बचत खाते असून वापरत नसाल तर होईल नुकसान | Saving Account in Marathi | ताबडतोब असे खाते बंद करा वाचा महत्त्वाची माहिती;
Saving Account Rule: प्रधानमंत्री जनधन योजना सुरू झाल्यापासूनच अगदी कानाकोपऱ्यातील लोकांचे सुद्धा बँकेमध्ये खाते आहे; यामध्ये आपल्याला कित्येकदा असे दिसून येत आहे की काही व्यक्तींची एकापेक्षा जास्त बँकेमध्ये सेविंग अकाउंट आहेत आणि हा प्रकार प्रामुख्याने व्यावसायिक किंवा इतर पगारदार व्यक्ती यांच्या बाबतीमध्ये जास्त दिसून येईल. Saving Account in Marathi.
परंतु जरी एका पेक्षा जास्त बँकांमध्ये बचत खाते असले तरीसुद्धा काही महत्त्वाच्या निवडक बँक खात्यांचा वापर व्यक्ती करतात आणि बरीच खाती तसेच पडून असतात त्याचा वापर होत नाही.
परंतु आता अशा प्रकारची खाती आहेत, ती आपल्या फायद्याची नाहीत अशा खात्यामुळे नक्कीच नुकसान होऊ शकते (bank rule); जर तुमचे सुद्धा एकापेक्षा अधिक बँकांमध्ये बचत खाते असेल व तुम्ही ते वापरत नसाल तर अशी खाती बंद करणे तुमच्या फायद्याचे ठरते.
तुम्ही जर असे नाही केले तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावे लागेल; परंतु यापेक्षाही अधिक विविध समस्यांना तोंड देखील द्यावे लागेल. चला, तर याविषयी तपशील आपण जाणून घेऊया.
वापरत नसलेल्या बँक खात्यामुळे होणारे नुकसान | Saving Account in Marathi
1) मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे
जर तुमचे एकापेक्षा अधिक बचत खाते असेल आणि तुम्ही त्यांचा वापर अजिबात करत नसाल तरीसुद्धा बचत खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी बॅलन्स ठेवणे आवश्यक असते हा नियम आता सर्वच बँकांच्या बाबतीत लागू झालेला आहे.
त्यामुळे आता तुमच्या बचतीचा काही भाग तुम्हाला ज्या त्या खात्यामध्ये कमीत कमी बॅलन्स च्या स्वरूपामध्ये ठेवावा लागेल (latest marathi news); मिनिमम बॅलन्स नसेल तर अशावेळी बँकेच्या अंतर्गत काही विशिष्ट रक्कम दंडाच्या स्वरूपात कापली जाऊ शकते.
2) डेबिट कार्ड शुल्काचा भुर्दंड भरावा लागतो
जरी तुम्ही बचत खाते वापरत नसाल तरी तुम्हाला त्या बँकेची डेबिट कार्ड फी भरावीच लागते हे अनिवार्य आहे; तसेच भरावे लागणारे जे काही शुल्क असतील ते निष्क्रिय खतामधून वजा केले जाऊ शकतात.
बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता तुम्हाला वेगळ्या प्रकारचे शुल्क लागत नसतात; परंतु बँका त्यांच्या डेबिट कार्डवर काही प्रमाणात शुल्क आकारतात.
इतकेच नाही तर तुम्हाला व्यवहारांबद्दल फोनवर जो काही एसएमएस येत असतो तो पाठवण्यासाठी सुद्धा बँक अंतर्गत शुल्क आकारते (live marathi update).
सर्वच बँकांचे हे शुल्क हे वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे खाते वापरत नसाल तरी तुम्हाला हे शुल्क भरावे लागतात.
3) मिनिमम बॅलन्स नसल्याने भरावा लागणारा दंड
तुम्ही जर खाते वापरत नसाल तरीसुद्धा तुम्हाला त्या खात्यामध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवणे खूप गरजेचे आहे; तुम्ही बचत खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक ठेवली नाही तर अशावेळी बँकेचे जे काही नियम असतील ते त्याप्रमाणे तुम्हाला दंडाच्या स्वरूपात भरावे लागणार आहेत.
त्यामुळे आता दंड टाळायचे असतील तर तुमचे जितके खाते आहेत त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी बॅलन्स ठेवणे खूप गरजेचे आहे; दंडाचे रक्कम तुम्ही भरत नसाल तर ती सातत्याने वाढत जाते आणि तुम्हाला अशावेळी बोजा वाढलेला दिसून येतो.
4) आयटीआर फाईल करताना येऊ शकते अडचण
तुमचे जर एकापेक्षा अधिक बचत खाते असेल तर त्याचे समस्या तुम्हाला आयकर रिटर्न भरत असताना येऊ शकते; ज्यावेळी तुम्ही आयकर विवरण पत्र भरत असतात, त्यावेळी प्रत्येक बँक खात्याचा पूर्णपणे तपशील तुम्हाला द्यावा लागेल.
अशा परिस्थितीमध्ये जर एकापेक्षा अधिक बँकेमध्ये बचत खाते असतील तर अशावेळी अकाउंटच्या कागदपत्रांचा त्या ठिकाणी त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतो; अशावेळी तुम्ही जर एखाद्या खात्याचा तपशील देण्यामध्ये चूक केली असेल तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस सुद्धा येऊ शकते.
5) खाते बंद होऊ शकते
समजा तुम्ही बारा महिन्यांपर्यंतच संबंधित बँके अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या व्यवहार केला नसेल तर ते खाते पूर्णपणे निष्क्रिय खाते म्हणून ओळखले जाते आणि पुढील बारा महिने निष्क्रिय खातेमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार केलाच नाही तर अशावेळी बँक खाते फ्रीज केले जाते आणि निष्क्रिय खात्याच्या श्रेणीमध्ये याला ठेवतात.
अशा इन ऍक्टिव्ह अकाउंट म्हणजेच निष्क्रिय खात्याच्या अंतर्गत व्यवहार नक्कीच केला जाऊ शकतो; परंतु नेट बँकिंग व इतर एटीएम व्यवहार किंवा इतर फोन बँकिंग तुम्हाला नक्कीच करता येणार नाही.
Saving Account in Marathi याविषयाची माहिती आपल्याला महत्वपूर्ण वाटली असेल तर कंमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा.