घरबसल्या चेक करा आधार लिंकिंग स्टेटस | 2000रु. शेतकरी पेन्शन येत नसेल तर असे करा आधार लिंकिंग | Check aadhar status npci
सरकारच्या नियमानुसार आधार कार्ड नंबर बँक खात्याला लिंक करणे गरजेचे बनलेले आहे. सरकारकडून येत असलेली वेगवेगळे अनुदान जसे कि गॅस सबसिडी , विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, २००० रु. शेतकरी पेन्शन इत्यादी. check aadhar status npci.
काही वेळा आपण बँक खात्यावरती गॅस सबसिडी किंवा शिष्यवृत्ती (DBT Benefits) जमा होत नसलेली आणि त्याबद्दल ग्राहकांची तक्रार असल्याचे आपण पहिले असेल. बँक खात्याशी आधार संलग्न असेल तर आपण अधिक सुरक्षितपणे व्यवहार करू शकतो.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा अर्ज भारत असताना बँक खाते npci शी संलग्न नसल्याचा संदेश आलेला आपण अनुभवाला असेल. गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती किंवा शेतकरी पेन्शन आपल्या खात्यावर येत नसेल किंवा काही अडचण असेल तर कदाचित आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक केले नसलेले असू शकते.
आधार लिंकिंग म्हणजे काय? | What is Aadhar Linking Meaning in Marathi
आधार लिंकिंग हि एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे ग्राहकाने आधार लिंकिंग साठी अर्ज भरून आपली परवानगी दिल्यानंतर संबंधित ग्राहकाची बँक त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करते.
आधार सिडींग म्हणजे काय? | What is Aadhar Seeding Meaning in Marathi
आधार सिडींग म्हणजे ग्राहकाने अर्ज भरून दिल्यानंतर संबंधित बँक, ग्राहकाच्या बँक खात्याशी आधार लिंक करते त्याचबरोबर एन पी सि आई मॅपर (NPCI mapper) ला अपडेट करते.
आधार सिडींग ची प्रक्रिया | Aadhar seeding Process | Aadhar Seeding Form
- सर्वप्रथम आधार सिडींग चा अर्ज भरून आपले ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेमध्ये तो जमा करावा लागेल. आधार लिंकिंग किंवा सिडींग करण्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला पुढील लिंक वरती क्लिक करून मिळवता येईल. Aadhar Card link to Bank account Form
- जर एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात आधार सिडींग करायचे असेल तर आणि जर आपले पूर्वीचे बँक खाते npci शी संलग्न असेल तर पूर्वीच्या बँकेचे नाव अर्जामध्ये नमूद करावे लागेल.
- आधार लिंकिंग किंवा सिडींग चा विहित नमुन्यातील Aadhar Seeding Form भरून त्यासोबत आधार कार्ड ची एक छायांकित प्रत जोडून बँकेत जमा केल्यानंतर बँक अधिकारी आधार सिडींग अर्जाची आणि ग्राहकाची कागदपत्रे, सही ची पडताळणी केल्यानंतर अर्जाची एक पोहोच देतील.
- संबंधित बँक अधिकाऱ्याकडून आधार लिंकिंग अर्जाची आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँक आपल्या खात्याला आधार क्रमांक लिंक करेल तसेच npci शी संलग्न करेल.
- एकदा बँकेकडून आधार लिंकिंग ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपले बँक खाते npci कडे रिफ्लेक्ट होईल आणि त्यानंतर आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस बघता येईल (Check aadhar status npci).
आधार NPCI ला सिडींग कारण्यासंबंधित काही प्रश्न
NPCI मॅपर मध्ये ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती असते का ? Does NPCI mapper have the account details of the customer?
नाही. NPCI मॅपर मध्ये ग्राहकाचा आधार कार्ड क्रमांक, बँकेचा IIN क्रमांक. आणि आधार क्रमांक लिंक केल्याची तारीख असते.
माझे दोन खाती असतील तर मला वेगवेगळे फायदे मिळू शकतील का? | Can I get different benefits in to different accounts by seeding may Aadhaar number?
एक ग्राहक फक्त एक खाते क्रमांक आपल्या आधार शी लिंक करू शकतो. जर एखाद्या ग्राहकाचे एकापेक्षा जास्त खाती असतील आणि सगळ्या बँकांमध्ये जर Aadhar Seeding Form भरून दिलेला असेल तर ज्या बँकेमध्ये शेवटी आधार सिडींग अर्ज भरून दिलेला असेल ते खाते npci मॅपर मध्ये ऍक्टिव्ह असेल आणि त्याच खात्यामध्येच सगळे benefits जमा होतील.
कोणतीही बँक माझ्या परवानगीशिवाय आधार सिडींग करू शकते काय? | Can any bank seed my Aadhaar number without my consent?
नाही. uidai च्या नियमानुसार कोणतीही बँक संबंधित ग्राहकाने विहित नमुन्यातील Aadhar Seeding Form भरून दिल्यानंतर त्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आधार सिडींग ची प्रक्रिया पूर्ण करते. त्यासाठी ग्राहकाची परवानगी असणे आवश्यक असते.
जर आधार ला लिंक असलेले बँक खाते बदलायचे असेल तर? | What should I do to change my Bank Account for receiving DBT?
जर आपले बँक खाते आधार शी संलग्न असेल आणि जर ते आपल्याला बदलायचे असेल तर आपल्याला संबंधित बँकेमध्ये जाऊन आधार सिडींग चा अर्ज भरून द्यावा लागेल आणि आपले पूर्वीचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेचे नाव त्या अर्जामध्ये नमूद करावे लागेल. या सर्व माहितीच्या आधारे बँक आपले खाते npci मॅपर ला अपडेट करेल.
लिंक आधार स्टेटस कसा बघायचा ? | How do I check my NPCI status online? Check aadhar Status NPCI
npci मॅपर मध्ये बँक खाते ऍक्टिव्ह आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- सर्वप्रथम आधार UIDAI च्या वेबसाईट वर जा.
- त्यानंतर My Aadhar मेनू मधे जाऊन aadhar services या sub menu मधील Check Aadhaar Bank Linking Status वरती क्लिक करा.
त्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल.
- त्यानंतर आपल्याला आपला १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याच्या खाली असलेला security code टाका आणि send otp या बटनावरती क्लिक करा.
- यानंतर ६ अंकी otp आधार कार्ड शी संलग्न असलेल्या मोबाईल वरती येईल. तो otp टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा.
- सबमिट केल्यानंतर आपल्याला आपले बँक खाते npci मॅपर मध्ये ऍक्टिव्ह आहे कि नाही ते समजेल. जर आपले खाते ऍक्टिव्ह असेल तर पुढील स्क्रीन मध्ये दाखवल्या प्रमाणे दिसेल. आणि जर आपले खाते npci ला लिंक नसेल तर your aadhar is not linked to a bank असा संदेश दिसेल.
- जर वरील माहितीचा वापर करून आपण आधार लिंकिंग स्टेटस चेक केला असेल (Check aadhar status npci) आणि जर आपले खाते npci शी ऍक्टिव्ह नसेल तर आपल्याला आधार सिडींग चा अर्ज भरून तो संबंधित बँकेमध्ये जमा करावा लागेल.
आधार लिंकिंग शी संबंधित हि माहिती जसे कि Aadhar Seeding Meaning in Marathi, Check aadhar status npci, aadhaar bank account seeding status meaning in marathi वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.
आधार सीडिंगची अधिकृत वेबसाइट काय आहे?
हे पर्याय UIDAI च्या वेबसाईट (www.myaadhaar.uidai.gov.in), eAadhaar, mAadhaar मोबाईल ऍप्लिकेशन, SMS इत्यादी द्वारे उपलब्ध करून दिले आहेत.
NPCI ला बँकेसोबत आधार स्टेटस अपडेट करण्यासाठी किती दिवस लागतात?
तुमची आधार स्थिती तुमच्या बँकेत अपडेट करण्यासाठी साधारणतः ५-६ व्यावसायिक दिवस लागतात.
Post Comment