करण्यासाठी  वेगळी संस्था निर्माण केली.

Experian

भारतातील अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी एकत्रित येऊन 2006 मध्ये  ह्या कंपनीची  स्थापना करण्यात आली. वित्तीय संस्थांनी दिलेल्या माहिती नुसार कर्ज घेण्याऱ्या व्यक्तीचा आर्थिक अहवाल  तयार केला जातो त्यावरून त्या व्यक्तीचा क्रेडिट रिपोर्ट तयार केला जातो.

२०१४ मध्ये जगातील ‘सर्वात नाविन्यपूर्ण एक ‘कंपनी म्हणुन फोर्ब्स मासिकात नाव दिले गेले.

High Mark Credit Information Services

भारतातील चार क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांतील CRIF हाय मार्क  हि एक कंपनी आहे. मुंबईमध्ये २००५ साली ह्या कंपनीची स्थापना झाली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून २०१० मध्ये नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले. लहान ,मोट्या ,किरकोळ कर्जदार यासारख्यांचा क्रेडिट रिपोर्ट तयार करते  आणि त्यासाठी  नाममात्र शुल्क आकारते.

cibil score meaning in marathi
Image by Unsplash

क्रेडिट स्कोर कोणत्या गोष्टीवरून तयार केला जातो | What is Credit Score Based On

  • तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरण्याचा तुमचा इतिहास बघितला जातो जसे कि तुमचे बिल किती वेळेत भरले आहे, कार्ड लिमिट पेक्षा किती जास्त कर्ज  घेतले आहे ह्या गोष्टीवरून स्कोअर तयार केला जातो.
  • तुमचे सध्या किती बँकेत कर्ज आहेत आणि कोणत्या प्रकारची आहेत हे हि तपासले जाते.
  • तुम्ही कर्ज किती वेळेसाठी घेतले आहे आणि ते किती वेळेत परत केले ह्याचा हि अभ्यास केला जातो. 
  • तुम्ही कर्ज किती ठिकाणी घेतले आहे आणि किती ठिकाणी घेण्याची चौकशी केली आहे ह्यांचा हि अंदाज घेतला जातो.
  •  तुम्ही नवीन कर्जासाठी किती अर्ज केले आहेत ह्यावरून तुमचा क्रेडिट स्कोअर  बनवला जातो.

क्रेडिट स्कोर किती आणि कसा असतो | How Much and What is Credit Score

आता पर्यंत आपणास क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आणि याच्या कंपन्या समजल्या असतीलच आता  आपण  क्रेडिट स्कोअर  किती आणि कसा असावा हे जाणून घेवू.

  • क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोर हा तीन अंकी असतो तो ३०० ते ९०० पर्यंत मोजला जातो. जितका जास्त सिबिल स्कोअर तितका तो आपल्या कर्ज घेण्यासाठी फायदेशीर असतो त्यावरून आपण कर्ज परत करू शकतो का? ह्यांचा इतिहास कळतो. असा असतो क्रेडिट किंवा सिबिल स्कोअर.
  • NA/NH  असा जर आपला क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर असेल तर आपण कर्जाचा कोणताही इतिहास नाही कारण आपण क्रेडिट कार्ड किंवा कोणतेही कर्ज घेतेले नाही.
  • ३०० – ५५० असा जर आपला क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर असेल तर तो अतिशय खराब आहे असे मानले जाते.  आपण क्रेडिट कार्ड बिल तसेच कर्जाचे  हप्ते वेळेत भरले नाहीत असा ह्यांचा अर्थ होतो. त्यामुळे ह्या स्कोअरमधील लोकांना क्रेडिट कार्ड मिळवणे खूप अवघड होते.
  • ५५०-६५० असा जर आपला क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर असेल तर तो बरा  मानला त्यावरून समजते कि आपले कर्ज थकीत आहे पण ते भरण्यासाठी तुम्ही प्रत्यन करत आहात तुमला कर्ज मिळू शकेल पण व्याजदर जास्त लागू शकतो. तसेच क्रेडिट कार्ड मर्यादा कमी असू शकते.
  • ६५०-७५० असा जर आपला क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर असेल तर आपण योग्य मार्गावर आहात. तुम्ही तुमचे कर्ज अगदी वेळेत आणि योग्यरीतीने भरत  आहात आणि तुम्हाला कर्ज घेण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही तरी ही तुम्ही तुमचा  स्कोअर अजून  वाढवावा.
  • ७५०-९००  असा जर आपला क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोर असेल तर  तो अतिशय चांगल्याप्रतीचा किंवा उत्कृष्ट मानला जातो ह्यावरून तुम्ही  क्रेडिट बिल, कर्जाचे हप्ते अगदी वेळेत भरले आहेत, आणि तुमचा क्रेडिट स्कोर अगदी अतुलनीय किंवा प्रभावशाली आहे समजते ह्यामुळे बँक तुम्हाला  वैयक्तिक लक्ष देवून कर्ज देते आणि क्रेडिट कार्डसाठी फोन करत राहील. म्हणजेच हा स्कोअर उत्तम  स्कोअर मानला जातो.

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोर कश्यामुळे कमी होतो? What Causes Credit Score or CIBIL Score to go down?

  • आपल्या कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट बिल वेळेत भरले नसल्यामुळे  आपला स्कोअर कमी होतो.
  • जेव्हा आपण आपले कर्ज किंवा बिल वेळेत भरले नाही तेव्हा बँक आपल्याला जास्तीचे शुल्क किंवा व्याज लावते त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअरवर खूप वाईट परिणाम होतो.
  • आपले कर्ज वसूल करण्यासाठी बँक किंवा कर्ज देण्याऱ्या व्यक्ती कडून आपणास वेगळे किंवा सक्तीचे आदेश येतात जसे कि कोर्ट नोटीस अश्या गोष्टी ह्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.
  • आपण कमी वेळेत अधिक  क्रेडिट कार्ड किंवा कर्जासाठी अर्ज केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. म्हणून, अर्जांची संख्या मर्यादित ठेवावी.
  • आपण आपला  क्रेडिट अहवाल अधूनमधून तपासून चुकीचे बदल केले नाही तर त्याचा परिणाम स्कोअर वर होतो, क्रेडिट स्कोअर कंपनीकडून सुद्धा चुक होऊ शकते तीही आपण वेळेत दुरुस्त करून घेतली पाहिजे  नाहीतर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या सिबिल स्कोअर वर होतो.

CIBIL स्कोर कसा वाढवायचा? How to increase CIBIL Score?

  • आपण आपले कर्ज वेळेत भरत असूनही क्रेडिट स्कोर कमी होत असल्याचे दिसत असेल तर क्रेडिट रिपोर्ट मध्ये काही दोष आहे का ह्याची खात्री करून घ्या जसे कि तुमचे घेतलेले कर्ज Nill असेल तर  ते रिपोर्ट मधून कमी झाले आहे का ह्यांचे एकदा निरीक्षण करा.
  • क्रेडिट रिपोर्ट मध्ये झालेल्या चुका दूर केल्यामुळे आपला क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर सुधारण्यास मदत होते.
  • एकापेक्षा  जास्त  क्रेडिट कार्ड चा वापर करणे शक्यतो  टाळा जर आपण एकच कार्ड वापरून त्याचे बिल वेळेत भरले गेले तर रिपोर्ट सुधारण्यास खूप मदत होते  एकच क्रेडिट कार्ड भरपूर दिवस वापरल्यामुळे आपला क्रेडिट स्कोर  किंवा  सिबिल वाढण्यास मदत होते.
  • जर आपण कर्ज घेणार असाल तर तुम्ही ते दीर्घकाळासाठी (लॉन्ग टर्म)  साठी घ्या म्हणजे त्याचे व्याज कमी असेल आणि कर्ज हप्ता ही कमी राहील त्यामुळे हप्ता भरण्यास आपल्यास सोयीचे होईल त्यामुळे आपण वेळेत कर्ज भरू शकतो त्यामुळे क्रेडिट स्कोर चांगला होतो.
  • आपण कर्ज घेताना एकापेक्षा जास्त घेणे शक्यतो टाळा कारण आपण एक कर्ज भरून दुसरे कर्ज घ्यावे. सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी एकानंतर एक अश्या पद्धतीने कर्ज घ्या त्यामुळे कर्ज भरताना आर्थिक दबाव राहणार नाही आणि कर्ज वेळेत भरले जाईल. 
  • क्रेडिटचे विविध प्रकार घेण्याचा प्रयत्न करा अनेक प्रकारचे कर्ज घ्यावे जसे कि गृह कर्ज, वाहनकर्ज घ्यावेत त्यामुळेही आपला क्रेडिट स्कोर सुधारू शकतो.

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोर कसा चेक करावा? How to check CIBIL Score?

सिबिल स्कोर चेक ऑनलाइन फ्री (free cibil score check) येथे क्लिक करुन चेक करू शकता त्यात असलेला फार्ममधील माहिती भरून जसे कि ई-मेल ID, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, हि बेसिक माहिती भरून झाल्यानंतर आपला (my cibil score) स्कोअर रिपोर्ट दाखवला जाईल.

तसेच आपण ज्याठिकाणी कर्ज घेणार आहात जसे बँक किंवा वित्तीय संस्था त्याच्याकडून ही आपला सिबिल स्कोर चेक केला जातो.

CIBIL Score Meaning in Marathi बद्दलची हि माहिती जसे कि सिबिल स्कोर म्हणजे काय? cibil score check, चेक सिबिल स्कोर, सिबिल स्कोर चेक ऑनलाइन, cibil meaning in marathi फ्री जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर कंमेंट करून कळवा. लेख आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास share करायला विसरू नका.

चांगला CIBIL स्कोर काय आहे?

750 आणि त्याहून अधिक चांगला स्कोअर मानला जातो आणि कर्ज अर्ज मंजूर होण्याची अधिक शक्यता असते.

मी माझा CIBIL अहवाल कसा तपासू शकतो?

तुम्ही www.cibil.com वर भेट देऊन तुमच्या चेक सिबिल स्कोर अहवालासाठी विनंती करू शकता


Spread the love

Post Comment

You May Have Missed