ATM वापरण्याचे 10 फायदे | What is ATM in Marathi | असे करा ATM वापरून सुरक्षित व्यवहार

what is atm in marathi
Spread the love

सर्वसाधारणपणे ATM बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे जास्तीत जास्त लोकांकडून ATM चा वापर केला जात नसल्याचे आढळून येते. पण आपल्याजवळ ATM किंवा डेबिट कार्ड (Debit Card) जर असेल तर आपण बँकेच्या व्यवहाराबरोबरच इतर भरपूर कामे करू शकतो हे मात्र फारच कमी जणांना माहित असते.

ATM वापरत नसल्यामुळे आपल्याला बँकेत सुद्धा फार वेळ रांगेमध्ये तिष्टत उभे राहावे लागते. त्यामुळे आपला वेळाही खूप जात असतो. तर आपण ATM म्हणजे काय (What is atm in Marathi), atm meaning in marathi, एटीएम चे फायदे मराठी, त्याचबरोबर ATM वापरण्याचे १० फायदे  जाणून  घेणार आहोत .

ATM म्हणजे काय? | What is ATM in Marathi?

ATM चा long form (atm full form in marathi) Automated Teller Machine असून त्याचा उपयोग हा पैसे काढण्यासाठी होतो. अशाप्रकारे ATM मधून पैसे काढण्यासाठी आपल्याला ATM Card ची जरुरत असते.

ATM Card हे एक Plastic Card असून त्याचा वापर पैसे काढण्याबरोबरच इतरही Online कामांसाठी केला जातो. हे सगळे करण्यासाठी आपल्याला ATM Card ची आवश्यकता असते.

हे ATM Card आपल्याला आपले ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेकडून मिळू शकते त्यासाठी आपल्याला बँकेत जाऊन ATM Card मागणीसाठी form भरून द्यावा लागेल. (atm meaning in marathi)

ATM Card मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी (Important things for getting ATM)

  • आपले कोणताही एका बँकेत खाते असावे लागते.
  • खात्याला पूर्ण KYC केलीली असावी.
  • खात्याला मोबाईल नंबर लिंक केलेला असावा.
  • ATM Card बचत खाते (Saving Account), /चालू खाते (Current Account), /ओवर ड्राफ्ट खाते (Overdraft Account), /कॅश क्रेडीट खाते (Cash Credit Account) यांना दिले जाते.

ATM Card मधून पैसे कसे काढावे?  | How to Withdraw from ATM?

  • ATM मधून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ATM Machine मधील ATM Slot मध्ये ATM Card Insert करावे लागेल.
  • ATM Card insert केल्यानंतर भाषा निवडण्याचा पर्याय येईल त्यामधून हिंदी किंवा इंग्लिश भाषा निवडावी लागेल.
  • त्यानंतर ATM Pin चा पर्याय येईल त्यामध्ये आपला ४ अंकी ATM Pin टाकावा लागतो.
  • ATM Pin टाकल्यानंतर आपल्याला खात्याचा प्रकार निवडावा लागेल जसेकि बचत खाते (Saving Account), चालू खाते (Current Account),  क्रेडीट कार्ड (Credit Card) इत्यादी.
  • त्यानंतर वेगवेगळे पर्याय येतील उदा. Cash Withdrawal, Balance Inquiry, Mini Statement  इत्यादी त्यापैकी Cash Withdrawal हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर आपल्याला रक्कम टाकावी लागेल जसे कि २००० रु. रक्कम टाकल्यानंतर ATM Machine मधून पैसे आपल्याला मिळतील.
  • शेवटी ATM Keyboard वरील Cancel  बटनावर क्लिक करून आपल्याला व्यवहार पूर्ण करता येईल.

ATM Card वापरण्याचे फायदे | ATM वापरण्याचे १० फायदे (Benefits of using ATM Card)

दैनंदिन जीवनामध्ये ATM  हा एक अविभाज्य भाग झालेला आहे. ATM  वापरात असताना त्याचा पैसे काढण्यासाठी जास्त वापर होत असलेला आपण बघतो. पण पैसे काढण्याबरोबरच ATM चे १० फायदे जाणून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल.
  • वेळ, श्रम, पैसा यांची बचत

सामान्यपणे पैसे काढण्यासाठी आपल्यालाला बँकेत जावे लागते. बँकांमध्ये लांबच लांब रांगा  लागलेल्या असतात याचा अनुभव आपण कित्येकदा घेतला असेल.

यातून आपला वेळ, श्रम आणि पैसा यांचा अपव्यव होत असतो. ATM चा वापर आपण करत असाल तर या गोष्टींपासून सुटका होऊ शकते म्हणजेच बँकेत न जाता कुठूनही आपल्याला ATM मधून पैसे काढता येतील.

  • Mini Statement काढता येते

कित्येकदा आपल्याला आपल्या व्यवहारांची  पडताळणी करण्यासाठी बँकेत जाऊन पासबुक भरून घ्यावे लागते. पण आपल्याजवळ ATM असेल तर ATM मधून आपल्याला Mini Statement ची प्रिंट  येते आणि आपल्या मागील व्यवहारांची पडताळणी करता येते.

  • २४/७ सेवा

ATM २४/७ म्हणजेच दिवसाचे २४ तास आणि ७ दिवस कधीही वापरता येते म्हणजेच आपण आपल्या बँकेच्या कामाचे नियोजन स्वतः करू शकतो. त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नसते. बँकेला सुट्टी असते त्यावेळी म्हणजे रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुद्धा ATM द्वारे बँकेचे व्यवहार करता येतात.

  • Money Transfer करता येते

ATM चा वापर करून Money Transfer करता येते. एका खात्यावरून दुसऱया  खात्यावर Money Transfer करणे हल्ली फारच सोपे झाले आहे.

  • UPI Pin तयार करण्यासाठी वापर

UPI पिन तयार करण्यासाठी सुद्धा ATM चा वापर होतो. सध्या UPI द्वारे पण व्यवहार करता येतात त्यासाठी रेजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा UPI चा ४ अंकी Pin  तयार करण्यासाठी ATM चा वापर होऊ शकतो. whatsapp payment system नुकतीच चालू झाली आहे त्याचा वापर करून सध्या UPI चा वापर वाढताना दिसून येतो.

  • Mobile Banking चालू करण्यासाठी

Mobile Banking सुरु करण्यासाठी डेबिट कार्ड ची गरज असते. सध्या प्रत्येक बँकेचे mobile banking app असते ते चालू करण्यासाठी किंवा त्यावरून व्यवहार करण्यासाठी ATM ची गरज असते.

Mobile Banking चा वापर करून बँकेच्या इतर सेवा जसे कि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चालू करणे, डेबिट कार्ड ची मर्यादा निश्चित करणे, चेक बुक साठी अर्ज करणे इत्यादी कामे करता येतात.

  • POS/Online shopping

ATM Card चा वापर करून POS/Online Shopping करता येते. Online Shopping म्हणजेच Amazon, Flipcart, किंवा इतर Sites वरून Shopping करण्यासाठी ATM card फारच फायदेशीर ठरते.

POS Machine वरती ATM Card Swipe करूनही खरेदी करता येते त्यासाठी पैसे खिशामध्ये बाळगण्याची गरज नाही.

  • Bill Payment

वेगवेगळ्या प्रकारचे Bill Payment (Moblie recharge, Electricity Bill, WaterBill, Postpaid Bill, Credit Card Bill) करता येतात. आता कोणत्याही प्रकारचे Bill Payment करण्यासाठी कोणत्याही ऑफिस मध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही तर ते आपण mobile वरूनही करू शकतो त्यासाठी ATM Card ची गरज असते.

  • जगभरात वापर

ATM Card चा वापर जगभरात करता येत असल्यामुळे आपण कोणत्याही देशात असलो तरी आपल्याला त्या देशामध्ये पैसे काढता येतात. ATM Card ला कोणत्याही सीमेचे बंधन नसल्यामुळे जगभरात कुटेही आपल्याला ATM द्वारे व्यवहार करता येतात.

  • १०. बँकांवरचा ताण कमी

बँकांमध्ये  सध्या गर्दी होत असल्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. ATM Card किंवा अन्य Digital Banking चा वापर केला तर बँकांवरचा ताण निच्छितच कमी होऊ शकतो.

Image by Sebastian Ganso from Pixabay 

ATM Card वापरताना घ्यावयाची काळजी (Precautions while using ATM)

ATM कार्ड वापरात असताना बहुतेक जणांच्या मनामध्ये त्याच्या वापराबद्दल भीती असते. खाली सांगितलेल्या गोष्टींचा वापर करून आपण निश्चितपणे सुरक्षितपणे व्यवहार करू शकतो.

  • डेबिट कार्ड कायम सुरक्षित ठिकाणी ठेवा.
  • ATM Card चा Pin खाजगीत ठेवा तो कोणालाही सांगू नका किंवा ATM Card pin कुठेही लिहून ठेऊ नका ATM Card Pin चा उपयोग करून त्याचा गैरवापर होऊ शकतो.
  • ATM Card बद्दलची माहिती फोन वरून कुणालाही देऊ नका जसे कि डेबिट कार्ड नंबर, ATM Card Pin, CVV नंबर इत्यादी. कोणत्तीही बँक फोनवरून ATM Card विषयी माहिती विचारात नाही त्यामुळे गैरप्रकाराला बळी पडू नका.
  • ATM मधून पैसे काढल्यानंतर येणारी कागदी स्लीप स्वतासोबातच ठेवा ती कुठेही टाकून देऊ नका. पूर्ण व्यवहार झाल्यानंतरच ATM मधून बाहेर पडा.
  • ATM  Card चा Pin सतत अधूनमधून बदला. एकाच Pin चा वापर जास्त दिवस करू नका.
  • ATM Card हरवले असेल तर त्वरित बँकेला कळवा किंवा ATM Card च्या पाठीमागे दिलेल्या Customer Care नंबरला फोन करून Card Hotlist (ATM Card Hotlisting) करून घ्या.

अशा पद्धतीने आपण ATM वापरताना जर काळजी घेतली तर सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार करू शकतो

ATM  म्हणजे काय (डेबिट कार्ड म्हणजे काय?) atm in marathi आणि ATM वापराचे १० फायदे याविषयाची माहिती आपल्याला महत्वपूर्ण वाटली असेल तर कंमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा.

डेबिट कार्ड म्हणजे काय?

ATM चा long form Automated Teller Machine असून त्याचा उपयोग हा पैसे काढण्यासाठी होतो.

एटीएम चे फायदे

ATM  वापरात असताना त्याचा पैसे काढण्यासाठी जास्त वापर होत असलेला आपण बघतो. पण पैसे काढण्याबरोबरच ATM चे १० फायदे आहेत.


Spread the love

Post Comment

You May Have Missed