एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवल्यावर करा हे उपाय | ATM Card Credit Card Lost in Marathi | अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

atm card credit card lost in marathi
Spread the love

आजकाल आपण इतके अपडेट झालो आहोत कि कोणतेही व्यवहार करताना आपण कॅशलेस व्यवहार करतो. त्यासाठी आपण एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ह्यांचा वापर करतो.

आपले एटीएम कार्ड किंवा क्रेडिट  कार्ड  हरवले तर आपले खूप मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. आपल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे क्रेडीट कार्ड वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आपले क्रेडिट कार्ड /एटीएम कार्ड हरवल्यानंतर (ATM Card Credit Card Lost in Marathi) आपण ताबडतोब कृती करणे आवश्यक आहे. 

त्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे ते जाणून घेवू.

एटीएम कार्ड  किंवा  क्रेडिट कार्ड  हरवल्यावर काय करावे? | What to do If you Lost your ATM Card or Credit Card?

आपल्या बँकेला कळवा आणि आपले कार्ड लगेच ब्लॉक करा.

  • आपले एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेले हे आपल्या लक्षात आल्यावर लगेच आपल्या बँकेला कॉल करून क्रेडिट कार्ड हरवल्याची माहिती दिली पाहिजे. त्यानंतर बँक आपले क्रेडीट कार्ड ब्लॉक करेल. त्यामुळे आपले कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही.
  • आपले क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला हि आपण कॉल करू शकतो.
  • आपले क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यानंतर, लगेच क्रेडीट कार्ड ची  गरज असेल तर आपण डुप्लिकेट क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.

एफआयआर (FIR) नोंदवणे

  • आपले एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड  हरवल्याची माहिती बँकेला दिल्यानंतर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन क्रेडिट कार्ड हरवल्याबद्दल पोलिसांकडे एफआयआर किंवा तक्रार नोंदवणे हा नेहमीच चांगला पर्याय आहे.
  • FIR हे आपल्या एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून देखील काम करते आणि आपल्याला डुप्लिकेट क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यात मदत करते.

आपल्या क्रेडिट ब्युरोशी संपर्क साधणे

  • आपले क्रेडीट कार्ड हरवल्यानंतर क्रेडिट ब्युरोशी किंवा cibil शी संपर्क साधून आपले क्रेडिट कार्ड हरवल्याची माहिती द्यावी. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे हि त्यांचे लक्षात येईल.
  • फसवणूक करण्यार्यानी आपल्या क्रेडीट कार्डचा गैरवापर केला तर आपल्या क्रेडिट स्कोअरवर काही परिणाम होणार नाही याची खात्री होईल.
  • आपण आपला क्रेडिट अहवाल देखील तपासून काही चुकीची माहिती आढळल्यास क्रेडिट ब्युरोला कळवावे. त्यामुळे आपला सिबिल स्कोअर खराब होणार नाही.
  • आपल्या क्रेडिट किंवा  एटीएम कार्ड  स्टेटमेंटवर लक्ष ठेवणे.
  • आपण जरी क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड  हरवल्याची तक्रार तुमच्या बँकेला केली तरीही आपण आपल्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर लक्ष ठेवले पाहिजे.
  • आपल्या कार्डचा कोणताही व्यवहार संशयास्पद वाटल्यास, आपण ताबडतोब आपल्या बँकेशी संपर्क साधून तक्रार करू शकतो.

आपल्याला क्रेडिट कार्डची गरज असेल तरच पुन्हा अर्ज करणे

  • आपल्याला क्रेडीट कार्डची आवश्यकता असेल तरच आपण नवीन क्रेडीट कार्डसाठी अर्ज करणे सोयीचे असते. अनेकदा आपल्याकडे क्रेडीट कार्ड असते पण आपण त्याचा वापर हि करत नसतो.
  • जर आपण क्रेडिट कार्डचा वापर करत नसाल तर आपल्या क्रेडिट कार्ड खाते बंद करणे कधीहि ते चांगले असते. असे केल्याने आपल्याला पैसे वाचविण्यास मदत होईल आणि आपल्याला वार्षिक किंवा नवीन कार्डचे शुल्क भरावे लागणार नाही.

घाबरू नये

  • क्रेडीट कार्ड हरवणे म्हणजे आपलीं एखादी महागडी वस्तू हरवल्यासारखे आहे. पण तरीसुद्धा आपण आपल्या नुकसानाबद्दल घाबरून न जाता कृती करणे कधीहि गरजेचे असते.
  • आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनचे नुकसान टाळावे.

हरवलेल्या एटीएम कार्डचे डुप्लिकेट एटीएम कार्ड कसे मिळवायचे?

आपले एटीएम कार्ड हरवलेले किंवा चोरी झाले असेल तर आपले ATM ब्लॉक केल्यानंतर आपण नवीन ATM साठी अर्ज करतो. तो अर्ज करण्याच्या पद्धतीची माहिती घेवू.

नेट बँकिंग

आपल्याला नेटबँकिंग ही बँकांनी दिलेली ऑनलाईन सेवा आहे. आपल्याला बँक भरपूर सुविधा अनेक सहजतेने देऊ करते.

आपण फक्त पैसे हस्तांतरित करणे किंवा क्रेडिट/डेबिट कार्डने पैसे देण्यापेक्षा बरेच काही करू शकतो. आपण नेटबँकिंग द्वारे हरवलेल्या एटीएम कार्डसाठी अर्ज करू शकतो. काही दिवसातच बँका आपली  विनंती स्वीकारतात आणि आपल्या  खात्याच्या तपशीलांमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार आपल्या पत्त्यावर नवीन कार्ड पाठवतात.

मोबाइल बँकिंग

आपले नेटबँकिंग नसेल किंवा त्यांचा वापर करता येत नसेल तर आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा मोबाइल बँकिंग सेवेचा वापर करून अनेक सेवांचा वापर करू शकतो.

आपले हरवलेले कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी आपण आपल्या बँकेच्या मोबाईल ऍप्लिकेशनवरून विनंती करू शकतो. आपले बँकेचे मोबाइल अॅप्लिकेशन्स वरून विनंती करून आपल्याला एटीएम कार्ड मिळते.

ग्राहक सेवा (Customer service)

जर आपल्याकडे इंटरनेट बँकिंग नसेल किंवा मोबाइल अॅप्लिकेशन्सचा वापर करण्यास सोयीस्कर वाटत नसेल, तर आपण बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून नवीन एटीएम कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी बँक प्रतिनिधीशी बोलू शकतो.

आपली विनंती ग्राहक सेवा कर्मचार्‍यांनी नोंदवल्यानंतर आपल्याला नवीन कार्ड दिले जाईल आणि आपल्या बँकेत असणाऱ्या पत्त्यावर त्वरित पाठवले जाईल.

बँकेत जाऊन अर्ज करणे

जर आपल्याला नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगमध्ये ग्राहक सेवा ह्या सगळ्या गोष्टीविषयी काही माहिती नसेल तर आपण आपल्या  बँकेच्या शाखेला वैयक्तिकरित्या भेट देऊ शकतो आणि आपण बँकेत अर्ज करू शकतो. त्यानंतर आपले डेबिट कार्ड बँकेतून देखील घेऊ शकतो किंवा ते आपली विनंती पूर्ण झाल्यानंतर पत्त्यावर पाठवू शकता.

ATM Card Credit Card Lost in Marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

माझे एटीएम कार्ड हरवले तर मी काय करावे?

कॉल करा किंवा मोबाइल अॅपवर जा आणि शक्य तितक्या लवकर कार्ड ब्लॉक करा आणि बँकेल कळवा.

एटीएम कार्ड हरवल्यास नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज करता येईल का?

नवीन डेबिट कार्डसाठी विनंती करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या शाखेला भेट देऊ शकता.


Spread the love

Post Comment

You May Have Missed