गुंतवणुकीच्या या ‘4’ फायदेशीर योजना! करबचतीसह मिळत आहे बंपर परतावा | कर बचत योजना | वाचा सविस्तर

Tax Savings Schemes Marathi
Spread the love

Best Investment Scheme: पैशांची गुंतवणूक करायची असेल तर विविध गुंतवणुकीचे मार्ग आपल्या पुढे उपलब्ध आहेत, तसेच प्रत्येक कर बचत योजना, गुंतवणूक योजना किंवा पर्यायांचे वैशिष्ट्य सुद्धा तितकेच वेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळेल. Tax Savings Schemes Marathi.

यामध्ये गुंतवणूकदार व्यक्ती चांगला परतावा देणारे तसेच गुंतवणूक अगदी सुरक्षित असेल व करबचत देखील होऊ शकेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायचा विचार करतात.

तसे आपण बघितले तर गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत; प्रशासनाच्या अंतर्गत सुद्धा काही विशिष्ट योजना आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही खात्रीशीर चांगला परतावा मिळवू शकता आणि तुमची जी काही गुंतवणूक आहे ती सुरक्षित सुद्धा ठेवू शकता (Best investment plan with high returns). यामध्ये कर बचतीचा फायदा सुद्धा मिळतो, गुंतवणूक कशी करावी आणि करबचत कशी करावी अशा योजनांची माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया.

उत्तम परतावा आणि कर वाचवू शकतील अशा कर बचत योजना

1) एससीएसएस अर्थात ज्येष्ठ नागरिक बचत योजना

भारत सरकारने राबवलेली ही एक महत्त्वाकांक्षी कर बचत योजना योजना असून, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही संपूर्ण देशभरातील ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रामुख्याने राबविण्यात आलेल्या योजनांपैकीच एक आहे; हा एक सर्वाधिक महत्त्वाचा उपक्रम आहे.

ज्येष्ठ नागरिकांना उत्तम तसेच सुरक्षित गुंतवणूक ठेवण्याच्या दृष्टिकोनामधून पर्याय उपलब्ध करून देणे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. या योजनेचा लाभ फक्त 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीच लाभ घेऊ शकतील? तसेच 55 वर्षावरील जेष्ठ नागरिक ज्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे किंवा त्यांनी स्वइच्छेने निवृत्ती विशेष स्वयंसेवी योजनेच्या माध्यमातून स्वतः निवृत्त झालेले आहेत (trending news).

या विशेष अशा पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये तुमच्या ठेवीवर 8.20% व्याज या ठिकाणी मिळू शकते; तसेच कमीत कमी गुंतवणूक 1000 पासून जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंतचे यामध्ये गुंतवणूक करता येईल. या योजनेमध्ये तुम्हाला आयकर नियम 80c च्या माध्यमातून दीड लाखांपर्यंतची करसुट मिळते.

2) पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

भारत देशातील विविध पोस्ट ऑफिस तसेच बँकांमध्ये ही योजना सर्वाधिक ऑफर केली जाते; ही एक प्रसिद्ध गुंतवणुकीची योजना आहे (Investment scheme in india).

ही योजना नक्कीच नागरिकांना हमखास परतावा देत आहे आणि या माध्यमातून मिळणारे जे काही व्याज आहे ते करमुक्त असणार आहे.

या योजनेचा परिपक्वतेचा कालावधी हा पंधरा वर्षांचा निश्चित केला आहे; ही एक दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना असून, या योजनेमध्ये 7.1% इतके व्याज नागरिकांना दिली जाऊ शकते. या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक ही ई श्रेणीमध्ये येत आहे.

या योजनेमध्ये जी काही गुंतवणूक केलेली असेल त्यावर मिळणारे व्याज व परिपक्वतीनंतर मिळणारी जी काही रक्कम आहे ती संपूर्णपणे करमुक्त असणार आहे; यामध्ये सुद्धा ८० सी च्या अंतर्गत तब्बल दीड लाख पर्यंतची कर सुट नागरिकांना मिळू शकते.

3) एसएसवाय अर्थात सुकन्या समृद्धी योजना

ही एक सरकारने राबवलेली बचत योजना आहे; ती फक्त मुलींसाठी ऑफर केली गेली आहे. या योजनेअंतर्गत मुलींचे आर्थिकदृष्ट्या भविष्य नक्कीच सुरक्षित करता येऊ शकते.

या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर नागरिकांना 8.1% दराने व्याज मिळत आहे; एक आर्थिक वर्षामध्ये या योजनेत सुद्धा 250 रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत पंधरा वर्षासाठी नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये सुद्धा ८० सी च्या अंतर्गत दीड लाखांपर्यंतची कर सुट नागरिकांना मिळू शकते. सुकन्या सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर चा वापर करून आपण याठिकाणी अधिक माहिती घेऊ शकता.

4) एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना

नोकरदार नागरिकांसाठी ही योजना आहे, ज्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अगदी चांगली रक्कम हवी आहे असे व्यक्ती नक्कीच या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतील.

या योजनेमध्ये गुंतवणूक केली की प्रत्येक महिन्याला एक निश्चित अशी रक्कम मिळत राहते, यामध्ये अशी माहिती मिळाली आहे की ही योजना कर बचतीच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम गुंतवणुकीची योजना ठरू शकते. तुम्हाला 80C आणि 80CCD(1B) च्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतची करू सुट मिळू शकते.

सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी, Tax Savings Schemes Marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

मी कर कसा वाचवू शकतो?

1961 च्या आयकर कायद्यांतर्गत कर वाचवण्याचे अनेक कायदेशीर मार्ग आहेत, ज्यामध्ये काही कर-बचत म्युच्युअल फंड, एनपीएस, सुकन्या समृद्धी योजना, विमा प्रीमियम, वैद्यकीय विमा, पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, गृह कर्ज आणि इतर अनेक समाविष्ट आहेत.

पीपीएफ मॅच्युरिटी करमुक्त आहे का?

आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत PPF व्याज आणि परिपक्वता रक्कम करमुक्त आहे.


Spread the love
Previous post

शिक्षण कर्ज घेत आहे? मग ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा | शैक्षणिक कर्ज योजना | कर्ज फेडताना अजिबात अडचण येणार नाही

Next post

फक्त 55 रुपये गुंतवा आणि प्रति महिना मिळवा बंपर पेन्शन! | पीएम किसान मानधन योजना | पहा सरकारची भन्नाट गुंतवणुकीची योजना

You May Have Missed