बचत खात्यामध्ये कमीत कमी बॅलन्स किती असावा? | Bank Minimum Balance in Marathi | पहा कोणत्या बँकेमध्ये किती ठेवावा लागतो बॅलन्स?
Saving Account Balance: सर्वसाधारणपणे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे बँकेमध्ये खाते हे असतेच आपण जर बँकेच्या खात्यांचे विविध प्रकार पाहिले तर प्रामुख्याने यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसतील. त्यामध्ये पहिला आहे बचत खाते आणि दुसरा आहे करंट म्हणजेच चालू खाते. Bank Minimum Balance in Marathi.
आपण जर पगारदार व्यक्तींचा विचार करत असाल तर अशा व्यक्तींचे सर्वसाधारणपणे बँकेमध्ये बचत खाते तसेच चालू खाते अशी दोन्ही प्रकारचे खाते आपल्याला बघायला मिळतील (bank update).
परंतु यामध्ये जर आपण बघितले तर खात्याच्या बाबतीत सुद्धा बँकांचे काही महत्त्वाचे नियम असतात. यामधील मिनिमम बॅलन्स हा एक महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे बँक खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक रक्कम किती असावी याबाबतचा नियम ग्राहकांना पाळणे आवश्यक आहे.
प्रत्येक बँकेची मिनिमम बॅलन्स मर्यादा आपण बघितली तर ती वेगवेगळी असलेले आपल्याला पाहायला मिळेल आणि ती वेळोवेळी बदलत असते. तेवढा बॅलन्स या खात्यामध्ये राहू देणे खूप आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांना दंड भरावा लागतो.
परंतु जर तुमचे शून्य शिल्लक खाते असेल तर अशावेळी मिनिमम बॅलन्स त्या खात्यामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही तसे बघितले तर याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया ने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली नाहीत (bank rule).
बँकांच्या अंतर्गत संबंधित खात्यांचे देखरेख तसेच सर्विसिंग यासाठी जो काही खर्च येतो या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि मिनिमम किती बॅलन्स ठेवायचा हे ठरवले जाते.
या अनुषंगाने आपल्याला या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहेत की कोणत्याही बँकेच्या बचत खात्यामध्ये किती मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे याविषयी माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.
कोणत्या बँकेच्या खात्यात किती ठेवावा लागतो मिनिमम बॅलन्स? | Bank Minimum Balance in Marathi
स्टेट बँक ऑफ इंडिया | SBi Bank Minimum Balance
तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सेविंग खाते असेल तर याविषयी मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो तसेच शहरी विभागामधील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखांमध्ये या ठिकाणी बचत प्लस खाती असलेल्या ग्राहकांकरिता मिनिमम बॅलन्स तीन हजार रुपये शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.
तसेच निम शहरी विभागांमधील शाखांसाठी दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे (latest marathi update); यासोबतच ग्रामीण विभागातील खातेधारकांसाठी एक हजार रुपये इतका बॅलन्स शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
एचडीएफसी बँक | HDFC Bank Minimum Balance
एचडीएफसी बँकेचा विचार या ठिकाणी केला तर मेट्रो व शहरी विभागातील खातेधारकांसाठी दहा हजार तर ग्रामीण व निम शहरी विभागात असलेल्या शाखांसाठी अडीच हजार रुपये यासोबतच निमशहरी विभागात असलेल्या ग्राहकांना मिनिमम बॅलन्स 5000 रुपये इतका शिल्लक ठेवावा लागेल.
येस बँक | YES Bank Minimum Balance
जर येस बँकेमध्ये तुमचे सेविंग खाते असेल तर अशा ग्राहकांकरिता दहा हजार रुपये मिनिमम बॅलन्स त्यांच्या खात्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे; जर एखाद्या ग्राहकांच्या अंतर्गत कमीत कमी शिल्लक आवश्यकता ठेवली गेली नाही तर प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांपर्यंत या ठिकाणी नॉन मेंटेनन्स शुल्क आकारला जात आहे.
आयसीआयसीआय बँक | ICICI Bank Minimum Balance
आयसीआयसीआय बँकेचा आपण विचार केला तर शहरी व मेट्रो विभागात असलेल्या बँकेच्या शाखांमध्ये कमीत कमी दहा हजार रुपये शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक आहे.
तसेच निम शहरी व ग्रामीण विभागामधील शाखांमध्ये असलेल्या बचत खात्यावर अनुक्रमे पाच हजार रुपये व एक हजार रुपये इतकी रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
Bank Minimum Balance in Marathi या विषयाची माहिती आपल्याला महत्वपूर्ण वाटली असेल तर कंमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा.