मोबाईल बँकिंग म्हणजे काय? | Mobile Banking in Marathi | 2023 मध्ये मोबाईल बँकिंगचा वापर कसा करायचा, फायदे इत्यादी.

mobile banking in marathi
Spread the love

अलीकडच्या काळात मोबाईल हा अत्यंत गरजेची गोष्ट बनला आहे. अगदी तो आपली प्राथमिक गरज झाला आहे. हे समजून घेवून बँकिंग क्षेत्राने मोबाईलच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार करण्यासाठी मोबाईल बँकिंगची निर्मिती केली आहे. (What is mobile banking in marathi).

ज्यामुळे आपले बँकिंग व्यवहार सोपे आणि सोयीचे होतील. आपल्या छोट्यामोठ्या गोष्टीसाठी बँकेत जावून रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

पूर्वी आपल्याला खरेदीसाठी किंवा व्यवहारांसाठी रोख रक्कम जवळ असणे आवश्यक असायचे. पण आता मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking) आपण रोख रक्कमेशिवाय बँकिंग व्यवहार काही वेळेतच करू शकतो. मोबाईल बँकिंगमुळे आपले काम सोपे झाले आहे. (What is mobile banking in marathi)

त्या मोबाईल बँकिंग विषयीची माहिती जसे कि मोबाईल बँकिंग म्हणजे काय?, त्याचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे आणि तोटे ह्या सगळ्यांची माहिती आपण ह्या लेखात घेणार आहोत.

मोबाईल बँकिंग म्हणजे काय? | What is Mobile Banking in Marathi

मोबाईल बँकिंग ही अशी एक सुविधा आहे जी मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे बँकिंग सेवा देऊ शकतो. यामध्ये टेक्नोलॉजी च्या वापर करून बँकांनी स्वतःचे अ‍ॅप्लिकेशन तयार केलेले असते.  विविध बँकिंग व्यवहार करण्यासाठी योग्य मोबाइल बँकिंग app डाउनलोड करणे गरजेचे आहे. 

मोबाईल बँकिंग (meaning of mobile banking) ऍप्लिकेशनसाठी स्मार्टफोन आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन गरजेचे असते. ह्यामुळे कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून बँकिंग व्यवहार सहजपणे करू शकतो.

त्यामध्ये पैसे पाठवणे, पैसे स्वीकारणे, खात्यातील शिल्लक तपासणे, बिल भरणे इत्यादी कामे मोबाईल बँकिंगच्या सहाय्याने सहज करता येतात. बँका मोबाईल बँकिंग सेवा हि अगदी निशुल्क म्हणजेच मोफत देतात.

मोबाईल बँकिंगचा वापर कसा करायचा? | How to Use Mobile Banking in Marathi

आता बँकांमध्ये इतकी प्रगत झाली आहे की, सर्व बँकांकडे स्वतःचे अ‍ॅप्लिकेशन आहे. प्रत्येक बँकेचे वेगवेगळे मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन वापरण्यासाठी  दिलेल्या स्टेप्स फॉलो करणे गरजेचे असतात. प्रत्येक बँकेची बँकिंग मोबाईल ऍप्लिकेशन्सची रचना वेगवेगळी असते.

  • आपल्या बँकेचे अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावे. उदा. बँक ऑफ इंडियाचे (BOIMobile) असते तसे प्रत्येक बँकचे वेगवेगळे असू शकते.
  • आपले पासबुक/खाते/नोंदणी क्रमांक इ. आवश्यकतेनुसार माहिती भरावी.
  • पासवर्ड तयार करून पुन्हा भरल्यानंतर बँकिंग मोबाइल अॅप्लिकेशन चालू होईल.
  • या सगळ्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर मोबाईल अॅप्लिकेशन आणि टाकून चालू होईल.

IDFC First Bank Credit Card online apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

मोबाईल बँकिंगच्या सेवांचे (अ‍ॅप्लिकेशन्सचे) प्रकार | Types of Mobile Banking Applications

बऱ्यापेकी सर्वच बँका आपल्याला खालील प्रकारच्या मोबाइल बँकिंग सेवा देतात. मोबाईल बँकिंगसाठी उपलब्ध मोबाइल बँकिंग सॉफ्टवेअर आणि अँप्लिकेशन्स खालीलप्रमाणे आहेत.

  • Unified Payment Interface (UPI)
  • Mobile wallet (Digital Wallet)
  • Wireless Application Protocol (WAP)
  • SMS Mobile Banking
  • Unstructured Supplementary Service Data (USSD)

Unified Payment Interface (UPI)

मोबाईल बँकिंगची ही सिस्टम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केली आहे. UPI द्वारे आपण ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ह्यांचा वापर करण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन असणे अत्यंत गरजेचे असते.

आता बऱ्यापेकी सर्वच बँका हि सुविधा आपल्या पुरवत आहेत. वरील दिलेलेया माहितीच्या आधारे आपण ते app डाउनलोड करून सुविधेचा वापर करू शकतो.

यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) चा वापर कसा करावा  या साठीची संपूर्ण माहिती आमच्या ह्या लेखात मिळेल.

Wireless Application Protocol (WAP)

आपल्या संबंधित बँकेचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करू शकतो. आणि नंतर बँकेने दिलेल्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी त्याचा वापर करू शकतो.

त्यांसाठी आपल्याला स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागते आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठी त्यांचे लॉगिन करण्यासाठी User ID आणि Password मिळवणे आवश्यक आहे. बर्यापैकी बँका IOS आणि Android साठी मोबाइल अ‍ॅप देतात.

SMS Mobile Banking

बहुतेक बँका एसएमएसवरून मोबाईल बँकिंग सेवा देतात. त्याला SMS बँकिंग म्हणून ओळखले जाते. या सेवेसाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर नोंदणी करून साईन-अप करणे आवश्यक असते.

आपल्या खात्यातील शिल्लक, खात्याचे मिनी स्टेटमेंट इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी बँकेला एसएमएस पाठवू शकतो. त्यानंतर आपली विनंती केलेली माहिती बँक एसएमएसवरून देते. एसएमएस बँकिंग सेवा घेण्यासाठी आपल्याला स्मार्टफोन किंवा इंटरनेटचे गरज नाही.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि एसएमएस पाठवण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक सारखा असणे आवश्यक आहे.

Mobile wallet (Digital Wallet)

आपण आपल्या मोबाईलवरून पेमेंट करण्याची ही सर्वात नवीन टेक्नोलॉजी आहे. हे आपल्या पाकीटासारखे किंवा पिग्गी बँक सारखे असते. ज्यात पैसे साठवले जातात आणि हवे असतील तेव्हा वापरता येतात.

सध्या अनेक वॉलेट अ‍ॅप उपलब्ध होत आहेत. त्यात उदा.पेटीएम हे एक मोबाईल वॉलेट आहे. तसेच अनेक बँकांनीही मोबाईल वॉलेट विकसित केली आहेत. Mobile wallet वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या बँक खात्याशी जोडलेले नसते.

त्यात आपल्याला आधी पैसे टाकावे लागतात, जितके पैसे आपण वॉलेटमध्ये टाकतो, तितके आपण खर्च करू शकतो. मोबाईल वॉलेट हे किरकोळ खर्च रिचार्ज आणि पेमेंट अश्यासाठी सर्वात योग्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

Unstructured Supplementary Service Data (USSD)

मोबाईल बँकिंगची ही सर्वात सहज आणि स्वस्त सेवा मानली जाते. यासाठी, आपणकडे फक्त एक मोबाईल फोन आणि सिमकार्ड असणे गरजेचे असते. यासाठी आपल्याला  स्मार्टफोन किंवा इंटरनेट असणे गरजेचे नसते. मोबाईल बँकिंगच्या ह्या सेवेमध्ये आपण कोणत्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकतो. आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतो आणि आपल्या सर्व बँकांमधील व्यवहाराची माहिती मिळवू शकतो.

मोबाईल बँकिंगचे फायदे | Benefits of Mobile Banking

आता आपण मोबाईल बँकिंगचे अनेक फायदयांचा अभ्यास करू.

  • आपला मोबाईल सतत आपल्या जवळ असल्यामुळे मोबाईल बँकिंग हे आपण नेहमी आणि कोणत्याही ठिकाणाहून वापरू शकतो.
  • बँकिंग ऍप्लिकेशनमुळे आपल्या गरजेनुसार अनुकूल व्यवहार केले जाऊ शकतात
  • आपण आपल्या व्यवहारांचा मागोवा घेवू शकतो.
  • आपण पेमेंट करण्यासाठी, निधी हस्तांतरित करण्यासाठी जसे कि RTGS, NEFT, IMPS इत्यादी व्यवहार करण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी आणि लाभार्थी जोडण्यासाठी मोबाइल बँकिंगचा वापर करू शकतो.
  • मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन्सचा उपयोग हा आपली युटिलिटी बिले भरण्यासाठी, मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी, तिकिटे बुक करण्यासाठी आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, अश्या भरपूर गोष्टींसाठी केला जावू शकतो.
  • मोबाईल बँकिंग हे (whatsapp pay) आपल्याला वापरण्यास अगदी सहज आणि सोपे आहे.
  • आपल्याजवळ पेमेंट करण्याची सोय असल्यामुळे नेहमी वेळेवर पेमेंट केले जातात याची खात्री करण्यासाठी आपण payment अलर्ट सुद्धा सेट करू शकतो.
  • मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन्सद्वारे आलेले नोटिफिकेशन्स हे आपल्याला सतर्क करतात त्यामुळे आपल्याला महत्त्वाचे सौदे आणि सवलतीची आठवण राहते.

नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमधील फरक | Difference Between Internet Banking and Mobile Banking

आपली विविध बँकिंग कामे करण्यासाठी मोबाईल बँकिंग हा एक चांगला मार्ग असू शकतो पण  नेट बँकिंग हाहि चांगला पर्याय  आहे आणि त्यामध्ये जवळपास सर्व वैशिष्ट्ये, कार्यक्षमता आणि बँकिंग मोबाईल ऍप्लिकेशन प्रदान करत नसलेल्या सेवांचा समावेश आहे. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमधील फरक ह्यांचा अभ्यास करू

मोबाईल बँकिंगइंटरनेट बँकिंग
आपण मोबाईल बँकिंग मध्ये स्मार्टफोन, टॅबलेट चा वापर करू शकतो.आपण इंटरनेट बँकिंग लॅपटॉप, डेस्कटॉप चा वापर करू शकतो.
मोबाईल बँकिंग सेवा वापरण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करणे आवश्यक आहे.ऑनलाइन बँकिंग सेवा वापरण्यासाठी आपणांस फक्त युझर आयडी आणि पासवर्डची आवश्यकता असते.
मोबाइल बँकिंगचा वापर जलद आणि सुलभ बँकिंग सेवांसाठी केला जाऊ शकतो.नेट बँकिंगचा वापर प्रगत बँकिंग सेवांसाठी केला जाऊ शकतो.  
मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन्समध्ये वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतेच्या मर्यादा असतात.नेट बँकिंग मध्ये जवळपास कोणत्याच मर्यादा नसतात .  
हि सेवा मर्यादित बँकेच्याकडे उपलब्ध असते.  हि सेवा सर्वच बँकांकडे असतात.
मोबाईल बँकिंग मध्ये आपल्याला  नोटिफिकेशन्स, बँकिंग ऑफर, रोमांचक सौदे आणि याबाबतीत सूचना प्राप्त होतात.नेट बँकिंग मध्ये कोणतेच नोटिफिकेशन्स येत नसतात.
मोबाइल बँकिंग एसएमएसद्वारे अॅक्सेस करता येते.लॅपटॉप, डेस्कटॉप ला स्थिर इंटरनेट आवश्यक असते.

what is mobile banking in marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

मोबाईल बँकिंग अॅप म्हणजे काय?

मोबाइल बँकिंग अॅप्स बँकिंग खात्यांमध्ये प्रवेश करण्याची आणि मोबाइल वापरून, कधीही आणि कोठूनही आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी देतात. मोबाईल बँकिंग अॅप चा वापर करून पासबुक आणि दैनंदिन व्यवहार तपासता येऊ शकतात.

मी मोबाईल बँकिंग कसे चालू करू?

तुमच्या डेबिट कार्डने तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या पसंतीनुसार पिन बदलू शकता.


Spread the love
Previous post

इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? | Net Banking Information in Marathi | इंटरनेट बँकिंगचा वापर कसा करायचा, फायदे इत्यादी.

Next post

UPI फसवणुकीपासून वाचण्यासाठी या 7 गोष्टींची घ्या काळजी | UPI Fraud in Marathi | कोणकोणत्या गोष्टींमुळे होऊ शकते UPI वरून फसवणूक

Post Comment

You May Have Missed