ATM वापरताना होऊ शकते फसवणूक | ATM Card Fraud in Marathi | ATM वापरताना अशी घ्या काळजी

atm card fraud in marathi
Spread the love

अलीकडे आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपल्याला बँक कामासाठी हि वेळ कमी लागू लागला आहे पण त्याचमुळे घोटाळे होण्याचे प्रमाण हि वाढले आहे. UPI Fraud, ATM Fraud ह्यासारख्या गोष्टीमध्ये गैरव्यवहार होण्याचे प्रमाण हि वाढू लागले आहे. (atm card fraud in marathi).

आजकाल घोटाळे करणारे किंवा फसवणूक करणारे लोक इतके हुशार किंवा अपडेटेड झाले असून आपल्याला फसवण्यासाठी नवनवीन पर्याय किंवा मार्ग शोधून काढतात.

त्यामुळे अलीकडे ATM Scams किंवा ATM Fraud चे प्रमाण खूप वाढत चालले आहे. आपल्या अगदी थोड्याश्या निष्काळजीपणामुळे फसवणूक करणारे लोक आपले खूप मोठ्या रक्कमेची फसवणूक करू शकतात. 

त्याच ATM Fraud किंवा घोटाळ्यांचे प्रकार, त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आमच्या ह्या लेखात घेवू.

एटीएम फसवणूक किंवा घोटाळा म्हणजे काय? | What is ATM Fraud in Marathi

एटीएम फसवणूक किंवा घोटाळा म्हणजे (atm card fraud in marathi) काय ह्यांची आपण थोडक्यात माहिती घेवू.

आपल्याला बर्याचवेळा वाटते की एटीएम मशीन लुटणे हीच सर्वात मोठी फसवणूक किंवा चोरी केली असू शकते पण तसे नाही. अलिकडच्या वर्षांत,  फसवणूक पूर्वीपेक्षा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने केली जात आहे. बर्‍याचदा फसवणूक करणारे किंवा चोरी किंवा घोटाळा करणारे जेव्हा मशीनमध्ये हल्ला करतात तेव्हा तेथे उपस्थित असण्याची गरज नसते. एटीएम घोटाळे किंवा गैरप्रकार, गुन्हे विविध  Technique आणि फसवणुकीच्या प्रकारांद्वारे केले जातात.

एक म्हणजे फसवणूक करणारे लोक आपला एटीएम पिन आणि कार्ड चोरून आपली फसवणूक करतात किंवा एटीएम मधील पैश्याची चोरी करून सुद्धा फसवणूक केली जावू शकते. भारतात अशा भरपूर घटना झालेल्या आहेत. (atm card frauds in india). 

एटीएम फसवणुकीचे प्रकार | Types of ATM Frauds

  • कार्ड शिमिंग | Card shimming
  • कार्ड स्किमिंग | Card skimming
  • कार्ड ट्रॅपिंग | Card trapping
  • कीबोर्ड जॅमिंग  | Jamming of keyboard
  • फिशिंग | Phishing

कार्ड शिमिंग | Card shimming

कार्ड शिमिंग हा ATM कार्ड फसवणुकीच्या प्रकारांपैकी सर्वात धोकादायक एक प्रकार आहे. शिमर हे प्रदेशात तयार केले जाते. हा एक पातळ बोर्ड असतो जेथे आपण कार्ड घालतो त्या टिकाणी कार्ड रीडरमध्ये काळजीपूर्वक घातलेला असतो. ते आपणाला समजतच नाही.

त्यामुळे, सामान्य बँक कार्ड सेवेमध्ये कोणताही व्यत्यय न आणता, चुंबकीय पट्टीवरून किंवा डेटा वरून फसवणूक करणार्याशी आपले कार्ड जोडले जाते. अशा प्रकारे फसवणूक करणार्‍याला आपली आवश्यक असलेली सर्व माहिती मिळते आणि ते आपले बँक खाते रिकामे करतात. म्हणजे आपल्या खात्यातून रक्कमेची चोरी केली जाते.

कार्ड स्किमिंग Card skimming

कार्ड स्किमिंग हा हा ATM कार्ड फसवणुकीच्या प्रकारांपैकी सर्वात एक लोकप्रिय प्रकार आहे. ह्या प्रकारामध्ये एटीएम मशीन मध्ये असे उपकरण बसवले जाते त्यामुळे आपण जेव्हा व्यवहार करत असतो त्यावेळी आपल्या कार्डची माहिती वाचण्याची संधी फसवणूक करणार्यांना मिळते त्यामुळे.

ते लोक magnetic strip वर असेलला पिन कोड चा वापर करून कार्ड डुप्लिकेट तयार करतात. हे डुप्लिकेट कार्ड फसवणूक करणार्यांना विविध ठिकाणी पेमेंट करण्याची परवानगी देते.

स्किमर म्हणजे  एटीएमच्या मुख्य भागांना छोटे छोटे जोडलेले उपकरण असतात. त्या उपकरणांमध्ये सहसा ह्या गोष्टीचा समावेश असतो.

  • Magnetic head – डेटा वाचन आणि कॉपी करण्यासाठी
  • Micro converter
  • storage device – स्टोरेज माध्यमावर कोड लिहिण्यासाठी
  • व्हिडिओ कॅमेरा
  • एक कीबोर्ड – जो माहिती मिळवण्यासाठी मूळ कीपॅडवर बसवला जातो.

कार्ड ट्रॅपिंग | Card trapping

कार्ड ट्रॅप म्हणजे आपण ज्यावेळी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातो त्यावेळी आपली रक्कम निघते पण आपले कार्ड तिथेच अडकते कारण फसवणूक करणारे कार्ड रीडरमध्ये एखादे उपकरण बसवतात. त्यामुळे आपले कार्ड तिथेच अडकते.

फसवणूक करणारा सहसा एटीएमवरील छुप्या व्हिडिओ कॅमेराद्वारे पिन नंबर मिळवतो आणि आपण कार्ड निघत नाही म्हणून कार्ड सोडून आजूबाजूला मदत मागण्यासाठी गेलो तर ते आपल्या कार्डचा वापर करून रक्कम काढू शकतात किंवा मदत करण्याच्या उदेशाने येवून त्यांच्या जवळच्या हुबेहूब कार्डने आपले कार्ड बदलतात आणि आपण गेल्यानंतर कार्डचा वापर करून रक्कम काढतात आणि आपण फसवले जातो.

कीबोर्ड जॅमिंग  | Jamming of keyboard

आपले व्यवहार यशस्वी होण्यापासून रोखण्यासाठी फसवणूक करणारे एटीएम कीपॅडवरील (रद्द करा, एंटर इ.) महत्त्वाची बटणे ब्लॉक केली जातात त्यामुळे आपण कदाचित तिथून निघून जावू शकतो. त्यामुळे फसवणूक करणारे पैसे काढण्यासाठी परत त्या बटणाचा वापर करतात.

फिशिंग | Phishing

फिशिंग म्हणजे कार्डधारकाकडून म्हणजे आपल्याकडून कार्ड तपशील चोरणे किंवा माहिती मिळवणे. या प्रकारच्या घोटाळ्यामध्ये पासवर्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक, बँक खाती आणि इतर अशी महत्वाची माहिती चोरली जावू शकते.

सायबर गुन्हेगार आपल्या ज्या खात्यांशी आपले बँक कार्ड लिंक आहे त्या खात्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती मिळवतात आणि आपल्या खात्यांमधून पैसे चोरतात.

IDFC First Bank Credit Card online apply करण्यासाठी येथे क्लिक करा.  

फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठीचे उपाय | Measures to prevent from ATM fraud

कार्ड शिमिंग टाळण्यासाठी

ज्यावेळी  आपण एटीएम वापर करत असतो त्यावेळी कार्ड रीडर स्लॉट काळजीपूर्वक चेक करणे गरजेचे आहे.

एटीएम रूम मध्ये गेल्यावर मशीनची तपासणी करणे, बँक व्यवहारांचा इतिहास चेक करणे आणि कार्ड स्लॉटच्या आसपासचे निरीक्षण करणे ह्या गोष्टीची काळजी घेणे.

शिमिंग टाळण्यासाठी बँकाहि प्रयत्नशील असतात. त्या सुद्धा  नियमितपणे एटीएम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपडेट करतात.

कार्ड स्किमिंग टाळण्यासाठी

आपण बँका आणि सुरक्षित संस्थांमध्ये असलेल्या एटीएमचा वापर करणे कधीही सुरक्षित असते.

आपल्या कार्डला चिप असावी. जरी कधी आपले कार्ड हरवलेच तर त्याबाबतची माहिती बँकेला देवून कार्ड ब्लॉक करण्यासाठी विनंती करावी.

तसेच आपण आपल्या कार्ड व्यवहारांबद्दल एसएमएस येण्यासाठी आपला मोबाईल नंबर खात्याला लिंक करावा. त्यामुळे आपल्याला गैरव्यवहार झालाच तर आपल्या लगेच लक्षात येईल.

आपण रक्कम काढण्यासाठी रक्कम मर्यादा सेट करणे सोयीचे असते.

कार्ड ट्रॅपिंग टाळण्यासाठी

आपण जेव्हा कार्ड रीडरमध्ये आपले कार्ड जात नसताना जबरदस्तीने घालत असतो त्यावेळी  ट्रॅपिंग होण्याची शक्यता जास्त असते आणि आपले कार्ड स्लॉटमध्ये अडकले गेले त्या एटीएम मशीनपासून दूर जाऊ नका.

आपण आपल्या फसवणुकीच्या घटनेची तक्रार करून (atm card frauds complaint) कार्ड ब्लॉक करा.

कीबोर्ड जॅमिंग टाळण्यासाठी 

एकाद्या एटीएमच्या कीपॅडची बटन चालू होत नसतील तर त्या एटीएमचा वापर करू नये. त्याच ठिकाणी असलेल्या दुसर्या एटीएमचा वापर करणे धोक्याचे असते. कारण त्यावर फसवणूक करणार्यांनी स्किमिंग उपकरण बसवलेले असू शकते. म्हणून त्यांनी पहिल्या एटीएमच्या कीपॅडची बटने जाम केलेली असू शकतात.

फिशिंग टाळण्यासाठी

फसवणूक करणारे आपली माहिती चोरण्यासाठी सरकारी संस्था किंवा सुप्रसिद्ध कंपन्यांच्या वतीने ईमेल पाठवतात. अशा ईमेल द्वारे आपण ईमेलमध्ये दिलेल्या लिंक वर किल्क केले कि त्यांना आपली माहिती मिळू शकते. त्यामुळे आपण अश्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देवू नये.

आपण क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्र आहात का? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करून Free Cibil Score चेक करा.

एटीएम (ATM) वापरताना कोणती काळजी घ्यावी | What precautions should be taken while using ATM

  • आपण आपल्या एटीएम पिनचा वापर अगदी काळजीपूर्वक करावा.
  • पिन टाकताना आजूबाजूला कोणी नाही ना ह्यांची खात्री करून गुप्तपणे टाकावा.
  • आपण पिन कोणालाही सांगणे टाळावे.
  • (ATM) मशीनवर पिन टाकताना कीपॅड देखील निट तपासावे.
  • कधी कधी गडबडीच्यावेळी आपण आपले एटीएम कार्ड आणि पिन मित्रांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना देतो ते टाळावे कारण जवळच्या व्यक्तीकडून हि फसवणूक होवू शकते.
  • कधी एटीएम कार्ड आणि पिन देण्याची वेळ आलीच तर आपण पिन बदलावा तसेही आपण आपला एटीएम पिन सतत बदलणे गरजेचे असते.
  • एटीएम मशीनमधून पैसे काढताना आपण मशीनमध्ये कार्ड रीडर नेहमी तपासावे. त्या ठिकाणी क्लोनिंग यंत्र ठेवलेले असू शकते आणि आपले एटीएम कार्ड स्कॅन केले जावू शकते.
  • आपण  शक्य तितके फक्त बँक किंवा संस्था जेथे गार्ड आहेत अश्याच एटीएमचा वापर करावा.
  • आपण खरेदी रिचार्ज किंवा इतर वॉलेटसाठी आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सेव्ह करणे हि धोक्याचे असते.

atm card fraud in marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

एटीएम फसवणूक कशी होते?

एटीएम वापरण्यात ग्राहकांच्या दुर्लक्षामुळे बहुतेक एटीएम फसवणूक होते. स्किमिंगसारख्या अत्याधुनिक गुन्ह्यांपेक्षा भारतात एटीएम फसवणुकीचे प्रमाण इतरांना पिन वापरण्यास देण्यामुळे जास्त आहे.

माझ्या पिनशिवाय कोणीतरी माझे एटीएम कार्ड वापरू शकतो का?

फसवणूक करणारे तुमच्याकडे कार्ड नसले तरीही ते तुमचे डेबिट कार्ड वापरू शकतात. त्यांना तुमच्या पिनचीही गरज नसते.


Spread the love
Previous post

UPI फसवणुकीपासून वाचण्यासाठी या 7 गोष्टींची घ्या काळजी | UPI Fraud in Marathi | कोणकोणत्या गोष्टींमुळे होऊ शकते UPI वरून फसवणूक

Next post

क्रेडीट कार्ड चे विविध 13 प्रकार | Types of Credit Card in Marathi | जाणून घ्या तुमच्यासाठी कोणते असेल फायदेशीर

Post Comment

You May Have Missed