ऑनलाईन क्रेडीट कार्ड फसवणुकीपासून सावधान | Credit Card Fraud in Marathi | क्रेडिट कार्ड फसवणुक किंवा घोटाळा टाळण्यासाठीचे उपाय

credit card fraud in marathi
Spread the love

आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपण डेबिट कार्ड (ATM Card), क्रेडीट कार्ड ह्या गोष्टीचा वापर करतो. आधी कॅशची चोरी केली जात होती पण आता मात्र fraud करून चोरी केली जाते आहे.  त्यामुळे ATM fraud, UPI fraud, Credit Card Fraud ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणूक करणार्यांनी घोटाळा करण्यासाठी अनेक पद्धती निर्माण केल्या आहेत. (credit card fraud in marathi)

जसजशी बँकिंग क्षेत्रात प्रगती झाली तसे आपण व्यवहार करताना कॅशने न करता online व्यवहार, डेबिट कार्ड (ATM Card),  क्रेडीट कार्ड ह्या गोष्टीचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे.

आज आपण Credit Card Fraud ह्या विषयीची माहिती घेणार आहोत, जसे कि fraud चे प्रकार आणि त्यापासून वाचून सुरक्षित व्यवहार कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेवू.

क्रेडिट कार्ड फसवणूक किंवा घोटाळा म्हणजे काय? | What is Credit Card Fraud in Marathi?

आपले क्रेडीट कार्ड चोरी करून किंवा fraud करून आपली माहिती वापरून आपल्या क्रेडीट कार्डच्या मदतीने खरेदी करणे किंवा गैरव्यवहार करणे ह्याला फसवणूक किंवा घोटाळा असे म्हणले जाते. फसवणूक करणारे इतके प्रगतशील झाले आहेत कि आपल्या माहितीचा वापर करून फसवणूक करणे त्यांना सहज सोपे झाले आहे. आपली माहिती मिळवून आपल्या परवानगीशिवाय खरेदी किंवा घोटाळे देखील होऊ शकतात.

आपण आपल्या क्रेडीट कार्डचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. आपल्या व्यवहारांवर नियमितपणे तपासणी केली पाहिजे.

कुणाला मिळेल क्रेडीट कार्ड आणि क्रेडीट कार्डचे प्रकार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

क्रेडीट कार्डवरून फसवणुक कोणत्या प्रकारे केली जाते? | Types of credit card frauds

डंपस्टर डायव्हिंग

आपण जेव्हा credit card द्वारे खरेदी करतो तेव्हा आपण त्या खरेदीची बिल किंवा कागदपत्रे त्याच ठिकाणी टाकतो. आपण टाकलेल्या त्या बिलांवर किंवा कागदपत्रांवर आपला क्रेडिट कार्ड नंबर असतो. त्यांचा वापर करून फसवणूक करणारे आपली माहिती मिळवतात आणि खरेदी किंवा गैरव्यवहार करतात.

कार्ड स्किमिंग किंवा पॉइंट ऑफ सेल फसवणूक  

कार्ड स्किमिंग म्हणजे आपण जेव्हा व्यवहार करत असतो त्यावेळी आपण ज्या ठिकाणी खरेदीसाठी कार्ड स्वाइप करतो, त्या ठिकाणी असे उपकरण बसवले जाते ज्यामुळे आपल्या कार्डची माहिती वाचण्याची संधी फसवणूक करणार्यांना मिळते.

स्किमिंग द्वारे आपला पासवर्ड किंवा पिन कोड कॉपी केला जातो आणि त्यापासून गैरव्यवहार केले जातात किंवा खरेदी केली जाते.

कार्ड रीडर मध्ये आपल्या  क्रेडिट कार्ड डेटा स्किम केला जातो आणि आपल्या माहितीचा गैरवापर केला जातो.

जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करताना क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यासाठी पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसेसचा वापर करतो. फसवणूक करणारे या PoS उपकरणांना लहान स्किमिंग उपकरणे जोडतात.

जेव्हा आपण payment करण्यासाठी मशीनमध्ये क्रेडिट कार्ड वापरतो तेव्हा आपल्या क्रेडिट कार्डची माहिती स्कॅन केली जाते आणि माहिती मिळवली जाते किंवा एकदा कॅमेरा बसवला जातो जो PoS डिव्हाइसच्या कीपॅडकडे निर्देशित केलेला असतो त्या कॅमेराद्वारे आपला पिन मिळवला जातो.

फिशिंग

फसवणूक करणारे आपले क्रेडिट कार्ड चोरी करतात. आपले खाते क्रमांक, नाव आणि पासवर्ड ह्यांची माहिती मिळवण्यासाठी फोन, ईमेल किंवा सोशल मीडिया चॅनेल ह्यांचा वापर करतात.

आपल्याला बँकांकडून अत्यंत खरे वाटणारे ईमेल आणि संदेश प्राप्त होतात. त्यामधील लिंकवर क्लिक करण्यास सांगतीले जाते आणि आपले कार्ड तपशील येथे विचारले जातात. आपली माहिती मिळवून खरेदी करतात.

आपले ईमेल पत्ते किंवा पासवर्ड बदलून आपल्या खात्यांवर नियंत्रण मिळवतात. आपली संवेदनशील माहिती वापरून आपली फसवणूक केली जाते.

हॅकिंग

आपण क्रेडीट कार्ड चा वापर करून खरेदी करणाऱ्या कंपनी किंवा मॉल ह्यांना हँक केले जाते. तसेच आपल्या क्रेडीट कार्ड ची क्रियाकलाप करणाऱ्या कंपन्याना सुद्धा हँक केले जाते. हँक करून आपली सर्व माहिती मिळवली जाते आणि आपली फसवणूक केली जाते.

क्रेडिट कार्ड कसे काढावे? हे माहित नसेल आणि आपल्याला क्रेडिट कार्ड हवे असेल तर पुढील लिंक वरती क्लिक करून आपण क्रेडिट कार्ड अप्लाई ऑनलाइन करू शकता.  SBI Credit Card, IDFC First Bank Credit Card, Axis Bank Credit Card, AU Small Finance Credit Card, Indusind Credit Card, HDFC Bank Credit Card etc.

क्रेडिट कार्ड फसवणुक किंवा घोटाळा टाळण्यासाठीचे उपाय | Ways to Prevent Credit Card Frauds

क्रडिट कार्ड फसवणुक किंवा घोटाळा टाळण्यासाठी क्रेडिट कार्ड व्यवहार सुरक्षित करण्यासाठी सतर्क राहूनच आपण अशा गैरप्रकारपासून दूर राहू शकतो. त्यासाठी खालील गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

  • आपले महत्वाचे कार्ड तपशील जसे की CVV, क्रेडिट कार्ड नंबर किंवा पिन कधीही कोणाशीही शेअर करणे धोक्याचे असते त्यामुळे ती माहिती कुणाशी शेअर करू नये. 
  • आपल्या क्रेडीट कार्ड माहिती देणारे बिल किंवा कागदपत्रे टाकण्यापेक्षा ती नष्ट करणे योग्य असते. (जसे जाळणे,फाडणे इ.)
  • आपल्याला आलेल्या इमेल किंवा संदेश ह्या मधून क्रेडीट कार्डविषयी  विचारत असलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करा.
  • जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यासाठी पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसेसचा वापर करताना PoS उपकरणांना लहान स्किमिंग उपकरणे जोडली आहेत का? ह्यांची निट तपासणी करा.
  • आपले क्रेडीट कार्ड स्वाइप करताना आपल्या आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून घ्या.
  • आपल्या क्रेडीट क्रेडिट कार्डचे statement नियमित अंतराने चेक करणे गरजचे आहे.
  • आपण क्रेडिट कार्ड घेताना EMV मायक्रोचिप असलेले कार्ड घेणे सोयीचे आणि सुरक्षित असते.
  • आपल्या क्रेडिट कार्ड व्यवहारात काही शंका वाटत असल्यास त्वरित आपली तक्रार करावी.
  • क्रेडीट कार्डचे ऑनलाईन व्यवहार करताना काळजीपूर्वक करावे.
  • आपले क्रेडिट कार्ड हरवलेच तर आपल्या बँक किंवा ज्याच्याकडून क्रेडिट कार्ड घेतले आहे त्यांना कळवावे आणि आपले कार्ड ब्लॉक करावे.
  • आपले क्रेडिट कार्ड हरवले तर आपले खूप मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. आपल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे क्रेडीट कार्ड  वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आपले क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर आपण ताबडतोब कृती करणे आवश्यक आहे.

credit card fraud in marathi शी संबंधित हि माहिती जसे कि क्रेडीट कार्ड चे प्रकार आणि त्यापासून आपण कशी काळजी घ्यायची हे वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

फसवणूक करणारे आपल्या क्रेडीट कार्डचे तपशील कसे मिळवतात?

अनेकदा ऑनलाइन डेटाबेसमधून किंवा ईमेल स्कॅमद्वारे, कार्ड स्किमिंग, हॅकिंग द्वारे कार्ड तपशील – कार्ड नंबर, कार्डधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता इत्यादी माहितीची चोरी केली जाते.

क्रेडिट कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट आणि CVV देणे सुरक्षित आहे का?

जर चोराकडे तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक, expiry date आणि CVV क्रमांक असेल, तर ही सर्व माहिती चोराला ऑनलाइन खरेदी करण्यासाठी आवश्यक असते. तुमचा CVV नंबर विश्वासू व्यापाऱ्यांना देणे सामान्यत: सुरक्षित असले तरी ते नेहमीच आवश्यक नसते.


Spread the love
Previous post

क्रेडीट कार्ड चे विविध 13 प्रकार | Types of Credit Card in Marathi | जाणून घ्या तुमच्यासाठी कोणते असेल फायदेशीर

Next post

एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवल्यावर करा हे उपाय | ATM Card Credit Card Lost in Marathi | अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Post Comment

You May Have Missed