RTGS बद्दल सर्व माहिती- वेळ, फायदे, चार्जेस इत्यादी | RTGS Meaning in Marathi | RTGS अयशस्वी होण्याची 5 कारणे

rtgs meaning in marathi
Spread the love

आधुनिक तंत्रज्ञाना च्या युगात फंड ट्रान्सफर हे काम करण्यासाठी वेगळा वेळ काढणे कोणालाही शक्य नाही. आपला  वेळ वाया न घालवता आपण आपले  कुठेही पेमेंट ट्रान्सफर, बिल भरणे, इतर व्यवहार यासारख्या सुविधा सहजपणे करू शकतो. rtgs meaning in marathi.

अशा सुविधा देण्यासाठी बँकेकडून आधुनिक बँकिंग सुविधा दिल्या आहेत, त्यापैकी एक Real Time Gross Settlement (RTGS), या सुविधेचा समावेश आहे. पैसे स्वीकारण्याचा  किंवा पैसे पाठवण्याचा हा सुद्धा एक जलद मार्ग आहे.

इंटरनेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंग  सुविधेद्वारे RTGS करून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS ही भारतातील एक अतिशय प्रसिद्ध  इलेक्ट्रॉनिक पैसे  ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. rtgs meaning in marathi.

आधुनिक बँकिंग सुविधांमध्ये मध्ये Real Time Gross Settlement (RTGS), National Electronic Funds Transfer (NEFT), आणि Immediate Payment Service (IMPS) यासारख्या  सेवा उपलब्ध आहेत.

ह्यामुळे  आपली  पेमेंट प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ होते. त्याच बँकिंग सेवेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम). ही एक अतिशय लोकप्रिय फंड ट्रान्सफर पद्धत आहे.

या अंतर्गत, पैसे कमी  वेळेत  पाठवले जातात. RTGS च्या मदतीने आपण एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात एकाच वेळी हवे तितके पैसे ट्रान्सफर करू शकतो.

आज आपण RTGS म्हणजे काय, RTGS Timings, RTGS Charges आणि आपण ते कसे वापरू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती (rtgs meaning in marathi) जाणून घेऊया.

RTGS चा फुल फॉर्म | RTGS full form in Marathi

RTGS चा फुल फॉर्म हा Real time gross settlement (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) असा आहे . RTGS  ला मराठी मध्ये रिअल टाइम पेमेंट म्हणजेच, रिअल टाइम आणि ग्रॉस व्हॅल्यूच्या आधारावर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा असे म्हणले जाते. rtgs full form in marathi.

Image by mohamed Hassan from Pixabay

RTGS म्हणजे काय? | RTGS Meaning in Marathi

RTGS म्हणजे फंड ट्रान्सफर करण्याची एक आधुनिक सिस्टम म्हणले जाऊ शकते. एका बँक खात्यातून दुसर्या बँक  खात्यामधे fund transfer करण्याची एक पद्धत आहे.  RGTS चा वापर मोठमोठया व्यवहारांसाठी सर्वाधिक केला जातो. ज्यामध्ये एका बँकेतून इतर कोणत्याही बँकेत "रिअल-टाइम" आणि ग्रॉस सेटलमेंट आधारावर पैसे पाठवले जातात. 

रिअल टाइम म्हणजे सूचना मिळ्यानंतर ज्यावर प्रक्रिया केले जाते आणि ‘ ग्रॉस सेटलमेंट म्हणजे फंड ट्रान्सफर सूचनांचे सेटलमेंट जे एकानंतर एक असे  होते.

RTGS द्वारे केलेल्या सर्व व्यवहाराची दखल RBI कडून घेतली जाते. त्यामुळे ही सर्वात जलद  आणि सुरक्षित फंड ट्रान्सफर सुविधा  मानली जाते.

RTGS द्वारे कमीत कमी फ़ंड ट्रान्सफर साठी व्यवहार मर्यादा असते आणि जास्तीत जास्त फ़ंड ट्रान्सफर साठी कोणतीही मर्यादा नाही.

RTGS ट्रान्सफर मर्यादा | What is RTGS Transfer Limit?

आपण RTGS द्वारे किमान रु 2,00,000 (२लाख) इतका फंड ट्रान्स्फर करू शकतो आणि कमाल मर्यादा नाही.

RTGS साठी कोणते तपशील आवश्यक आहेत | What are the Details Required for RTGS?

  • ज्यांना पैसे पाठवायचे (लाभार्थी) त्या खातेधारकाचे नाव (Payee Name)
  • ज्यांना पैसे पाठवायचे (लाभार्थी) त्यांचे खाते क्रमांक (Account No)
  • ज्यांना पैसे पाठवायचे (लाभार्थी) त्यांचे खाते IFSC कोड (IFSC CODE)
  • ज्यांना पैसे पाठवायचे (लाभार्थी) त्यांच्या बँकेचे नाव (Bank Name)
  • ज्यांना पैसे पाठवायचे (लाभार्थी) त्यांची बँक शाखा (Bank Branch)
  • पाठवायची रक्कम (Amount)

RTGS करण्याची प्रक्रिया | Procedure of RTGS

RTGS करण्याची दोन पद्धती आहेत.

RTGS करण्याची ऑनलाइन  प्रक्रिया | Online Process

  • ऑनलाइन पद्धतीने RTGS करण्यासाठी, आपल्याकडे  नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंग असणे आवश्यक आहे. आपण RTGS करण्यासाठी आपली  बँक RTGS सक्षम असणे सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत गरजेचे आहे.
  • ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवयाचे आहेत ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लाभार्थी ग्राहक (Beneficiary) म्हणून जोडावी लागेल.
  • त्यासाठी त्या  व्यक्तीचे महत्त्वाचे तपशील जसे कि (नाव,खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC Code) भरणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी ग्राहक जोडल्यानंतर फंड ट्रान्सफर वर जाऊन, RTGS, NEFT आणि IMPS ह्यातील, RTGS Option  निवडावा. त्यानंतर पाठवायची रक्कम आणि Pay हा Option निवडावा.
  • यानंतर आपले पैसे त्या व्यक्तीला  ट्रान्सफर होतील.

RTGS करण्याची ऑफलाइन प्रक्रिया | Offline Process

  • जर आपल्याकडे ऑनलाइन पद्धतीने इंटरनेट बँकिंग & मोबाईल  बँकिंग सुविधा नसतील तर तर आपण RTGS ऑफलाइन पद्धतीने  सुद्धा करू शकतो
  • चेकद्वारे RTGS करण्यासाठी बँक शाखेत जावून RTGS फॉर्म भरावा लागेल. त्यात आपण सगळी माहिती जसे कि पैसे पाठवयाचे आहेत त्या व्यक्तीचे नाव, बँक, शाखेचे नाव, IFSC कोड, रक्कम आणि खाते क्रमांक  द्यावा लागेल
  • त्यानंतर आपण दिलेल्या चेक वर आपली सही आणि नाव लिहावे आणि त्या फॉर्मसोबत जोडावे
  • ह्यानंतर बँक आपले खात्यामधून  ती रक्कम त्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर  करते

RTGS करण्याची वेळ | RTGS Timings

14 डिसेंबर 2020 पासून RTGS हे 24x7x365 उपलब्ध आहे. म्हणजेच RTGS चा वापर आपण कधीही आणि केव्हाही करू शकतो.

RTGS व्यवहारासाठी लागणारे शुल्क | Charges for RTGS Transaction

या प्रक्रियेत ज्या बँकेला पैसे पाठवले जातात त्यांना आरटीजीएस व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु जे पैसे पाठवतात त्यांना बँक पैसे ट्रान्स्फर  करण्यासाठी शुल्क आकारते, ते खालीलप्रमाणे आहे. हे प्रत्येक व्यवहारासाठी लागणारे शुल्क आणि त्यावर सर्व करासोबत आहे.

रक्कमशुल्क
2 लाख ते रु.5 लाख२५ + कर
5 लाखापेक्षा जास्त५०+ कर

RTGS वापरण्याचे फायदे | Benefits of RTGS

  • फंड ट्रान्सफर साठी ही एक सुरक्षित आणि जलद सुविधा आहे
  • RTGS  व्यवहार करताना कमीतकमी रकमेसाठी मर्यादा असते. पण जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नसते
  • RTGS हि सुविधा सर्व दिवस २४x७x३६५ उपलब्ध असते
  • इंटरनेट बँकिंग वापरून घरातून/कामाच्या ठिकाणाहून पैसे पाठवू शकतो, पण आपली बँक RTGS सेवेसाठी सक्षम असावी लागते

RTGS अयशस्वी (Return) होण्याची कारणे | Reasons of RTGS Failure/Return

RTGS ही फंड ट्रान्सफरसाठी वारंवार वापरल्या जाणार्‍या पद्धतींपैकी आहे, तरीपण काही क्वचित प्रसंगी, RTGS ट्रान्सफर अयशस्वी होऊ शकते. त्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

  • RTGS करताना चुकीचा खाते क्रमांक टाइप केल्यामुळे RTGS (Return) होवू शकतो
  • आपल्या खात्यात अपुरा निधी असणे हे RTGS (Return) होण्याचे कारण आहे
  • RTGS करताना चुकीचा IFSC CODE टाइप केल्यामुळे RTGS (Return) होवू शकते
  • ऑनलाइन RTGS करताना तांत्रिक त्रुटी किंवा सर्व्हर त्रुटींमुळे अपयश येऊ शकते
  • तथापि, जर पैसे ट्रान्स्फर करताना अयशस्वी झाले असेल परंतु आपल्या खात्यातून पैसे डेबिट झाले असतील तर अशा कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे, ते सहसा एका तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त बँकेच्या कामकाजाच्या एका दिवसात खात्यात जमा केले जातात

RTGS (rtgs meaning in marathi) बद्दलची हि माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर कंमेंट करून कळवा. लेख आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास share करायला विसरू नका.

RTGS करण्यासाठी कमीत कमी किती मर्यादा आहे.

RTGS चा वापर करून पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी कमीत कमी २,००,०००/- मर्यादा आहे. जास्तीत जास्त अशी कोणतीही मर्यादा नाही.

आपण RTGS Online करू शकतो का?

तुम्ही RTGS व्यवहार Online आणि Offline दोन्ही पद्धतीने करू शकता. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी, तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, तुम्हाला RTGS व्यवहार ऑफलाइन करायचे असल्यास, तुम्हाला तुमच्या जवळच्या RTGS-सक्षम बँक शाखेला भेट द्यावी लागेल.


Spread the love

Post Comment

You May Have Missed